Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जन्मदात्यानेच केले दोन मुलींचे लैंगिक शोषण

$
0
0
मद्याच्या नशेमध्ये पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून पोटच्या दोन मुलींवर वडील गेल्या सात वर्षांपासून अत्याचार करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला कंटाळून माहेरी गेलेल्या मुलीच्या आईने परभणी पोलिस ठाण्यात मंगळवारी (१३ मे) दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

कॉलसेंटरमधील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0
कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बधुवारी छावणी भागात ही घटना घडली.

आईकडून पोटच्या गोळ्यास जीवदान

$
0
0
अवघ्या कुटुंबाची जबाबदारी सर्वार्थाने पेलण्याच्या वयात अचानक दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले... दोन चिमुकल्या मुलींसह अख्खे कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ आली...पोटच्या गोळ्याची ही अवस्था ७१ वर्षांच्या आईला बघवली नाही आणि स्वतःहून किडनी देण्यासाठी मुलाच्या मागे लागली...

नायब तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न

$
0
0
बेकायदा डबर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने बदनापुरात एका नायब तहसीलदाराला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न बुधवारी झाला. बाप-लेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निजामकालीन वस्तू कोणाच्या घरी?

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात ठेवलेल्या निजामाच्या राजवटीतील दुर्मिळ वस्तू गायब झाल्या आहेत. उच्चस्तरीय समिती नेमल्यानंतरही येथील म्युझियममधून गायब झालेल्या वस्तुचा शोध अद्यापही लागलेला नाही.

रिंगरोड जलद व्हावा!

$
0
0
वाळूज औद्योगिक वसाहत आणि पुण्याला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा रस्ता म्हणून पैठण लिंक रोडकडे पाहिले गेले. एमएसआरडीसीने मुदतीच्या आत रस्ता केला. पण मुख्य रस्त्याला जोड असलेल्या ठिकाणी सिग्नल बसविले नव्हते म्हणून महिनाभर रस्ता तयार असूनही वापरास दिला नव्हता.

लोह्यातील शेती झाली हायटेक

$
0
0
लोहा तालुक्यातील शेतकरी आता हायटेक झाले असून पूर्वीची महिनो न महिनो चालणारी शेतीची कामे आता काही वेळेतच पूर्ण होणार आहेत. त्यासाठी ट्रॅक्टर तसेच इतर आधुनिक साहित्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

मतमोजणीसाठी ६२९ कर्मचारी

$
0
0
नांदेड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़.

एकावेळी ९६ यंत्रांवर मतमोजणी

$
0
0
बीड लोकसभा मतदार संघात १७ एप्रिलला मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. बीड शहरातील खंडेश्वरी भागातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत होणार आहे.

आव्हान शाहिरी टिकवण्याचे

$
0
0
महाराष्ट्राची शाहिरी परंपरा टिकवण्यासाठी शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्य सांस्कृतिक संचालनाने घेतलेल्या शाहिरी शिबिरातील नवीन शाहिरांना संच उभा करुन व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी मंचाने औरंगाबाद शहरात तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केलीय.

अभिजित व प्रसन्नजित कोसंबीची रंगली मैफल

$
0
0
बुद्ध पौर्णिमेला उपासक-उपासिकांनी 'बुद्धम शरणम गच्छामी' म्हणत तथागताच्या सद्धम्माच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतली. या शपथेला कोल्हापूरचा महागायक अभिजित व प्रसन्नजित कोसंबीच्या ‘नमस्कार घ्यावा, अहो बुद्धदेवा’च्या धीरगंभीर स्वरांनी सूरमयी साथ दिली.

आनंदी उन्हाळी शिबिर

$
0
0
समर व्हॅकेशन म्हणजे समथींग स्पेशल. म्हणूनच यंगीस्तानची प्लॅनिंग सध्या जोरात सुरू आहे. कट्ट्यावरती सध्या सुट्टीचं प्लॅनिंग कोर्सेसची माहिती किंवा टुरीझमसाठी स्पॉट सिलेक्शन जोरात चालू आहे, तर काहींना एखादी नवी भाषा शिकायची आहे.

माझं मत चमत्कार घडविणार?

$
0
0
कोण येणार... कोण जाणार... याची चर्चा जरी ‘न्यूज चॅनल्स’वर सुरू असून तरुणाईचे त्याकडे बारीक लक्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे. बातम्या ऐकणे, विश्लेषण समजून घेणे, याकडे तरुणांचा कल वाढला आहे. महाराष्ट्रात आजवर झालेल्या मतदानाची टक्केवारी यावेळी वाढली आहे. तरुण, नवा मतदार जवळपास १० टक्के आहे. तसेच तो नव्या संपर्कमाध्यमांच्या प्रभावाखाली आहे.

नांदेडच्या निकालाची सर्वत्र उत्सुकता

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी लागणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष नांदेडच्या निवडणूक निकालाकडे लागलेले असताना, नांदेडमध्ये कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

$
0
0
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम ठेवण्यात डॉ. पद्मसिंह पाटील यशस्वी ठरणार की महायूतीचे सेना उमेदवार रवींद्र गायकवाड धनुष्यबाण घेवून दिल्ली गाठणार याकडे उस्मानाबादसह मराठवाड्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठवाडा मतदारसंघातील निकाल

$
0
0
मराठवाडा मतदारसंघातील निकाल... पाहा कोणी मारली बाजी... कोणाला धोबीपछाड... तुमचा मतदारसंघ तुमचा उमेदवार

सातव-चव्हाणांनी लाज राखली

$
0
0
लातूर, नांदेड वगळता मराठवाडा हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला आहे. यंदा प्रथमच सेना-भाजप युतीने मराठवाड्यात निविर्वाद वर्चस्व सिद्ध करत आठपैकी सहा जागा खिशात घातल्या आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादीला युतीची डोकेदुखी

$
0
0
देशभरातील मोदी लाटेच्या सुनामीपासून वैजापूर विधानसभा मतदासंघ क्षेत्र निराळे ठरले नाही. येथील मतदारांनीही लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना भरभरून मते दिली.

उमेदवाराच्या तालुक्यात काँग्रेसची आपटी

$
0
0
सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या यशात कन्नड विधानसभा मतदारसंघाने भरभरून मते दिली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारात सर्वांचे लक्ष कन्नड तालुक्याकडे लागले होते.

गंगापुरात दावेदार वाढले

$
0
0
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयामुळे गंगापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष प्रशांत बंब यांच्या विजयामुळे साडे चार वर्षात शिवसेनेचे राजकारण दिशाहीन झाले होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>