Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हॉस्पिटलवर दगडफेक; डॉक्टरला धक्काबुक्की

$
0
0
किरकोळ आजार असलेल्या एका १८ वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित डॉक्टरवरच्या विरोधात त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार केली.

सरपंच खूनप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

$
0
0
बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील दलित सरपंच मनोज कसाब खून प्रकरणातील तिघा आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी ३ दिवसांची वाढ केली आहे.

‘एनटीएस’परीक्षा पुढे ढकलली

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) ‘स्टेज-२’ची रविवारी (११ मे) होणारी परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात पुणे आणि मुंबई अशा दोन केंद्रावर परीक्षा होत आहे. परीक्षेसाठी शहरातील विद्यार्थी, पालक पुण्याला पोचले, मात्र ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगण्यात आल्याने त्यांची गैरसोय झाली.

शेजाऱ्यांनीच हडपले घर

$
0
0
घराचे बनावट दस्तावेज तयार करून त्याद्वारे शेजारयांनीच महिलेचा घर हडपल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जालन्यातील कोष्टी गल्लीत गल्लीत घडलेल्या या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यातील कॉलेजांची झाडाझडती

$
0
0
कॉलेजांमधील सोयी-सुविधांची तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाकडून सहसंचालक कार्यालयांना तपासणीचे निर्देश देण्यात आले असून, राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित कॉलेजांची महिनाभरात झाडाझडती होणार आहे.

वेध सर्वाधिक उंच शिल्पाकृतीचे

$
0
0
हैदराबादच्या हुसेन सागराच्या धर्तीवर जालना शहरातील मोती तलाव विकसित करण्यात येणार आहे. या तलावात तब्बल ५० फूट उंचीचे गौतम बुद्धांचे शिल्प उभारले जाणार आहे. मराठवाड्यातील ही सर्वाधिक उंच शिल्पाकृती असल्याचा दावा शिल्पकार सुनील देवरे यांनी केला आहे.

राज्यातील शाळांचा वनवास संपला

$
0
0
दहा वर्षापासून थकलेले वेतनेतर अनुदान अखेर पदरात पडत असल्याने राज्यातील शाळांच्या संस्थाचालकांनी सुस्कारा सोडला आहे. चार टक्के वेतनेतर अनुदानानुसार औरंगाबाद विभागात पंधरा कोटी रुपये शाळांना वितरीत करण्यात येणार आहेत. एका दशकातील शाळांचा वनवास संपल्याची भावना शाळा व्यवस्थापनाकडून व्यक्त झाली.

वेरूळच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ

$
0
0
जगप्रसिध्द वेरूळ लेणीच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. लेणी परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी तैनात करण्यात आलेली आहे.

...म्हणून शिबिरार्थी भारावले

$
0
0
भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेचे विशेष महत्त्व आहे. भारतीय परंपरेची वस्तुनिष्ठ माहिती देतानाच परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न होता. ही परंपरा जतन करण्याचे काम औरंगाबाद शहरातील महागामी संस्था करीत आहे. मागील सोळा वर्षांपासून साधना गुरुकुल शिबिरात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम निष्ठेने सुरू आहे.

कॉलेज तपासणीमुळे संस्थाचालकांत खळबळ

$
0
0
राज्य सरकारने कॉलेजांमधील तपासणी करण्याचा निर्णय घेतला. सोयी-सुविधांची तपासणी होणार असल्याने प्राध्यापकांमध्ये उत्साह आहे; तर संस्थांचालकांमध्ये खळबळ माजली आहे.

निवडणूक भत्त्यापोटी पावनेतीन कोटींचा खर्च

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे सुमारे पावनेतीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शहरातील औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य व औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ, ग्रामीण भागातील कन्नड, वैजापूर, गंगापूर या मतदारसंघाचा समावेश होतो.

