Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लातूर काँग्रेसमध्ये कलह

$
0
0
लातूर शहरचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे.

येळगंगा नदी शुद्धीकरण

$
0
0
वेरूळ येथील येळगंगा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हा परिषद गटनेते शैलेश क्षीरसागर यांच्या पुढाकराने सुरू झालेल्या या मोहिमचे उद्घाटन श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य व कार्याध्यक्ष योगेश टोपरे यांनी केले.

वैजापूरमध्ये पाणीटंचाई

$
0
0
नारंगी धरण कोरडे पडल्यामुळे यावर्षी वैजापूर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगर पालिकतर्फे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा पाणी पुरविले जात आहे. हे पाणी कमी पडत असल्यामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

कॅन्सर हॉस्पिटलच्या नशिबी टँकर

$
0
0
महाराष्ट्रातील पहिल्याच स्वतंत्र शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलला स्थापनेच्या दुसऱ्या वर्षीही टँकरमुक्ती मिळालेली नाही. आजही अगदी दररोज पाच ते दहा खासगी टँकर मागविल्याशिवाय हॉस्पिटल चालूच शकत नाही, असे जळजळीत वास्तव आहे.

मदत मिळणार केव्हा?

$
0
0
गारपीटग्रस्तांचे राहिलेला २४ कोटींचा निधी केव्हा येणार? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज

$
0
0
पावसाळ्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुरामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीचा विचार करता शासन यंत्रणेने पावसाळ्यापूर्वी सावध राहावे; तसेच संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती निवारण आराखडा व पूर प्रतिबंध आराखड्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.

प्राण्यांची संख्या वाढली!

$
0
0
गौताळा अभयारण्यातील बिबट्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे. वैशाख पौर्णिमेला वन्यजीव संरक्षक विभागाने वैशाख पौर्णिमेला केलेल्या प्राणी गणनेत ७५ प्रजातींचे प्राणी आढळले. गेल्या वर्षी २८ प्रजातींची नोंद झाली होती.

क्राइम डायरी

$
0
0
औरंगाबाद - गुन्हे वृत्त

एकाच कुटुंबातील ३ ठार

$
0
0
मुलीवर उपचार करून परत जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला गुरुवारी (२९ मे) दुपारी तीन वाजता अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले. ही घटना अहमदनगर रोडवरील जिकठाण फाट्याजवळ घडली. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कंटेनरवर जाऊन आदळली.

वीजेचे खांब हटवण्याचे टेंडर

$
0
0
रुंद करण्यात आलेल्या रस्त्यांवरील विजेचे खांब हटवण्यासाठी महापालिकेने आता टेंडर काढले आहे. येत्या काही दिवसांत खांब हटवण्याचे काम अधिकृतपणे सुरू होईल, असे पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

दलित-सवर्ण समित्या

$
0
0
दलित अत्याचाराच्या घटना होऊ नये म्हणून गावपातळीवर दलित सवर्ण समन्वय समित्या गठीत केल्या जातील.

उस्मानाबादमध्ये पाऊस

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वीज कोसळल्याने रेड्याचा मृत्यू झाला. केमवाडी ( ता. तुळजापूर) येथे घरावरील पत्रे उडून गेल्याने पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने तिघे जण जखमी झाले.

धार्मिक स्थळे हटविली

$
0
0
रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या ४१ पैकी १२ धार्मिक स्थळांवर पालिकेने गुरुवारी (२९ मे) हायकोर्टाच्या आदेशानुसार बुलडोजर फिरविला. भल्या पहाटे सुरू झालेली ही कारवाई साडेचार तासांनंतर संपली. कारवाईसाठी पालिकेने मोठा ताफा तैनात केला होता. पोलिसांचाही प्रचंड फौजफाटा होता.

दोषींवर फौजदारी गुन्हे: पाटील

$
0
0
कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांना केलेल्या मारहाणी प्रकणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा, असा आदेश राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज दिले. घटनेच्या पाच दिवसांनंतर आर. आर. पाटील यांनी आज कनगरा गावात जावून ग्रामस्थांनी भेट घेतली.

विद्यार्थ्यांचा ‘पेट्रोल बचतीचा फंडा’

$
0
0
तरुणाई म्हटली की मुक्त विचार अन् भटकंती आलीच. भटकंती करणाऱ्या तरुणांची प्रचंड मोठी संख्या आहे. त्यातच दुचाकींवर फिरणारे जास्तच. दुचाकी आली की पेट्रोल आलेच.

नोकरी सोडून युवक ‌करतोय दुग्धव्यवसाय

$
0
0
सातत्याने दर्जेदार उत्पादन दिले आणि नागरिकात विश्वास निर्माण करता येतो. यावर विश्वास ठेऊन कंधार तालुक्यातील धर्मपुरी येथील तरुणाने एका गाईच्या दूध विक्रीपासून सुरू केलेला व्यवसाय केवळ सहा महिन्यांत ६४० लिटर दुधाच्या विक्रीवर पोचला आहे.

बीडमध्ये कारवाई

$
0
0
शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये रासायनिक खते, बियाणे, औषधे योग्य भावात मिळावीत या करीता कृषि विभागांची भरारी पथके कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्राची पहाणी करुन दोषीवर कारवाई केली आहे.

शेतक-यांसाठी १६ कोटींचा निधी

$
0
0
मानवत तालुक्यातील २७ हजारहून अधिक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १६ कोटी ६० लाख ४८ हजार ६१८ रुपयांचे वाटप शासनातर्फे करण्यात आले. या रकमेचा उपयोग शेतकरी खरीपाच्या बि-बियाणे खरेदी करण्यासाठी करताना दिसत आहेत.

१ लाख २८ हजार रुपये लाटले

$
0
0
शहराच्या जीवनरेखा बालगृहात खोटे कागदपत्रे तयार करून संस्थाचालक जावेद फारुखी यांनी १ लाख २८ हजार रुपयांची रक्कम उचलल्याचे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रावरून उघड झाले आहे. एचआयव्हीबाधीत संस्थेतील बालकांवर मात्र उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

गृहमंत्री कनग-यात

$
0
0
कनगरा येथील पोलिसांकडून झालेल्या अमानूष मारहाण प्रकरणी पोलिस महानिरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी कनगरा (ता. उस्मानाबाद) येथे दिली. ‘घडलेला प्रकार दुर्दैवी असून, याबद्दल मी आपली माफी मागतो,’ असे पाटील या वेळी म्हणाले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images