Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा

$
0
0
उस्मानाबाद व कळंब तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती व फळबागांचे ‘न भूतो’ असे नुकसान झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्र कमी दाखविण्याचे हेतूत: कारस्थान केले आहे.

शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते एकत्र

$
0
0
देशात शेतकऱ्यांसाठी लाभदायक सरकार येण्याची चिन्हे दिसत आहेत. येणाऱ्या सरकारकडे मागण्यापेक्षा त्यांनी कसे द्यावे हे सांगण्याची भूमिका वठविण्यासाठी शरद जोशी यांच्या जुन्या कार्यकर्त्याना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

दोन इमारतींवर हातोडा

$
0
0
मंजूर नकाशाविरुद्ध अनाधिकृत बांधकाम झालेल्या डॉक्टर लेनमधील दोन इमारतींवर सोमवारी महापालिकेच्या अनाधिकृत बांधकामविरोधी पथकाने हातोडा चालवला. डॉक्टर लेन आणि मनपा क्षेत्रातील इतर परिसरातील अनाधिकृत किंवा मंजूर नकाशाविरुद्ध बांधकाम करणाऱ्या मालमत्ताधारकांनी आपल्या इमारती नियमित करण्यासाठी तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

६० हजार लोकसंख्येसाठी एकच पत्रपेटी

$
0
0
६० हजार लोकसंख्या असलेल्या सातारा देवळाईसाठी एकच पत्र पेटी असून, २५ पैशाचे कार्ड टाकण्यासाठी सातारा तांडा व देवळाई येथील नागरिकाना ५ किलोमीटरचे अंतर कापून यावे लागते. पोस्टाच्या कारभारामुळे 'चार आने की मुर्गी बारा आने का मसाला,' याचा प्रत्यय येथील नागरिकांना पदोपदी येत आहे.

समर्थ विद्यालयाच्या शाळा खोलीला आग

$
0
0
नगर परिषदेच्या स्वामी समर्थ विद्यालयातील खोलीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत खोलीतील वह्या, पुस्तके, लेझिम, ढोल, कॅरम, अपंग मुलांचे साहित्य जळून खाक झाले.

दोन महिला मुलांसह परागंदा

$
0
0
वाळूज परिसरातून गेल्या दोन दिवसांत तब्बल आठ जण बेपत्ता झाले असून त्यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. एक महिला दोन मुलींना घेऊन निघून गेली असून नुकतेच लग्न ठरलेला एक तरूणही गायब झाला आहे.

मिटमिटा डोंगरात अवैध वृक्षतोड

$
0
0
मिटामिटा परिसरातील वन विभागाच्या ताब्यातील डोंगरात सर्रास वृक्षतोड सुरू आहे. विटभट्ट्यांसाठी वापरण्यात येणारी माती व बांधकामासाठी आवश्यक असलेला मुरूम मिळवण्यासाठी ही वृक्षतोड केली जात आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

सिल्लोड तालुक्यातील शाळा दुरुस्तीकडे दुर्लक्ष

$
0
0
मार्च महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. या शाळांची दुरुस्ती सुटीतच करण्याची गरज आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थ्यांना मोकळ्या पटांगणात बसून अध्ययन करावे लागेल.

पाच लाख औरंगाबादकर दमाग्रस्त

$
0
0
गेल्या दहा वर्षांत दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले असून, एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के नागरिक म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे पाच लाख नागरिक दमाग्रस्त आहेत. यामध्ये पाच टक्के दम्याचे रुग्ण हे धुम्रमानामुळे होणाऱ्या ‘सीओपीडी’चे (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज) आहेत.

शेंद्र्यातील लघुउद्योजक ‘त्या’ स्किमला मुकणार

$
0
0
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योजकांसाठी गाळे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया एमआयडीसीने हाती घेतली आहे. पुढील महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हे गाळे वाळूजमध्ये असलेल्या लघुउद्योजकांनाच मिळणार असल्याने शेंद्रा एमआयडीसीमध्ये जागेसाठी अर्ज केलेल्या लघुउद्योजकांना मात्र मुकावे लागणार आहे.