कवितेच्या उद्यानात बाहुल्यांचे लग्न

$
0
0
ज्योतीनगरातल्या कवितेच्या बागेत आज रविवारी चक्क सनईचे सूर वाजले. निमित्त होते चिमुकल्यांनी केलेल्या बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे. बॅँडच्या तालावर नाचणारे वराती, सनईचे सूर, पारंपारिक वेशभूषेत स्वागत करणारे यजमान, शुभमंगल म्हणताच अक्षदा टा‌कून विवाहावर शिक्कामोर्तब करणारी वऱ्हाडी मंडळी या साऱ्यांनी या लग्नात खरेपणा आणला.

खामगाव व बोधेगावला तलाठी नसल्याने अडचण

$
0
0
तालुक्यातील खामगाव व बोधेगाव खुर्द येथील तलाठी सज्जाला तलाठी नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. तलाठीच नसल्याने सात- बारावरील नोंदी अद्ययावत होत नसल्यामुळे शेतकरी हैराण आहेत.

मातृत्वासाठी मोजावी लागते लाखाची किंमत

$
0
0
मातृत्व सुख ही नैसर्गिक उर्मी. मात्र अलीकडे मातृत्व सुखासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोठी किंमत मोजावी लागते आहे. त्यासाठी पॅकेजेसची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपचार व ‘हाय रिस्क प्रेगन्सी’ साठी खासगी हॉस्पिटलमध्ये चक्क एक लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज आहे.

अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर कारवाईकडे डोळेझाक

$
0
0
राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरांचा धडाका लावला जातो. शस्त्रक्रिया होऊनही गर्भधारणा राहिल्याच्या पाच घटना गेल्या वर्षी समोर आल्या. एवढी सक्षम यंत्रणा असताना ही प्रक्रिया फेल होऊनही आरोग्य विभागाने काहीच कारवाई केलेली नाही.

शंभरावर महिलांना ‘स्पेशल गिफ्ट’

$
0
0
शहरातील सुमारे शंभरावर महिलांना ‘मदर्स डे’ चे सर्वांत सुंदर ‘गिफ्ट’ मिळाले आहे. विशेष म्हणजे हे ‘गिफ्ट’ दिले आहे त्यांच्याच पोटच्या गोळ्याने. घाटीसह शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात जन्मलेल्या शंभरपेक्षा जास्त बच्चूंनी आज त्यांच्या मातांना मातृत्व सुखाचा संस्मरणीय आनंद दिला.

काळानुसार बदल न केल्यास पारंपरिक विद्याशाखा धोक्यात

$
0
0
‘जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत अध्यपन पद्धत व अभ्यासक्रम अद्ययावत होणे गरजेचे असते. परंतु या कामांना गती नसल्याने पारंपरिक विद्याशाखा धोक्यात सापडल्या आहेत,’ असे प्रतिपादन भुतान येथील जागतिक पातळीवरील शिक्षणतज्ज्ञ शेहराब दोर्जी यांनी केले. शिक्षणशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी चांगले मानांकन आवश्यक

$
0
0
जागतिक स्पर्धेमुळे उत्पादनाच्या दर्जाला मोठे महत्व असणार आहे. चांगले मानांकन मिळविल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला अधिक मागणी प्राप्त होईल. यासाठी योग्य पद्धतीने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन टीयूव्ही सूड साऊथ एशियाचे शिवराम सोहनी यांनी केले.

एलबीटी भरण्याला व्यापाऱ्यांचा असहकार

$
0
0
‘एलबीटी हटाव व्यापार बचाव,’ असा नारा देता जिल्हा व्यापारी महासंघाने शनिवारपासून (१० मे) असहकार आंदोलन सुरू केले आहे. आयात करण्यात येणाऱ्या मालावर दरमहा केवळ दहा रुपये एलबीटी भरणार असल्याचे महासंघाने आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यामाध्यमातून महापालिकेचे आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहे.

बापूनगर - जरीपुरा सिमेंट रस्त्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

$
0
0
बापूनगर - जरीपुरा सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यावरून गांधीनगर विकास वॉर्ड कृती समितीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या रस्त्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images