Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाझर तलावात बांधकामे जोरात

0
0
वडगाव कोल्हाटी येथील पाझर तलावाची हद्द ठरत नसल्याने धरणाच्या क्षेत्रात बांधकामे होत आहेत. ग्रामपंचायतीने सहा महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे हद्द ठरवून देण्याची मागणी केली आहे. परंतु हद्द ठरत नसल्याने बांधकामे सुरू आहेत.

‘कुंडलिका’, ‘सीना’ अतिक्रमणाच्या विळख्यात

0
0
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या कुंडलिका व सीना नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. विटभट्ट्या, हातभट्टीचे अड्डे, शेती, इमारत उभारणी, वॉशिंग सेंटर असे नाना उद्योग सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे नदीच्या दोन्ही पात्रात मोठ्या प्रमाणात दगड, मातीचा भर घालून त्यावर बांधकाम उभे रहात आहेत.

सिल्लोडचे लोडशेडिंग तात्पुरत्या स्वरूपात बंद

0
0
‘मतदान संपताच लोडशेडिंग सुरू’ हे वृत्त ‘म. टा.’ च्या सोमवारच्या अंकात प्रसिद्ध होताच शहरातील लोडशेडिंग तात्पुरते रद्द करण्यात आले आहे. सोमवार व मंगळवारी सायंकाळी सात वाजताचे लोडशेडिंग करण्यात आले नाही.

साठा वीस दिवसांत निम्म्यावर

0
0
कन्नड व वैजापूर तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या शिवना- टाकळी प्रकल्पात केवळ ३६ टक्के जलसाठा कमी झाल्याने प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणी योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावा, अशी मागणी शिवना टाकळी पाणी बचाव कृती समितीने केली आहे.

टागोर शाळेत पालकांचे समितीसमोर गाऱ्हाणे

0
0
रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळेच्या चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी भेट देणार असल्याचे समजताच मंगळवारी पालकांनी शाळेत धाव घेतली. ‘शाळा बंद करु नका, आमच्या मुलांचे नुकसान करू नका, अशी विनंतीवजा मागणी पालकांनी मांडली आहे.

आयुक्त - सभापतींनी केला शिवसेनेचा नकळत गेम

0
0
भूमिगत गटार योजनेच्या टेंडरच्या ठरावाला मंजुरी देण्यावरून स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे आणि पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शिवसेनेचा गेम केल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. शिवसेनेबरोबरच पालिकेतील अन्य पदाधिकारीही या गेमचे बळी ठरलेत.

टीव्ही, फ्र‌िज, कूलर जळाले

0
0
बीड बाय पासवरील सूर्या लॉन्स समोरील वसाहतीत मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता विजेचा दाब वाढल्यामुळे टी.व्ही., फ्रिज, कूलर, सेट टॉप बॉक्स, पाण्याच्या मोटारी जळाल्या. २२० व्होल्टच्या तारा एकमेकांना चिटकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

वाघीण नंतर जेवते!

0
0
आईची ममता वाघासारख्या हिंस्त्र पशूमध्येही पाहण्यास मिळते. पिंजऱ्यात बछडे आणि त्यांची आई यांना एकत्र ठेवले आहे. त्यांच्या जेवणासाठी रोज सकाळी मांस टाकले जाते. मांस पिंजऱ्यात टाकल्यावर समृध्दी वाघीण प्रथम बछड्यांना येथेच्छ ताव मारू देते. त्यानंतर ती जेवते, असे प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी संजय नंदन यांनी सांगितले.

आता हिरवे पाणी

0
0
अळ्यांच्या पाठोपाठ आता पालिकेच्या फारोळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात हिरव्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. हिरव्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शुध्दीकरण केंद्राच्या काही हौदांमध्ये काळी माती टाकण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे.

अळ्या म्हणजे धोक्याची घंटा

0
0
जलशुध्दीकरण केंद्रात सापडलेल्या त्या अळ्या म्हणजे आपल्यासाठी धोक्याची सूचना आहे. अळ्यांचा प्रादुर्भाव समूळ नष्ट करण्यासाठी जायकवाडी धरणातील रॉ वॉटरचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे, असे मत महापालिकेच्या पाणी विषयक दक्षता समितीचे सदस्य प्रा. उमेश कहाळेकर यांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केले.

