Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उस्मानाबादेत आंबेच... आंबे

$
0
0
आंब्याच्या विविध जातींची उस्मानाबादच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. हापूसच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षी सुमारे पंधराशे रुपये चार डझनची पेटी अशा दराने विक्री झालेल्या हापूसचा तोरा यंदा बराच उतरला असून, सध्या रत्नागिरी देवगड हापूस आंबा सुमारे सहाशे रुपये चार डझनची पेटी अशा दराने विकला जात आहे.

सर आली धावून, खड्डे गेले वाहून

$
0
0
सामाजिक वनीकरण विभागाप्रमाणे वन विभाग स्वतंत्रपणे दरवर्षी वृक्ष लागवड करीत आहे. विभागाने २०१३-१४ यावर्षी दोन कोटी रुपये खर्च करुन १७ लाख रोपांची लागवड केली; मात्र यातील अर्धी रोपेसुद्धा जिवंत नाहीत. लागवडीची औपचारिकता पूर्ण करणे हाच विभागाचा अजेंडा आहे.

‘टार्गेट’च्या व्यापात वाहतूक बेलगाम

$
0
0
ब्रह्मदेव जरी आला, तरी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारू शकत नाही, अशी औरंगाबादच्या वाहतुकीविषयी मार्मिक प्रतिक्रिया तत्कालिन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शहरातून बदलून जाताना दिली होती. कारवायांतून दंडाच्या रकमेची कोट्यवधी रुपयांच्या दंडाची वसुली होत असतानाही, पोलिसांची शहर वाहतूक शाखा शिस्तीपेक्षा ‘टार्गेट’वरच लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसून येत आहे.

क्राईम ब्रँचला पहिल्यांदा दोन पोलिस निरीक्षक

$
0
0
पोलिस आयुक्तालयात शनिवारी पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. क्राईम ब्रँचला प्रथमच दोन पोलिस निरीक्षकांची नेमणूक केली आहे. मुंबई, नागपूर येथील धर्तीवर क्राईमची दोन युनिट निर्माण होण्याची शक्यता असून त्या पध्दतीने कामकाज चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शतकोटी लागवड ‘खड्ड्यात’

$
0
0
राज्य शासनाने ‘शतकोटी वृक्ष लागवड योजने’अंतर्गत जिल्ह्यात महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. रोजगार हमी योजनेतून गावांमध्ये रोपवाटीकांची निर्मिती आणि रोपांची लागवड करण्याच्या सूचना आहेत; मात्र बहुतेक ठिकाणी खड्डे आणि रोपे फक्त कागदावर दिसत आहेत. पैठण, वैजापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये काही हजार रोपेसुद्धा सुस्थितीत नसल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजना सपशेल फसली आहे.

प्रवाशांच्या सत्कारात अधिकाऱ्यांना चिमटे

$
0
0
परिवहन दिनानिमित्त आयोजित प्रवाशांच्या सत्कार कार्यक्रमात प्रादेशिक व्यवस्थापक अनंत मुंडीवाले यांनी अधिकाऱ्यांना चिमटे काढले. किती वेळ प्रवाशांना ताटकळत उभे ठेवणार? अगोदर फलाटावर गाडी लावा, अशा सूचना रविवारी दिल्या.

जनतेच्या पैशांचे ऑडिट करा

$
0
0
जनतेच्या पैशांचे ऑडिट व्हायलाच हवे. सार्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी त्याचा उपयोग होतो की कॉर्पोरेट्ससाठी होतो, ते तपासायलाच हवे असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.

भाजीपाला महागल्याने बजेट कोलमडले

$
0
0
उन्हाळा सरत आला असताना भाज्यांचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. बटाटा २५ रुपये किलो तर पालेभाज्यांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक भाजी ४० रुपये किलोंच्या घरात गेल्याने गृहिणींचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे.

एसटी महामंडळ करणार सिटीबसचा नवीन प्रस्ताव

$
0
0
शहर बस अधिक लोकोपयोगी करण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. शहर बस सेवा सुरळीत करून एसटीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने तयारी सुरू केली आहे.

‘डीटीएड’ प्रवेशप्रक्रिया आजपासून

$
0
0
‘डीटीएड’ अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया आज, सोमवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सात कॉलेजांमध्ये अर्जविक्री व स्वीकृती केंद्रे देण्यात आली आहेत. १६ जूनपर्यंत अर्जविक्री व ‌स्वीकृतीची प्रक्रिया चालणार आहे.

