Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एपीएल लाभार्थी धान्यापासून वंचित

$
0
0
राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारकडून फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे सव्वातेरा लाख केशरी रेशनकार्डाच्या लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही.

जायकवाडीचा साठा १२ टक्क्यांवर

$
0
0
उन्हाची तीव्रता वाढल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा दररोज तीन दशलक्ष घनमीटरने कमी होत आहे. धरणात मंगळवारी बारा टक्के पाणीसाठा होता.

कंत्राटी प्राध्यापकांची हायकोर्टात धाव

$
0
0
मराठवाडा व खान्देशातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या ५८ प्राध्यापकांनी, आपल्या सेवा मूळ नेमणूक दिनांकापासून नियमित करा, सेवेत कायम ठेवा, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

उद्या होणार चाळीस कोटींची उलाढाल

$
0
0
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर शहरात साडेतीनशे चार चाकी व हजार दुचाकी वाहनांची विक्री होणार आहे. त्यामुळे वाहनबाजारात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.

जमिनीच्या वादातून तणाव

$
0
0
बेगमपुरा भागातील गट क्रमांक ९९चा ताबा घेण्यावरून बुधवारी (३० एप्रिल) तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मीळ मालकाला या जमिनीचा ताबा देण्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते, मात्र तेथील रहिवाशांनी घरावर आपला अधिकृत ताबा असल्याचा दावा करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना तीव्र विरोध करीत हुसकावून लावले.

बांधकाम थांबविण्याचे आदेश

$
0
0
एन ४ येथील विद्यासागर हाउसिंग सोसायटीमधील बंगल्याचे बांधकाम थांबवण्याचे आदेश सिडको प्रशासकांनी बुधवारी (३० एप्रिल) सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना दिले आहेत. सोसायटीचे मुख्य प्रवर्तक पांडुरंग डक यांनी या प्रकरणी सिडको प्रशासकाकडे तक्रार केली होती.

पगारवाढीसाठी कामगार संपावर

$
0
0
पगारवाढीच्या मागणीसाठी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘लोम्बार्डीनी अ कोहलर’ कंपनीतील कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा सीटूने देत उत्पादन ठप्प झाल्याचा दावा केला आहे.

टेंडरमध्ये ‘सेटिंग’चा आरोप

$
0
0
‘भूमिगत’ गटार योजनेच्या टेंडर मध्ये पालिकेचे आयुक्त व स्थायी समितीच्या सभापतींचे सेटिंग झाले आहे. टेंडर मंजुरीच्या प्रक्रियेची चौकशी करा, अशी तक्रार आपण लोकायुक्तांकडे करणार आहोत, असा इशारा आमदार प्रदीप जैस्वाल यांनी बुधवारी पालिकेत पत्रकारांशी बोलताना दिला.

बैठकीचा निर्णय सभापतींचाच

$
0
0
भूमिगत गटार योजनेच्या टेंडरला मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेण्याचा निर्णय सर्वस्वी सभापतींचा होता, असे म्हणत पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या प्रकरणात स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न केला.

उपायुक्त पेडगावकर कार्यमुक्त

$
0
0
पालिकेचे उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना अखेर आज बुधवारी पालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या बदलीचे आदेश २७ एप्रिल रोजी प्राप्त झाले होते. पेडगावकर पालिकेच्या कारभारात वादग्रस्त ठरले होते.

विषय समित्यांवर युतीचे वर्चस्व

$
0
0
महापालिकेच्या विविध विषय समितींच्या सदस्यांची नियुक्ती बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सर्वच विषय समितींवर युतीचे वर्चस्व असल्यामुळे विषय समितींचे सभापती युतीचेच होणार हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस विरोधी घोषणा

$
0
0
स्थायी समितीमध्ये संधी न दिल्यामुळे संतापलेल्या दलित नगरसेवकांनी पालिकेच्या सभागृहातच काँग्रेस विरोधी घोषणा दिल्या. सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पालिकेच्या आवारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पुतळ्याला फाशी दिली.

‘भूमिगत’ चे सावट

$
0
0
स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवर बुधवारी पालिकेत ‘भूमिगत’ चे सावट होते. भूमिगत गटार योजनेच्या टेंडरला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नाट्यपूर्ण मंजूरी देण्यात आली.

स्थायीवर तुपे, जैस्वाल, कोकाटे

$
0
0
महापालिकेच्या स्थायी समितीवर बुधवारी त्र्यंबक तुपे, अनिल जैस्वाल, काशिनाथ कोकाटे आदी आठ सदस्यांची वर्णी लागली. सभापतीपदाची निवडणूक आता २ जून रोजी होणार आहे.

कुशल मनुष्यबळ निर्मिती सर्वांची जबाबदारी

$
0
0
शहराची वाटचाल ‘ऑटोमोबाईल हब’ च्या दिशेने सुरू आहे. नवनवीन कंपन्या येत आहेत. त्यासाठीच औरंगाबादमध्ये कुशल मनुष्यबळाची फार मोठी गरज आहे. अर्थात, कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांच्याच सांघिक प्रयत्नांमुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होऊ शकते.

दररोज जगण्यासाठी लढाई

$
0
0
शहरातील चार ठिकाणी भल्या सकाळी भरणाऱ्या बाजारात दररोज शेकडो कामगार श्रम विकण्यासाठी येतात. महिनाभर काम मिळेल याची कोणालाच खात्री नाही. पण पोट भरत आहे, याचे समाधान. नाक्यावर रोजंदारी शोधणाऱ्या बहुतांश कामगारांना रेशनकार्डावरील धान्याशिवाय दुसरे शासकीय लाभ मिळत नाहीत.

५० टक्के कामगार असंघटित

$
0
0
जिल्ह्यात एकूण काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी निम्मे लोक हे असंघटीत कामगार आहेत. यामध्ये विविध आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, टेलर आदींचा समावेश होतो, अशी माहिती कष्टकऱ्यांचे नेते सुभाष लोमटे यांनी दिली.

पंधरा स्कॉर्पिओसाठी बुकिंग

$
0
0
यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बिडकीन भागातील शेतकऱ्यांच्या अंगणात पंधरा स्कॉर्पिओ गाड्या उभ्या राहणार आहेत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनींचा मोबदला वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

पैसे घेऊन करू काय?

$
0
0
‘अहो जीवनभर ज्या मातीत जगलो, ती मायमाती आता हिरावून गेली. मात्र मिळालेल्या पैशामध्ये आम्ही पुन्हा जमीन खरेदी करू. सातबाऱ्यावर नाव लावू,’ ठकुबाई धोंडगे बोलत होत्या. तर मुरली शेकाटकर म्हणाले, ‘भूसंपादनासाठी संमती पत्रावर अंगठे दिले. आता शेवटी लाखो रुपयांच्या कागदचा तुकडा हातात आला. काय करू पैसे घेऊन? अहो जमिनीशी असलेले आमचे नाते आता संपले आहे.’

फाइव्ह स्टार हॉटेल उभारण्याचे स्वप्न

$
0
0
डीएमआयसी प्रकल्पात ८० एकर जमीन गेली. परंतु मिळणाऱ्या पैशातून दुसरीकडे ५० एकर शेती घेण्याचा विचार आहे. त्याचबरोबर बिडकीनला कपड्यांचे दालन सुरू करणार असून, पंचतारांकित हॉटेलही उभारण्याची सुप्त इच्छा आहे...असे स्वप्न आहे कृष्णा भगवानराव चव्हाण या तरुणाचे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images