Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बनावट पंचनाम्यांची चौकशी करण्याची मागणी

$
0
0
गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे बनावट पंचनामे तयार करण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य शामराव उढाण यांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली.

राठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस

$
0
0
मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते.

प्रेमचंद कांबळेला मिळाली ३३ वर्षे कारावासाची श‌िक्षा

$
0
0
मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी युनिक ग्रुपचा मालक, संचालक प्रेमचंद अशोक कांबळे याला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३३ वर्षे ७५ दिवस शिक्षा ठोठावली आहे.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांना वर्षानंतर तात्पुरते संमतीपत्र

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पेट-२’ मधील विद्यार्थ्यांना तात्पुरते संमतीपत्र देण्यास अखेर मुर्हूत मिळाला आहे. तब्बल एक वर्षानंतर तात्पुरते संमतीपत्र हाती पडल्याने संशोधक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.

टंचाई आढावा बैठकीत पडला तक्रारींचा पाऊस

$
0
0
औरंगाबाद तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी तक्रारींचा पाऊस पाडला. आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात झालेल्या बैठकीत दोघांची पाण्यावरून चांगलीच हमरीतुमरी झाली.

माजी महापौरांच्या प्लॉटसाठी पूल

$
0
0
शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांच्या फक्त एका प्लॉटवर जाण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाने समर्थनगरमध्ये नाल्यावर पुल बांधण्याची परवानगी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

...प्रयत्न माझा देव !

$
0
0
मला आठवतात ते माझे बालपणीचे दिवस. आम्ही सात भावंडे, परिस्थिती हलाकीची. वडील रात्रंदिवस शेतीकाम व गुरेढोरे यामध्ये व्यस्त असत. तेव्हा आमच्या वाडीमध्ये झेडपीची शाळा नव्हती.

रिक्षा थांबे नसताना चालकांवर कारवाई का?

$
0
0
शहरात महापालिकेने नो पार्किंगचे झोन जाहीर केले नाहीत, रिक्षांसाठी थांबे निश्चित करण्यात आलेले नाही. तरीही विविध कलमांतर्गत वाहतूक शाखेकडून कारवाई होत असल्याबद्दल रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे. या कारवाईचा पुनर्विचार करण्याची मागणी समितीने केली आहे.

पहिले अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन २२ जूनला

$
0
0
‘आरोग्य जागृती’ मासिकाच्या वतीने २२ जून रोजी पहिले अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. निराला बाजार परिसरातील तापडिया नाट्य मंदिरात हे एकदिवसाचे संमेलन होणार आहे.

अन्न सुरक्षेसाठी कष्टकऱ्यांची निदर्शने

$
0
0
अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशन दुकानावरून धान्य मिळावे, या मागणीसाठी मोलकरणी व घरेलु कामगार संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नेट-सेट बेरोजगारांची नोंदणी करण्याचे निर्देश

$
0
0
नेट-सेटधारक उमेदवार असतानादेखील काही कॉलेजांमधून अर्हताधारक प्राध्यापकांची नियमित स्वरुपाची भरती केली जात नाही. यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी उच्चशिक्षण विभाग विद्यापीठांमार्फत बेरोजगार नेट-सेटधारकांची नोंदणी करणार आहे.

तीस हजारांचा ऐवज घरफोड्याकडून जप्त

$
0
0
हर्सूल भागात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास गुन्हेशाखेच्या पथकाने सोमवारी छावणी भागात अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून तीस हजारांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाई साठी बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विश्वस्त निवडीचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

$
0
0
श्री गुरु गणेश स्थानकवासी जैन शिक्षण समितीच्या विश्वस्त निवडीचा हायकोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. श्री. गुरु गणेश स्थानकवासी जैन शिक्षण समिती, परतूर ( जि.जालना) आणि श्री गुरुगणेश नगर औरंगाबाद या संस्थेतील विश्वस्त हे तहहयात असल्याबाबतचा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.

दीड लाखांसह मंगळसूत्र चोर जेरबंद

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल मंगळसूत्र चोराला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. संबंधित आरोपीकडून चार घटनांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरीची मोटारसायकल वापरुन आरोपीने मंगळसूत्र चोरीचा धडाका लावला होता.

दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र पळवले

$
0
0
ज्वेलर्सच्या दुकानात जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता एन ९ भागात घडली.

एटीएमधारकाला ऑनलाइन ३२ हजाराचा गंडा

$
0
0
बँक मॅनेजरच्या नावाने फोन करुन एटीएम कार्डबाबत माहिती घेऊन तरुणाला ऑनलाइन ३२ हजाराला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट्यवधीच्या मळ्यात करिना, दीपिका

$
0
0
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गजाआड असणाऱ्या श्रीधर तुपेची कोळघर येथे कोट्यवधी रुपयांची आधुनिक शेती आहे. याठिकाणी अलिशान गोठा असून त्यात करिना, करिष्मा आणि दीपिका मोठ्या आरामात राहतात. आश्चर्य वाटते आहे ना? पण खरे आहे.

डॉक्टरला दहा लाख रुपयांचा दंड

$
0
0
अधिकार नसतानाही रुग्णावर उपचार केले आणि दुसरीकडे उपचारासाठी जाऊ न देता पैशासाठी सातत्याने अडवणूक केली. परिणामी, रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सोयगाव येथील फर्दापूर रोडवरील विवेकानंद पॉलीक्लिनिकच्या डॉ. दामोधर डी. पाटील यांना औरंगाबाद जिल्हा ग्राहक मंचाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला.

जालना रोड पावसाळ्यानंतरच

$
0
0
शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गाजावाजा करून २१ कोटी दिल्याचा दावा पुरता फोल ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितीतील पाच रस्ते दुरूस्तीसाठी नॉन प्लॅनमधून मंजूर केलेल्या रस्त्यांना केवळ २१ लाख रुपयेच मिळाले आहेत.

‘आरटीई’च्या प्रवेशासाठी पथके

$
0
0
‘आरटीई’ कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा दाद देत नसल्याने, शिक्षण विभागाच आता पुढे आला असून, विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथके तयार करण्यात येणार आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images