दीड लाख लिटर दुधाची जिल्ह्याबाहेरून आयात

$
0
0
जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दररोज सुमारे ८० ते ८५ हजार लिटर दूधाचे, तर खासगी दुग्धशाळांकडून ८० ते ९० हजार लिटर म्हणजेच शहरात दीड ते दोन लाख लिटर दूधाचे संकलन व विक्री होते. मात्र हे दूध कमी पडते; म्हणूनच नगर, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे एक लाख लिटर दूधाची विक्री होते. यावरून शहर व जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मोठा वाव असल्याचे स्पष्ट होते.

औरंगाबादमधून एअर एशिया, फ्लाय दुबईची भरारी

$
0
0
एअर एशिया आणि फ्लाय दुबई या दोन विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला आहे. आगामी हिवाळ्यात या सेवा सुरू होण्याची शक्यता वर्त‌वली जात आहे.

कुलगुरूपदासाठीचे मंगळवारी ‘इंटरअॅक्शन’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा शेवटचा टप्पा मंगळवारी पूर्ण होणार आहे. शोध समितीने राज्यपालांकडे पाठविलेल्या अंतिम पाच जणांना ‘इंटरअॅक्शन’साठी राज्यपाल कार्यालयाकडून निमंत्रण पोहचले आहे. ३ जून रोजी राज्यपालांसमोर पाच जणांचे ‘इंटरअॅक्शन’ होणार आहे.

तोट्यातील एसटी महामंडळाला सरकारकडून पाचशे कोटी रुपये

$
0
0
वाढते डिजेलचे दर, स्पेअर पार्टच्या वाढलेल्या किंमती, विविध आगारांमध्ये कमी झालेले भारमान यामुळे एसटी विभागाच्या तोट्यात दिवसाकाठी दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी राज्य शासनाने येत्या अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला.

डीएमआयसीचे भूसंपादन कासवगतीने

$
0
0
डीएमआयसी प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून जानेवारी महिन्यात संमतीपत्र भरून घेण्यात आली. त्यापैकी पाचशे शेतकऱ्यांना सव्वातीनशे कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आला. निधी प्राप्त होईल त्याप्रमाणे मोबदला वाटपाचे काम सुरू आहे. तरीही निधी अभावी भूसंपादनाचे काम मंदगतीने सुरू असून २४११ शेतकरी ९८९ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत.

मंत्रीपदाचा उपयोग जनतेसाठी

$
0
0
‘मला भरघोस मतांनी विजयी करणारे मतदार व सामान्य माणसाला कधीही विसणार नाही. मंत्रीपदाच्या शक्तीचा जनतेसाठी उपयोग करीन,’ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यांचा सिल्लोड येथे शुक्रवारी (३० मे) नागरी सत्कार करण्यात आला.

पीएचसीची अवस्था पाहून सीइओ अचंबित

$
0
0
राज्य सरकारने आखलेल्या उपक्रमानुसार जिल्हा परिषदेचे सीइओ दीपक चौधरी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) वासुदेव सोळंके यांनी गेल्या आठवड्यात नाचनवेल (ता.कन्नड) येथे मुक्काम केला. प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्दशा पाहून चौधरी अचंबित झाले. एमआरइजीएसची अंमलबजावणी, ग्रामपंचायतीला इमारत अशा अनेक गोष्टी गावकऱ्यांनी सीइओंकडे मागितल्या.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आजपासून काम बंद

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. सोमवारी राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर जमणार आहेत. तिथे धरणे आंदोलन केले जाईल. पाच जूनपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांच्या बदल्यांवर आज अंतिम निर्णय

$
0
0
पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या दुसऱ्या यादीला सध्यातरी स्थगिती देण्यात आली नाही. मात्र या प्रक्रियेवर जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग रजेहून आल्यानंतर, सोमवारी (२ जून) अंतिम निर्णय घेणार आहेत.

गंगाखेडच्या नगराध्यक्षांवर नगरसेविकेच्या अपहरणाचा गुन्हा

$
0
0
गंगाखेडचे भाजपचे नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका पद्ममिनी विलास जंगले यांच्या अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या अपहरणामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलेल्या गंगाखेड पॅटर्नला वेगळे वळण मिळाले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images