Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लेखाधिकाऱ्यांविरोधात नगरसेवकाची याचिका

$
0
0
पालिकेचे लेखाधिकारी संजय पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक बेहेडे यांनी हायकोर्टात याचिका सादर केली आहे. शैक्षणिक पात्रता नसताना पवार यांना लेखाधिकारीपदावर नियुक्त केल्याचा आक्षेप त्यांनी याचिकेत घेतला आहे. सोमवारी एका पत्रकार परिषेदत बेहेडे यांनी ही माहिती दिली.

पडेगावातील पाच एकर जागा क्रीडा खात्याचीच

$
0
0
पडेगाव परिसरातील क्रीडा खात्याच्या ५ एकर २६ गुंठे जागेवर नदीम अहमद यांनी केलेला दावा खर्चासह सिनिअर डिव्हिजनचे न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळून लावला आहे. आता या जागेवर क्रीडा खात्याचा मालकी हक्क सिद्ध झाला आहे.

४० पैकी २६ एमएलडीच पाणी मिळते

$
0
0
नक्षत्रवाडी येथून सिडको हडकोसाठी एक्सप्रेस जलवाहिनीतून रोज चाळीस दशलक्ष घन मीटर (एमएलडी) पाणी सोडले जाते. पण सिडको एन - ५ च्या पाण्याच्या टाकीपर्यंत फक्त २६ एमएलडी एवढेच पाणी येते.

घटस्फोट‌ित पत्नीचा पोलिसाला तडाखा

$
0
0
अयोध्यानगर परिसरातून एका पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी घटस्फोटीत पत्नी आणि तिच्या भावांनी परस्पर विकल्या प्रकरणी सिडको एन-७ पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाहन उभे करण्यावरून ‘दे दणादण’

$
0
0
रस्त्यात वाहन उभे करण्यावरुन जीप चालक व दुचाकीस्वारामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी समर्थनगर भागात घडला. वाहतूक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला.

मृतांच्या वारसाला पावणेआठ लाखांची नुकसान भरपाई

$
0
0
ट्रक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या वारसांना ट्रकमालक, चालक व विमा कंपनी यांनी ७ लाख ७३ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावेत, असे आदेश मोटार अपघात न्यायाधीकरणाचे चेअरमन एस. एम. कोल्हे यांनी दिले. नोव्हेंबर २०१० रोजी जालनारोडवरील हसनाबाद वाडी येथे हा अपघात झाला होता.

सरकारी कार्यालयातून तक्रारपेट्या बेदखल

$
0
0
सर्वसामान्यांच्या अडचणींना कुणी वाली उरला नाही तर दाद मागण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक तक्रारपेटी. सरकारी कार्यालयांमध्ये तक्रारपेटी ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. औरंगाबाद शहरातील बहुतांश कार्यालयात या पेट्यांचीच दखल घेतली जात नाही.

क्रीडा शिक्षकांनाही मिळणार राज्य पुरस्कार

$
0
0
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच आता राज्यभरातील क्रीडा शिक्षकांना शासनातर्फे पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यस्तरासाठी पन्नास हजार, तर जिल्हास्तरावर दहा हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.

पाणीवाटपाच्या नियमांची अधिसूचना १५ दिवसांत

$
0
0
समन्यायी पाणी वाटपासंदर्भातील महाराष्ट्र जलसंपत्ती कायद्यातील नवीन नियमांची अधिसूचना येत्या १५ दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, अशी हमी राज्य शासनाचे अॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा यांनी मुंबई हायकोर्टात घेतली.

‘अजित पवारांची नार्को टेस्ट करा’

$
0
0
‘सुप्रिया सुळेंना मतदान केले नाही तर तुमच्या गावचे पाणी बंद करेल, अशी धमकी देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे सत्य बाहेर येईल. माझे म्हणणे खोटे ठरले, तर मी राजकीय संन्यास घेईल, असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले. ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.

पाच दिवसांपासून पाणी नाही

$
0
0
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मेहेरनगर - आदिनाथनगर भागातील नागरिकांना पाच दिवसांपासून पाणीच मिळालेले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नळाला पाणी येत नाही आणि रस्त्याच्या कामामुळे टँकरही येत नाही, अशी व्यथा नागरिक मांडू लागले आहेत.

जलवाहिनीत शिरले ड्रेनेजचे पाणी

$
0
0
जयभवानीनगर भागातील सिडकोच्या तेराव्या योजनेतील नागरिक दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत. दीड महिन्यापासून या परिसरातील सुमारे शंभरावर घरांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा समाना करावा लागत आहे.

अनिर्बंध कामांना अंकुश

$
0
0
डीएमआयसी व शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे शहर व परिसराचा वेगाने विकास होत आहे. हा विकास सुनियोजित व्हावा यासाठी शेंद्रा परिसरातील नऊ गावांचा विकास आराखडा एक महिन्यात तयार होणार आहे.

शिक्षण हक्काला शाळांचा ठेंगा

$
0
0
‘आरटीई’अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील शाळांनी कागदापुरतीच मर्यादित ठेवली आहे. जिल्ह्यात ३८० शाळांमध्ये तीन हजार प्रवेश अपेक्षित असताना शाळांनी केवळ ३५ प्रवेशांवर बोळवण केल्याचे समोर आले आहे.

सामाजिक बांधिलकीचा अथक ‘प्रयास’

$
0
0
पाच वर्षांपूर्वी एनसीसीच्या दोन विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेल्या ‘प्रयास युथ फाउंडेशन’चे काम व्यापक झालंय. गोगाबाबा टेकडीवर वृक्ष लागवडीच्या मोहिमेतून कामाला सुरुवात केलेल्या ‘प्रयास’मध्ये तब्बल १०० तरुण सामाजिक बांधिलकीतून परिश्रम करीत आहेत. या उन्हाळ्यात रोपांना पाणी घालण्याचे काम तरुण निष्ठेने करीत आहेत.

सालगड्याला पाहिजे पगारवाढ, मोबाईल, मोटरसायकल

$
0
0
दुष्काळापाठोपाठ गारपीट व अवकाळी पावसाने हताश झालेला शेतकरी सालकरी गड्याच्या मनमानी व अवाजवी मागण्यांमुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यांच्या मागण्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे.

सोन्याच्या विटांची चौकशी होणार

$
0
0
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना तांडा येथे सापडलेल्या सोन्याच्या विटांची अखेर चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पवनातांडा गाव हे आंध्र प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर बसलेले एक दुर्गम खेडेगाव आहे.

तीन महिन्यांच्या मुलीला सोडून आई पळाली

$
0
0
शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी विभागातील औषधी वाटप परिसरात तीन महिन्यांच्या मुलीला सोडून तिची आई पळून गेली आहे. याप्रकरणी कुठलाही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही.

परभणीत गारपीटग्रस्तांचे आठ हजार अर्ज

$
0
0
मदतीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी मदतीसाठी पुन्हा अर्ज केले आहेत. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून अर्ज देण्यासाठी रांगा लावल्या असून अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

नळदुर्ग नगरपालिकेचे रेकॉर्ड ‘राम भरोसे’

$
0
0
‘शोधा म्हणजे सापडेल,’ असा अजब कामकाजाचा प्रकार सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग नगरपालिकेत पाहावयास मिळत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images