मराठवाड्यात यंदा अशीही टंचाईमुक्ती!

$
0
0
खरिपाच्या पैसेवारीच्या आधारावर महाराष्ट्रात यंदा तब्बल दहा हजारांवर गावांत सरकारने टंचाई सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. मराठवाड्यात टँकर सुरू करण्याची वेळ येऊनही विभागातील एकाही गावांत यंदा टंचाई सदृश स्थिती नाही. त्यामुळे विभागाला टंचाई सदृश परिस्थितीमुळे मिळणारे लाभ विभागाला मिळणार नाहीत.

रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट अडकली ‘तांत्रिक’ अडचणीत

$
0
0
रेल्वे स्टेशनवर महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांसाठी लिफ्टची उभारणी पूर्ण झाली, मात्र अद्यापपर्यंत ही लिफ्ट सुरू झालेली नाही. तांत्रिक कारणांमुळे ही लिफ्ट अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.

४३ लाख रुपयांची वाळू जप्त

$
0
0
वाळू तस्करांनी उपजिल्हाधिकारी एन. एस. उबाळे यांच्यावर पाच दिवसापूर्वी केलेल्या हल्ल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महसूल विभागाच्या पथकाने गोदावरी नदी पात्रालगतच्या गावांमध्ये सोमवारी छापे टाकून १४४० ब्रास वाळू साठा जप्त केला.

उपायुक्त पेडगावकर अद्यापही पालिकेतच

$
0
0
मनपा उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या बदली संदर्भात शासनाने काढलेल्या आदेशाला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. ३० एप्रिल रोजी पेडगावकरांना कार्यमुक्त करण्याचे आदेश असताना त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.

झेडपीत १७ मेपासून बदल्यांची सुगी

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील सार्वजनिक बदल्यांचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया १७ मेपासून तर तालुकास्तरावरील बदल्या २६ मेपासून सुरू होतील.

चांदीवालांच्या बार कौन्सिलला कानपिचक्या

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडीपाचे न्यायमूर्ती के. यु. चांदीवाल यांना सोमवारी उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने निरोप देण्यात आला. या वेळी वकीलांनी समजून, सामावून घेतल्याबद्दल न्यायालयीन कारकीर्द चांगली व समाधानी राहिल्याचे न्या. चांदीवाल यांनी मनमोकळेपणाने नमूद केले.

मुद्रांक कार्यालयात महिनाभरात सुविधा

$
0
0
शासनाने जिल्हा नोंदणी विभागाकडे सन २०१३- २०१४ या आर्थिक वर्षासाठी दिलेली उद्दिष्टपूर्ती झाली आहे. यावर्षीचे नवीन उद्दिष्ट गाठताना कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी डी. वाय. डामसे यांनी स्पष्ट केले.

नांदेडहून अमृतसरसाठी अकोलामार्गे प्रीमियम रेल्वे

$
0
0
उन्हाळी सुट्टयांमुळे नांदेड- अमृतसर मार्गावर विशेष प्रिमीयम रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे अकोलामार्गे धावणार आहे. या रेल्वेसाठी फक्त ऑनलाईन आरक्षण करावे लागेल व तिकिट रद्द होणार नाही.

वाळूज महानगरात आजपासून सिटीबस

$
0
0
सिडकोच्या वाळूज महानगरमधील नागरिकांसाठी मंगळवारपासून (६ मे) सिटीबस सुरू केली जाणार आहे. ही बस औरंगपुऱ्यातून निघून वडगाव कोल्हाटीपर्यंत जाईल. या बसच्या दिवसभरात सोळा फेऱ्या होणार आहेत.

शिक्षण विभागातील प्रस्ताव ई-मेलद्वारेच सादर करा

$
0
0
शिक्षण विभागात सादर होणारे प्रस्ताव यापुढे इ मेलद्वारेच पाठवावेत, याचे पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी काढले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images