Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची १६ मे रोजी ‘अग्निपरीक्षा’

0
0
नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात बुथची (मतदान केंद्र) जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक तसेच पदाधिकारी यांचेकडून मतदान आकडेवारीचा लेखी आढावा घेतला आहे.

अवकाळीच्या नुकसानीची मदत एक वर्षानंतर जाहीर

0
0
राज्यातील अनेक भागात गतवर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. वर्षानंतर सरकारने या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीस मदत देण्यास मुहूर्त सापडला आहे.

आई-व‌डिलांनीच केला मुलीचा निर्घृण खून

0
0
मुदगल (ता. पाथरी) शिवरात आई-व‌डिलांनीच मिळून मुलीचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणरित्या खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-व‌डीलांना अटक केली आहे.

अस्वलांच्या हल्ल्याने एक जण जखमी

0
0
तहानलेली जनावरे पाणवठे आटल्याने गावात व शेत शिवारात येऊ लागली आहेत. त्यामुळे माहूर जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील दत्तमांजरी परिसरात शेतात आंब्याची काढणी करीत असलेल्या शेतकऱ्यावर पाण्याच्या शोधात फिरत आलेल्या दोन अस्वलांनी हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई पालिका आघाडीवर

0
0
बीड जिल्ह्यात सहा नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे. या सर्व पालिकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, रोजगार हमी योजना कर, शिक्षण कर या सर्व करांतून २०१३-१४ या वर्षात ३७ कोटी ५० लाख रुपये वसुली अपेक्षित होती.

गौताळा अभयारण्यातील आग आटोक्यात

0
0
गौताळा अभयारण्यातील चाळीसगाव रेंजमध्ये शनिवारपासून भडकलेली आग सोमवारी दुपारी आटोक्यात आली. या आगीत जवळपास ७० हेक्टर क्षेत्र खाक झाले. वन्यजीव संरक्षक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने आग नियंत्रणात आणली.

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांमुळेच आत्मभान

0
0
महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांमुळेच समाजाला आत्मभान मिळाले. त्यांनीच समाजातील अंधश्रद्धा दूर केल्या, कर्मकांड कमी केले; तसेच विषमता कमी करण्यासाठी हातभार लावला.

सातारा ग्रामपंचायतीची सभा टँकरवरून गाजण्याची शक्यता

0
0
सातारा ग्रामपंचायतीत मंगळवारी सकाळी ११.३० वा. सभा, तर बुधवारी ३० एप्रिल रोजी सकाळी १० वा. महिला ग्रामसभेचे आयोजन केले आहे. दोन्ही सभा या सरपंच अलका शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. या सभा टँकरवरून गाजण्याची शक्यता आहे.

अखेर लिंक रोडवर सिग्नल उभारले

0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या नगर लिंक रोडमुळे पुणे रस्त्यावर तयार झालेल्या चौफुलीवर अखेर सिग्नल उभारण्यात आला आहे. या चौफुलीवर सिग्नल नसल्यामुळे नगर लिंक रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. हा सिग्नल लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

आता मदतीचा विचार करा

0
0
निवडणूक संपल्यामुळे आचारसंहिता शिथील करून ८० गावांमधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. फेब्रुवारी- मार्चमधील गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने मदतीसाठी फक्त १२ गावांनाच पात्र ठरवले आहे.

शिवना टाकळीतून पाणी सोडा

0
0
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून कबूल केलेले पाणी गावापर्यंत योग्य प्रमाणात पोचले नाही. ऐन उन्हाळ्यात शेतीत उभी पिके करपून जाण्याची भीती आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी धोंदलगाववासीयांनी सोमवारी (२८ एप्रिल) जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराओ घातला.

बिस्किट पुड्यासाठी घेतलेले जास्त पैसे परत करा

0
0
बिस्किट पुड्यासाठी जास्त पैसे घेतले म्हणून आणि पैसे वापस देण्यासाठी मॉलच्या व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने ग्राहकाने ग्राहक मंचात धाव घेतली. या प्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाने जास्तीच्या पैशासह तक्रारीचा खर्च डीडीद्वारे ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील ‘रिलायन्स मार्ट’ला (रिलायन्स फ्रेश) दिले.

टेम्पो- दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार

0
0
टेम्पो व दुचाकीची धडकेत बसून झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार व टेम्पोतील दोन जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी दीड वाजता दौलताबाद- अब्दीमंडी येथे झाला. दुचाकीला जोराची धडक दिल्यानंतर टेम्पो लिंबाच्या झाडावर जाऊन आदळला.

एम. ई. चा निकाल आज जाहीर होणार

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या (एम. ई.) निकालाला अखेर मुहूर्त लागला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मंगळवारी सकाळपर्यंत निकाल पाहता येईल.

महिलांना गंडवणारा सायबर भामटा गजाआड

0
0
तरुणीच्या नावाने फेसबुकवर प्रोफाईल बनवून महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाला सायबरसेलच्या पथकाने सोमवारी पुण्यातून अटक केली आहे. हा सायबर भामटा जवळीक निर्माण झाल्यावर महिलांना भावनिक ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्... रेल्वे अपघात टळला

0
0
एकनाथनगर रेल्वे क्रॉसिंग जवळ, होम सिग्नलच्या बाजुला असलेले रेल्वे रूळ उष्णता आणि रेल्वे चाकांच्या घर्षणामुळे वाकल्याचा प्रकार सोमवारी (२८ एप्रिल) अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्याचवेळी नगरसोल-नरसापूर रेल्वेला तेथून जाणार होती. ही रेल्वे थांबवून लोहमार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

मावळतीच्या मित्रांनो पुन्हा पुन्हा हसू!

0
0
एकतीस ऑक्टोबर २००९. माझा सेवानिवृत्त दिन. माझा सत्कार सोहळा चालू. अनेकांनी माझ्यावर स्तुतीवर भाषणं केली. उत्तरादाखल मला बोलावयास सांगितलं.

प्रमुख संशय‌ित पसार

0
0
एन ८ व मिसारवाडी येथील घरफोडीचा छडा लावण्यासाठी सिडको पोलिसांनी रेकॉर्डवरील बारा अट्टल घरफोड्यांची धरपकड करून चौकशी सुरू केली आहे. परंतु प्रमुख संशय‌ित घरफोड्या शहरातून पसार झाला आहे.

लग्नाच्या दहाव्या दिवशीच आत्महत्या

0
0
लग्नानंतर दहा दिवसांतच नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या चौघांना अटक करण्यात आली. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिन्सीतील संवेदनशील भागात दंगा काबू पथकाचा सराव

0
0
पोलिसांच्या दंगा काबू पथकाने जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागात सोमवारी पथसंचलन करून दंगल सदृश्य परिस्थिती हातळण्याचा सराव केला. मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हा सराव करण्यात आल्याचे जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images