Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

क्लोरिनचा डोस तिप्पट वाढवला

$
0
0
जायकवाडीच्या धरणातील रॉ वॉटरचा दर्जा कमालीचा घसरला असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी फोराळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनच्या डोसमध्ये तिप्पट करण्यात आला आहे. याशिवाय अळ्यांच्या निर्मूलनासाठी क्लोरिन डाय ऑक्साइडचे डोसही दिले जात आहेत.

पंप हाउस, शुद्धीकरण केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0
महापालिकेचे जायकवाडी येथील पंप हाउस आणि फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्र याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. या दोन्हीही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देण्याच्या संदर्भात पाणीपुरवठा विभागाने अनेकवेळा महापालिकेच्या प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

शिक्षण विभागाचे चांगभले

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. बहुतांश कामे तत्काळ मार्गी लागण्यासारखी असताना विनाकारण विलंब लावला जात होता. चार महिन्यांपूर्वी सीइओ दीपक चौधरी यांनी पुढाकार घेऊन काही कामे मार्गी लावली.

‘नॉन झिरो स्कोअर’लाही ‘फार्मसी’त प्रवेश

$
0
0
तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रथमच पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी (बीफार्मसी) घेण्यात आलेल्या ‘एमटी-सीईटी’चा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ७७७ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

कार्बाइडने आंबे पिकविणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द

$
0
0
आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करणाऱ्या मदिना फ्रुट सप्लायर्सला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण या दुकानाचे मुळ गाळाधारक अब्दुल आसेफ अब्दुल जब्बार यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

दोन साइडिंग ट्रॅकचे उद‍्घाटन

$
0
0
भारतीय सैन्य दलाच्या मालवाहतुकीसाठी दौलताबाद रेल्वे स्टेशनच्या शेजारी दोन साईडिंग टॅक बांधण्यात आले आहेत. या कामावर १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्याचा उपयोग लष्कर व नागरी मालवाहतुकीसाठी करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्प खोळंबला; कामेही रखडली

$
0
0
महापालिकेचा अर्थसंकल्प खोळंबल्यामुळे विकास कामे रखडल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून होऊ लागल्या आहेत. आगामी काळातील निवडणुकीच्या संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता अर्थसंकल्पाचे काम लवकर पूर्ण न झाल्यास नवीन विकास कामांना मुकावे लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

मित्राच्या नावावर परीक्षा देणारा गजाआड

$
0
0
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मित्राच्या जागी त्याचा गणित विषयाचा पेपर देणाऱ्याला क्रांती चौक पोलिसांनी बुधवारी (७ मे) दुपारी अटक केली. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये हा प्रकार घडला असून, प्राचार्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाणचक्कीत पडून नागरिकाचा मृत्यू

$
0
0
पाणचक्कीच्या हौदात पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी (७ मे) सायंकाळी साडेचार वाजता घडला. जयसिंगपुरा येथील सय्यद रउफ सय्यद अर्शद असे या नागरिकाचे नाव असून, छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ड्रेनेजच्या निविदा मंजुरीत गैरप्रकार?

$
0
0
भूमिगत गटार योजनेची निविदा मंजूर करण्यासाठी अत्यंत घाईगडबडीने महापालिकेच्या स्थायी समितीच्या समोर आणण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची शंका आहे. निविदा मंजुरीच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे आमदार प्रदिप जैस्वाल यांनी लोकायुक्त, मुख्यमंत्री, लाचलुचपत खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तलवारीचा धाक दाखवणारा अटकेत

$
0
0
गोगाबाबा टेकडी परिसरात तलवारीचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी (७ मे) सायंकाळी अटक केली. पोलिस चौकशीमध्ये हा तरूण अट्टल गुन्हेगार निघाला असून मंगळसूत्र चोरीसहीत घरफोडी व दुचाकीचोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

७५९ ‘मेडिकल’चे लायसन्स रद्द

$
0
0
फार्मासिस्ट पूर्णवेळ नसणे, औषध विक्रीचा तपशील नसणे, यांसह नव्या नियमानुसार कामकाज न करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या विरोधात अन्न व औषध प्रशासानाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

गोदामाशेजारीच धान्य माफिया

$
0
0
अन्न सुरक्षा योजना लागू झाल्यामुळे शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात धान्य येत आहे. त्यामुळे धान्य माफिया एकदम सक्रीय झाले आहेत. पेशाने शिक्षक असलेल्या एका धान्यमाफियाने शहरातील शासकीय गोडावून शेजारील शासकीय खोलीतूनच कारभार सुरू केला आहे.

मनसेचा ‘ऑरब‌िट’ कंपनीत राडा

$
0
0
वाळूज येथील ऑरबीट इलेक्ट्रामेक इंडिया प्रा. लि. मध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्यासह ३४ जणांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादीला काँग्रेसचे आव्हान

$
0
0
राज्यात जुलैमध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्यांदाच उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेसच आव्हान उभे करणार आहे.

दूषित पाण्यावर ‘नीरी’चा तोडगा

$
0
0
जायकवाडी धरणातील पाण्याचा खालवणारा दर्जा, त्यामुळे दूषित होणारे पाणी आणि जलशुद्धीकरण केंद्रात सापडलेल्या अळ्या यांवर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) शास्त्रज्ञांना बोलावण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरवले आहे.

धावपट्टीवर जेटचे विमान कलंडले

$
0
0
मुंबईहून औरंगाबादला आलेले जेट एअरवेजचे ९ डब्ल्यू २५११ हे विमान चिकलठाणा विमानतळावर उतरताना धावपट्टीवर कलंडले. बुधवारी रात्री ७ वाजून ३५ मिनिटांनी आलेल्या या विमानाच्या हार्ड लँडिंगमुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

सुट्ट्यांचा सदुपयोग सत्कार्यासाठी

$
0
0
कॉलेजच्या कट्ट्यावर रमणारी सामाजिक उपक्रमांबाबत ही तेवढीच दक्ष असते, मतदानाबाबत जनजागृतीसाठी तरुणाईने केलेले प्रयत्न समोर असतानाच आता सुटीचा सदुपयोग जुने शैक्षणिक साहित्य जमा करुन ते साहित्य गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोहंचविण्यासाठी प्रयत्न करते आहे.

जागतिक हास्य दिन उत्साहात

$
0
0
चैतन्य हास्य योग आणि अमृत क्लबच्या कार्यक्रमांमध्ये गेल्या रविवारी हास्याचे प्रचंड फवारे उडत होते. खास हसण्यासाठी म्हणून अनेक ज्येष्ठ उपस्थित राहिले होते. निमित्त होते जागतिक हास्य दिनाचे. दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो.

फुलले रे क्षण माझे फुलले रे

$
0
0
रणरणत्या ऊन्हात आपला ट्रेंडी लूक कायम ठेवण्याकरता तरुणींसाठी समर कलेक्शनमधील कपडे सज्ज आहेत. स्लीव्हलेस टॉप, ट्रेंडी श्रग, क्रॅपी स्टाईल, थ्री फोर्थ आणि राऊडी जेग्नीस अशा कॉकटेल लूकची फॅशन अगदी जोरात आहे. ‌सौम्य रंगाच्या फॅशनला काहीसे मागे सारून पूर्वी सहसा न पाहिलेले रंग या नव्या श्रेणीत दाखल झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images