Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाणीपुरवठ्यात साडेतीन ‘एमएलडी’ने वाढ

$
0
0
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज साडेतीन दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पाणीपुरवठ्यातील ही वाढ गुरुवारपासून करण्यात आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.

झालर क्षेत्राचा आराखडा बारगळणार?

$
0
0
औरंगाबाद शहरालगतच्या २८ गावांसाठी सिडकोने तयार केलेला झालर क्षेत्राचा प्रारूप आराखडा बारगळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ‘नागरिकांचा विरोध असेल, तर आम्ही काहीही करू शकणार नाही. नागरिकांच्या विरोधाबाबत सरकारबरोबर चर्चा करण्यात येणार आहे,’ असे सिडकोचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया गुरुवारी (८ मे) पत्रकारांना सांगितले.

‘पीएफ’, ‘टीडीएस’च्या ४८ लाखांवर डल्ला

$
0
0
बनावट दस्तावेज तयार करून आपल्याच संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारातील ‘पीएफ’ आणि ‘टीडीएस’च्या सुमारे ४८ लाख रुपयांवर विश्वस्तांनीच डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने डॉक्टरांसह १५ विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॉलिटेक्निकच्या ‘गणिता’त गटांगळ्या

$
0
0
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचा बेस असलेलं गणित अनेक विद्यार्थ्यांना अवघड जाते. त्यामुळेच शासकीय पॉलिटेक्निकचे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून ‘गणिता’च्या पाशातून सुटण्यासाठी धडपड करीत आहेत, परंतु त्यांना पॉलिटेक्निकचे ‘गणित’ सुटलेले नाही.

कामगिरी सुधारा; अन्यथा डिटेक्शन ब्रँचवर टाच

$
0
0
एक महिन्यात गुन्ह्याच्या तपासामध्ये कामगिरी सुधारा अन्यथा गुन्हे प्रकटीकरण पथक (डिटेक्शन ब्रँच) बरखास्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी दिला आहे. शहरातील १३ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांची विशेष आढावा बैठक त्यांनी गुरुवारी (८ मे) घेतली.

‘सातारा-देवळाई’बाबत सिडको साशंक

$
0
0
सातारा देवळाई नगर पालिकेच्या स्थापनेनंतर तेथील नगर नियोजनाची जबाबदारी सिडकोकडेच राहण्याची शक्यता धूसर झाली आहे. नव्या पालिकेतील नियोजनाची जबाबदारी नगर रचना विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची शक्यता सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थिनींसाठीच्या सायकली धुळखात

$
0
0
पालिका शाळेतील विद्यार्थिनींसाठीच्या सायकलींचे वाटप आचारसंहितेच्या नावाखाली रखडले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच पालिकेच्या प्रशासनाला या सायकली प्राप्त झाल्या, पण त्याचे वितरण करण्यासाठी महापौर व आयुक्तांना वेळच मिळाला नाही.

दीक्षित यांना ल. स. वैद्य पुरस्कार जाहीर

$
0
0
वाई येथील प्राज्ञापाठशाला मंडळाचे माजी व्यवस्थापक व ज्येष्ठ मु‌द्रितशोधक श्रीकृष्ण गजानन दीक्षित यांना स्वातंत्रसैनिक ल. स वैद्य यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय मु‌‌द्रित शोधक पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

एपीएलसाठी तांदूळ आला; गव्हाची प्रतीक्षा

$
0
0
गेल्या तीन महिन्यांपासून अन्नसुरक्षा योजना लागू नसलेल्या शहरातील एपीएल रेशनकार्डावर नोंद असलेल्या १३ लाख नागरिकांना धान्य मिळत नाही. हक्काचे धान्य मिळवण्यासाठी त्यांना स्वस्त धान्य दुकानांच्या खेट्या माराव्या लागत आहेत.

उड्डाणपुलासाठी सरकारकडून निधी आणू

$
0
0
एकनाथनगर रेल्वे क्रॉस‌िंग उड्डाणपुलाचे बांधकाम निधी अभावी रडखडलेले आहे. या उड्डाणपुलाच्या ‌निर्मितीसाठी आता चेंबर ऑफ मराठाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरने (सीएमआयए) पुढाकार घेतला आहे.

समित्या रद्दबातल करण्याचा निर्णय मागे

$
0
0
नांदेड जिल्हा परिषदेतील समित्या रद्दबातल करण्याचा निर्णय व आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागे घेतला आहे. तसेच समित्या रद्द करण्याच्या संदर्भात खंडपीठात दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिका मंजूर करण्यात आली आहे.

गुन्हेगारीवर अंकुश नाही

$
0
0
गेल्या दोन आठवडयात घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांची सोन्याची दागिने पळवण्यात आली. मंगळसूत्र चोरांचा उच्छाद सुरूच आहे. परंतु पोलिस ना घटना रोखू शकत आहेत; ना गुन्ह्याचा उलगडा.

मराठवाड्यात २०९ टँकरने पाणीपुरवठा

$
0
0
मराठवाड्यात टँकरची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. एका आठवड्यात टँकरची संख्या साठने वाढली आहे. सध्या २०९ टँकरने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सिडकोची वेबसाइट सहा महिन्यांत

$
0
0
प्लॉटचे हस्तांतर असो की करारनामा सिडकोच्या सर्व कारभाराची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व माहिती सहा महिन्यात संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्टेशनवर सीसीटीव्ही

$
0
0
औरंगाबाद रेल्वे स्टेशनमध्ये दररोज हजारोच्या संख्येने प्रवाशी ये-जा करतात. सध्या प्रवासी सुरक्षेसाठी नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. हे कॅमेरे जुन्या इमारतीत असून, नवीन इमारतीसह रेल्वे स्टेशन परिसरात आणखी ३० कॅमेरे लावले जाणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी दिली.

लाचखोर तलाठ्यावर गुन्हा

$
0
0
आजोबाच्या नावावर असलेली शेत जमीन वडिलांच्या नावावर करण्यासाठी तलाठ्याने एका शेतकऱ्याला ७ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणी नंदापूर ता. जालना येथील तलाठी किशन रामभाऊ खोतकर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज महावितरणाला ग्राहक मंचचा दणका

$
0
0
शेतकऱ्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही व या तक्रारीबाबत निष्काळजीपणा दाखविला. यामुळे शेतकऱ्यांचा सव्वा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे महावितरणाने संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसानपोटी देण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे दिले आहेत.

‘फिजिक्स’चा पेपर विद्यार्थ्यांना थोडा अवघड

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकिय व दंत अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी ‘एमटी-सीईटी’परीक्षा घेण्यात आली. वर्षभराच्या विश्रांतीनंतर राज्यस्तरावर झालेल्या या परीक्षेत ‘फिजिक्स’ अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील १८ ‌केंद्रावर ६ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

गारपीटग्रस्त भागात सामुदा​यिक विवाह

$
0
0
अंबाजोगाई येथे गुरुवारी सामुदायिक वि‌वाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबने आयोजित केलेल्या या उपक्रमात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह पार पडले.

‘एमआयएमएसआर’ मेडिकल कॉलेजला नॅकचा दर्जा

$
0
0
येथील ‘एमआयएमएसआर’ मे​िडकल कॉलेजची नॅकच्या समितीने तपासणी केली. या समितीने कॉलेजला नॅकचा ‘अ’ दर्जा दिला आहे. अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक रमेश कराड यांनी दिली. नॅकचा ‘अ’ दर्जा मिळविणारे मराठवाड्यातील पहिले खासगी कॉलेज ठरले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images