Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गोठ्यांसाठी पालिका कामाला

$
0
0
चिकलठाणा शिवारातील गोठ्यासाठीच्या जागेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याचे काम सुरू केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेच्या विशेष यंत्रणेवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोळ्यांच्या विकारांवर विशेष मार्गदर्शन

$
0
0
महाराष्ट्र टाइम्स आणि वासन आय केअर सेंटर तर्फे शहरवासीयांसाठी आळशी डोळ्यांच्या विकारावर विशेष मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन शनिवारी (३१ मे) करण्यात आले आहे. यावेळी वासन आय केअर सेंटरचे प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या वेळी उपस्थितांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.

२५ दिवसांत शिवनेरीच्या १६ फेरी रद्द

$
0
0
औरंगाबाद ते पुणे या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हात होत आहेत. मे महिन्यात २५ तारखेपर्यंत एकुण १७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादेतील बेपत्ता तरुणी मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
क्रांती चौक हद्दीतील बेपत्ता अल्पवयीन तरुणीला मध्यप्रदेशच्या इटारसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्लास्टिक कॅनला बंदी

$
0
0
दुध, दही यासह दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक, साठवण करण्यासाठी यापुढे प्लास्टिक कॅन, ड्रम तसेच माइल्ड स्टिल मेटल वापरता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास दुग्ध व्यवसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी दिला.

क्राइम डायरी

$
0
0
औरंगाबाद गुन्हे वृत्त

अतिक्रमणे हटवणार

$
0
0
धार्मिक स्थळांच्या पाडापाडीसाठी पालिका आयुक्तांनी शंभरावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आज बुधवारी सर्वच्या सर्व कर्मचारी पाडापाडीच्या कामावर नियुक्त झाले.

धार्मिक स्थळांवर आज कारवाई

$
0
0
रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या लहान धार्मिक स्थळांवरील कारवाईला गुरुवारी (२९ मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात सुरुवात होणार आहे. मोठ्या धार्मिक स्थळांवरील कारवाई पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महापालिकेतील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

दिले मुदत संपलेले धनादेश

$
0
0
अतिक्रमणधारकांना शासनाने घर बांधणीसाठी २ लाख रुपये देण्याचे कबूल केले. प्रशासनाने धनादेश देऊन हे पैसे लाभार्थ्यांना दिले. दोन दिवसांपूर्वी मंडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे धनादेश देण्यात आले. पण त्यावर तीन महिन्यांपूर्वीची तारीख टाकली.

NCP स्वतंत्र लढवणार?

$
0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फारकतीचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत केले. औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी हे सुतोवाच केल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड:१२४ टँकरने पाणीपुरवठा

$
0
0
बीड जिल्ह्यात पावसाळा जसजसा जवळ येवू लागला आहे तसतसा पाणी प्रश्न उग्र समस्या धरण करू लागला आहे. आजघडीला जिल्ह्यात १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

मतदार नोंदणीला सुरुवात

$
0
0
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्यामुळे त्यांना मतदानापासुन वंचित रहावे लागले होते. त्यामुळे २९ मेपासून पुन्हा एकदा मतदार नोंदणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

पोलिसांची युनोने घेतली दखल

$
0
0
आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध देशामध्ये शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दुर्गम भागात पोलिस भरतीसाठी युनो आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. याला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाल्याने संयुक्त राष्ट्र संघाने देखील भारतीय पोलिसांच्या उपक्रमाची दखल घेतली.

खडखडाटाला मिळणार अर्धविराम

$
0
0
शासकीय नोकरभरतीत लिपिक पदासह 'क' श्रेणीच्या भरतीत आवश्यक असलेल्या टंकलेखन परीक्षेला बुधवारपासून (दि.२८ मे) शहरात सुरूवात झाली. शहरात यंदा तब्बल १३ हजार विद्यार्थी या परीक्षेस बसले असून, जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली आहे.

सुवासाचं कोंदण

$
0
0
आजकालचे तरूण बॉडीकेअर लोशनमध्ये डिओ व परफ्युम अधिक प्रमाणात वापरू लागले आहेत. यात २५ मिलिलीटरपासून ते १५० मिलिलीटरपर्यंतच्या विविध ब्रँडेड आणि लोकल मॅन्युफॅक्चरिंगमधून उत्पादित होत असलेल्या डिओंना आणि अत्तरांना खूप ‌मागणी आहे.

आठवडी बाजाराला शिस्त लावण्यासाठी मोहीम

$
0
0
महापालिकेने निर्धारित केलेल्या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्याची शिस्त लावण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

हैदराबाद बँकेची कृषी शाखा जळून खाक

$
0
0
बीड शहरातील नगर रोडवरील पंचायत समिती कार्यालयाच्या समोर असणाऱ्या हैदराबाद बँकेची कृषी शाखा बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाली. बँकेतील फर्निचर, संगणक, कागदपत्रे जळून खाक झाले.

नांदेडची अतिक्रमणे हटवली

$
0
0
नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावर रहदारी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात या मोहिमेतंर्गत सुमारे १५० जणांना हटवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

धानोरात रोहयोचा घोळ

$
0
0
लोहा तालुक्यातील धानोरा (म.) येथील मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या विविध कामात जवळपास १ कोटी ६३ लाखाचा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली चौकशी समिती जवळपास तीन महिन्यांपासून धानोरा गावाकडे फिरकलीच नाही.

ई-ऑफिसचे प्रशिक्षण

$
0
0
शासकीय कामकाज पारदर्शी, जलदगतीने होण्यासाठी आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images