मामाच्या गावासाठी खटारा गाडी

0
0
उन्हाळी सुट्ट्या आणि पंढरपूर यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या नवीन बसचा पुरवठा यावर्षी झाला नाही. त्यामुळे सुट्ट्यात बसने मामाच्या गावाला जाणारे चिमुकले असोत, वा पंढरपूर यात्रेचे भाविक. त्यांना यावर्षी हा प्रवास खटारा गाड्यातून करावा लागेल.

हापूस दीडशे रुपयांनी स्वस्त

0
0
हापूसच्या शौकिनांनो खुशखबर. आठवडाभरात हापूस चक्क दीडशे रुपयांनी स्वस्त झालाय. सध्या एका डझनसाठी चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागतायत. अक्षय तृतियेनिमित्त बाजारात आंब्याची आवक वाढलीय. तसेच युरोपाने भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातलीय. त्याचा परिणाम आता किमतीवर होतोय.

मातेने संपवले मुलीसह जीवन

0
0
पतीने माहेरी राहू न दिल्याने पत्नीने नऊ महिन्याच्या चिमुकलीला विष पाजून स्वतःही प्राशन केले. या विवाहितेचा काही वेळातच मृत्यू झाला मात्र ही घाटी हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंज देणा-या चिमुकलीची प्राणज्योत सोमवारी मालवली. बालानगर ता. पैठण येथे गुरुवारी हा प्रकार घडला होता.

पतंजली चिकित्सालयावर हल्ला

0
0
काल्डा कॉर्नर भागातील पतंजली चिकित्सालयावर मंगळवारी दुपारी दुचाकीवर आलेल्या अज्ञात तरुणांच्या टोळक्याने हल्ला केला. दुकानाबाहेरील फ्लेक्स फाडण्यात आले असून बंद असलेल्या दुकानावर दगडफेक केली.

४६४ कोटींचा ठराव मंजूर

0
0
स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये भूमिगत गटार योजनेचा ४६४ कोटी रुपयांचा ठराव अर्ध्या तासांमध्ये मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे ही बैठक अचानक बोलावण्यात आली होती आणि त्यामध्ये ठरावावर नगरसेवकांनी कोणतीही चर्चा केली नाही. अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये पंधरा मिनिटे शहरातील रस्त्यांच्या कामांवरच चर्चा झाली.

सोलापूर-औरंगाबाद प्रवास सुसाट

0
0
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गातील येडशी ते औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट ‘आयआरबी इन्फ्रा’ कंपनीने घेतले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला ९१० दिवसांची (सुमारे अडीच वर्षे) मुदत देण्यात आली आहे.

बारा गावे टँकरच्या प्रतीक्षेत

0
0
तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या समस्येने वेढले असून आतापर्यंत पंधरा गावांना २२ टँकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या शिवाय आणखी बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के. पी. कड यांनी दिली.

साताऱ्यातली टँकरची प्रतीक्षा संपली

0
0
पाण्याची नेहमीच टंचाई असणाऱ्या सातारावासीयांची या उन्हाळयातील टँकरची प्रतीक्षा संपली आहे. मंडळ अधिकारी शशिकांत ठेंगे व तलाठी शिदे यांनी बुधवारी गाव व परिसरातील विहिरींची पाहणी केली. येत्या एक दोन दिवसात या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात नुकसान भरपाई दूरच

0
0
मंगळवारी दुपारी बीड बायपास रस्त्यालगत सूर्या लॉन्स समोरील वसाहतीत हाय व्होल्टेजमुळे टीव्ही., फ्रिज, कूलर, सेट टॉप बॉक्स, मोटार जळाल्याची घटना घडली. जीटीएलचे कर्मचारी काम करीत असताना, २२० व्होल्टच्या तारा एकमेकांना चिटकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप या रहिवाशांनी केला.

धर्मसंस्कार सोहळा वेरूळमध्ये सुरू

0
0
जनार्दन स्वामींच्या अनुष्ठान परंपरेनुसार अक्षयतृतियेनिमित्त धर्मसंस्कार सोहळ्याला खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रारंभ झाला. हा सोहळा ३० एप्रिल ते ७ मे दरम्यान होत आहे. खासदार खैरे आश्रमातील धार्मिक सोहळ्याला तब्बल पाच वर्षांनंतर उपस्थित राहिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images