Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत आराखड्यात यंदा २७ टक्क्यांची वाढ

0
0
औरंगाबाद जिल्ह्याच्या पत आराखड्यात यंदा २७ टक्के वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेने सर्व बँकांच्या सहकार्याने २०१४–१५ या वर्षासाठी ४१८१ कोटी २० लाख रुपयांचा पत आराखडा तयार केला आहे.

‘सिद्धार्थ’मध्ये बछड्यांचा आईसोबत फेरफटका

0
0
सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या वाघांचे बछडे पिंजऱ्याच्या आवारात आईसोबत फेरफटका मारत आहेत. या बछड्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ३६ गावांत ६१ टँकरने पाणीपुरवठा

0
0
औरंगाबाद विभागामध्ये पुन्हा टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, विभागात एप्रिलच्या अखेरीस १०८ गावे व ९५ वाड्यांना १४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर व पैठण या दोन तालुक्यांमध्ये पाण्याची परिस्थती बिकट आहे.

अक्षय्य तृतीयेला शंभरावर घरांचे बुकिंग

0
0
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शंभराहून अधिक घराचे बुकिंग झाले असून, अनेकांनी गृहप्रवेश केला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात या मुहूर्तावर तब्बल ४५ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक बाजारातही ग्राहकांची मोठी गर्दी होती.

तलावातील गाळ उपशाकडे प्रशासनाचा काणाडोळा

0
0
जिल्ह्यातील तलावातील गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. तलावांमधून पावसाळ्याआधी गाळ काढण्यासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

भगवान परशुराम जयंती उत्साहात

0
0
भगवान परशुराम यांची जयंती शहरात विविध ठिकाणी ‌उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटनांतर्फे परशुराम यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त संघटनांतर्फे वाहन रॅली तसेच ढोलताशांच्या गरजात मिरवणूक काढण्यात आली.

अंबर दिव्यांचा आदेश अंबरात!

0
0
सर्वोच्च न्यायलयांच्या निर्देशानंतर शासनाने अंबर दिव्यांचा आदेश काटेकोरपणे अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काढलेला आदेश संबंधित विभागांपर्यंत पोहोचला नसल्यामुळे अमलबजावणीसाठी चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

‘चेर्नोबिल’सारखा अपघात एखादाच, विरोध निरर्थक

0
0
चेर्नोबिलसारखा एकादाच अपघात होतो. शेवटी अपघात हा अपघात असतो आणि तो कधीही कुठेही होऊ शकतो. मात्र त्यामुळे वीज निर्मितीसाठी अणुऊर्जेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.

कुलगुरू कोण? उत्सुकता शिगेला

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी १६ मे रोजी ‘पर्सनल इंटरअॅक्शन’ची (अंतरक्रिया) प्रक्रिया होणार आहे. यासाठी तब्बल २९ जणांना शोध समितीचे बोलावणे आले असून यातील पाच जे सहा याच विद्यापीठातील आहेत.

जायकवाडीच्या उपसा विहिरीवर लक्ष द्या

0
0
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात निर्माण झालेला अळ्यांचा प्रादूर्भाव काळजी करण्यासारखाच आहे. त्यामुळे जायकवाडीती प्रकल्पातील ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा केला जातो, त्या विहिरीवर लक्ष द्या.

पाण्याचा दर्जा काळजी करण्याजोगा

0
0
जायकवाडी धरणातील पाण्याचा दर्जा हीच काळजी करण्यासारखी बाब आहे. त्यामुळेच अळ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अळ्यांची समस्या निर्माण होणे ही आपल्यासाठी दुसरी वॉर्निंग आहे, असे मत पालिकेच्या पाणी विषयक दक्षता समितीचे सदस्य प्रा. उमेश कहाळेकर यांनी व्यक्त केले.

नेत्रदान चळवळीला पावलोपावली खिंडार

0
0
शहरातील नेत्रदान चळवळ मरणासन्न अवस्थेत आली असून, मागच्या दोन महिन्यांत केवळ एका नेत्रपेढीत दोन जणांचे नेत्रदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी पाचपैकी तीन नेत्रपेढ्यांचे परवाना नूतनीकरण सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत रखडले आहे.

तोंडची साखर पळवली

0
0
जिल्ह्यातील कारखानदाराने साखर पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर उपलब्ध नाही. राज्य शासनाने राज्य सहकारी साखर महासंघाला साखर उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती; परंतु महासंघानेही याकडे पाठ फिरवल्याने लाभार्थींना साखरेपासून वंचित राहावे लागत आहे.

गारपीटग्रस्तांच्या आत्महत्या थांबवा

0
0
गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना कृषी आणि महसूल यंत्रणेने पंचनाम्यांमध्ये जास्त नुकसान दाखविले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने गारपीटग्रस्त शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित आहे.

अकरा हजारांची ऑनलाइन फसवणूक

0
0
‘बँक अधिकारी आहे,’ असे सांगून कोणी तुमच्या एटीएम कार्डविषयी तुम्हाला माहिती मागत असेल तर सावधान. कारण बँक अधिकारी असल्याचा बनाव करुन एका भामट्याने, अकरा हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचे समोर आले आहे.

आयुक्त, तज्ज्ञांची फारोळ्याला धाव

0
0
पालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात अळ्या झाल्याचे प्रकरण ‘मटा’ने उघडकीस आणल्यानंतर आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी महाराष्ट्र दिनी अधिकाऱ्यांसह केंद्राला भेट दिली.

कोट्यवधींचा तलाव घोटाळा

0
0
जालना जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी केला. या घोटाळ्यात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह तीन अधिकारी आणि तीन मजूर संस्थांच्या अध्यक्षांच्या घरांवर धाडी टाकून तब्बल नऊ किलो सोने आणि लाखोंची रोकड जप्त करण्यात आली.

दुसऱ्या दिवशीही झडती सुरूच

0
0
जालना जिल्ह्यातील सिंचन घोटाळ्यात अटक असलेल्या आरोपींकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. अॅन्टी करप्शन ब्युरोने शनिवारी केलेल्या तपासणीत एका अधिकाऱ्यांच्या बँक लॉकरमध्ये एक किलो सोन्यासह सुमारे २७ लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून आतापर्यंत एकूण पावणे चार कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे.

दलित महिलेचा अंत्यविधी रोखला

0
0
नगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) गावात प्रेमप्रकरणावरून दलित तरुणाची हत्या झाल्याप्रकरणी राज्यभरातून प्रतिसाद उमटत असतानाच, दलित महिलेचा अंत्यविधी रोखण्याचा प्रकार शनिवारी याच जिल्ह्यातील चिंभळा (ता. श्रीगोंदा) येथे घडला.

बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस

0
0
बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीज कोसळल्याने कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images