Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जेईई-मेन निकालात औरंगाबाद आघाडीवर

$
0
0
अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन’चा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. अॅडव्हान्ससाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार मेपासून नोंदणी करता येणार आहे.

अट्टल वाटमाऱ्या तान्या जेरबंद

$
0
0
अट्टल वाटमाऱ्या तान्या याला जेरबंद करण्यात अखेर शनिवारी पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला संभाजीनगर परिसरात नागरिकांसह फिल्मी स्टाइल पाठलाग करून अटक केली.

पीटी एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0
एमबीए सीईटी परिक्षेचा ​निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परिक्षेत पी. टी. एज्यूकेशनच्या तीन विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादीत केले. स्पर्धात्मक परीक्षा आणि शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पी. टी. एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

नेत्र रुग्णालयाचा विस्तार करावा

$
0
0
महापालिकेने पायाभूत सुविधेसह इमारत उपलब्ध करुन दिल्यामुळे लॉयन्स नेत्र रुग्णालयाचा प्रकल्प अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू आहे. नांदेडच्या लॉयन्स सदस्याला वरिष्ठ कार्यकारिणीत स्थान मिळणार असल्याने स्थानिक लायन्स क्लबला भविष्यात चांगला निधी मिळण्याची शक्यता आहे.

आष्टी येथील खून प्रकरणी आणखी पाच जणांना अटक

$
0
0
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव संजय उर्फ बुट्या गायकवाड खून प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तुल, १४ धारदार शस्त्रे आणी गुन्ह्यात वापरलेली टाटा सफारी कार जप्त केली.

फाशी घेतलेल्या ‘त्या’ तरुणाचा खून

$
0
0
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत मंगळवारी अज्ञात युवकाचे प्रेत आढळून आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शव विच्छेदनाच्या अहवालातून त्या अज्ञात युवकाची गळा दाबून खून झाल्याचे समोर आले आहे.

जलसंधारणाच्या कामासाठी लोकवाटा द्या

$
0
0
लातूर तालुक्यात आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्यावतीने जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. तावरजा ते मांजरा नदीच्या संगमापर्यंत नदीच्या खोलीकरणाचा आणि नदी पुनरुजीवीत करण्याच्या कामाला वेग आला आहे.

महामार्गाच्या कामाला गती

$
0
0
औरंगाबाद सोलापूर महामार्गाच्या बीड जिल्ह्यातील कामाला गती येत आहे. या मार्गावर बीड शहराबाहेरून काढण्यात येणाऱ्या वळण मार्गासह रस्त्याच्या भूसंपादनाची संयुक्त मोजणी झाली आहे.

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी

$
0
0
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्स २०१४ ही परीक्षा प्रथमच घेण्यात आली. त्याचा निकाल सीबीएससी बोर्डाने जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी राजर्षी शाहू कॉलेजमधील ३३० विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १३० विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

‘मुक्तिसंग्रामातील वस्तूंची सत्यता पडताळून घ्या’

$
0
0
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दुर्मिळ कागदपत्रे आणि वस्तुंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारा, अशी सूचना वस्तू संग्रहालयाच्या उभारणीच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या समितीमधील सदस्यांनी शनिवारी (३ मे) केली.

सचिवांना हजर राहण्याचे आदेश

$
0
0
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी ‘नरेगा कायदा २००५’मधील तरतुदीनुसार करण्यात यावी, यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे. या याचिकेत प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने शासनाच्या नियोजन विभागाच्या सचिवांना पाच मे रोजी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

कोरडवाहू शेती अभियान रेंगाळले

$
0
0
राज्यातील कोरडवाहू क्षेत्राचा विकास करण्यासाठी कृषी मंत्रालयाने तब्बल दहा हजार कोटी रुपयांचे कोरडवाहू अभियान सुरू केले; मात्र एक वर्षानंतरही अभियानात भरीव सुधारणा झाली नाही. राज्यातील १६२ गावात प्रायोगिक तत्त्वावर अभियान सुरू असून दरवर्षी प्रत्येक गावासाठी एक कोटी रुपये खर्च केला जात आहे.

सलमान खानने दिलेल्या टाक्या पडून!

$
0
0
अभिनेता सलमान खान यांनी गेल्यावर्षी दुष्काळात मदतीसाठी पाठवलेल्या पाण्याच्या टाक्या महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये पडून आहेत. मागणीच नसल्यामुळे टाक्या दिल्या नाहीत, असा दावा पालिकेचे अधिकारी करीत आहेत. त्यामुळे २५ ते ३० टाक्या थप्पीला लागल्या आहेत.

पर्यटनस्थळांना हिरवेगार करणारी मोहीम

$
0
0
येत्या पावसाळ्यात ‘शतकोटी वृक्ष लागवड योजने’अंतर्गत वन विभाग २० लाख रोपांची लागवड करणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात उपयुक्त झाडांची संख्या वाढवण्यासाठी विभाग विशेष प्रयत्न करीत आहे.

सरकारी नोकरीच्या जाहिरातीतून भुलथापा

$
0
0
फसव्या जाहिरातींद्वारे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. यासह इमारतीवर टॉवर लावा आणि लाखो रुपये कमवा, चेहरा ओळखा आदी जाहिरातीची शहानिशा करूनच नागरिकांनी व्यवहार किंवा अर्ज करावेत, खोट्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

प्रायोगिक ‘कॉन्शन्स’ला रसिकांचा प्रतिसाद

$
0
0
तरल मानवी नातेसंबंधाचा वेध घेणाऱ्या ‘कॉन्शन्स’ नाटकाचा प्रयोग रसिकांना विशेष भावला. अश्वत्थ महोत्सवात अमेय दक्षिणदास लिखित या नाटकाचा शनिवारी सायंकाळी तापडिया नाट्यगृहात प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या प्रायोगिक नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पाण्याच्या टाक्या स्वच्छतेचे वेळापत्रक पाळण्याचे आदेश

$
0
0
पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे वेळापत्रक पाळा. ठराविक दिवसांनंतर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

हर्सूल तलावात तरुणाची आत्महत्या

$
0
0
बेपत्ता असलेल्या एका २२ वर्षांच्या तरूणाचा मृतदेह शनिवारी (३ मे) हर्सूल तलावात सापडला. अवघ्या अकरा दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस अधिक तपास करत आहे.

चार उद्याने नव्या रूपात

$
0
0
महापालिकेची चार उद्याने नव्या रुपात बच्चे कंपनीच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे बालगोपाळांची उन्हाळ्याची सुट्टी सुसह्य ठरण्याची शक्यता आहे. उद्यान विकासावर विशेष लक्ष देण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरवले असून त्यानुसार सिद्धार्थ उद्यान, नेहरू बालोद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान आणि बोटॅनिकल गार्डन या चार उद्यानात कारंजे, धबधबे, लॉन्स आणि खेळणी बसवण्यात आली आहे.

साक्षीला जागतिक विजेतेपद

$
0
0
सिंगापूर येथे झालेल्या जागतिक हौशी बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगाबादच्या साक्षी चितलांगे हिने विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. पुण्याच्या सलोनी सापळे हिने उपविजेतेपद मिळवले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images