Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्कूटरवर फिरून नांदेडमध्ये ‘नेटवर्क’

0
0
गोपीनाथ मुंडे यांचे नांदेड जिल्ह्याशी अगदी सुरुवातीपासून संबंध आले आहेत. नांदेडमध्ये अगदी स्कूटरवरून, एसटी प्रवास करून त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला होता.

लातूरकरांचा ‘मित्र’ हरपला

0
0
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने ‘सख्खा शेजारी’ हरपल्याची भावना लातूर जिल्ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली. लातूर जिल्ह्याचे नेते विलासराव देशमुख यांच्याबरोबरील त्यांचे मैत्र सर्वश्रूत होतेच, शिवाय त्यांचा रेणापूर मतदारसंघही लातूर जिल्ह्यामध्येच येतो. या सर्व इतिहासाची उजळणी करत हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

नेतृत्व हरपल्याने हळहळ

0
0
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठवाड्यामध्ये शोककळा पसरली. बहुतांश शहरांमध्ये व्यवहार बंद ठेवण्यात आले आणि मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

...व्यासपीठ सुनं सुनं !

0
0
मंगळवारी सकाळी धडाधड दुकान बंद केली जात होती. अनेक जणांना नेमकं काय होतंय, याची माहितीही नव्हती. दूध, ब्रेड, पेपर आणायला घराबाहेर पडलेली माणसं. एकमेकांना विचारत होती, ‘काय झालंय? अशी सगळी दुकानं बंद का करतायत?’ अन् ‘मुंडे गेले’ हे उत्तर ऐकताच चेहरा पांढरा फटक पडत होता.

औरंगाबादला येणारी विमाने फुल्ल

0
0
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नवी दिल्ली, मुंबईहून येणारी मंडळी परळीला औरंगाबाद मार्गे जाणार आहेत. या मंडळींनी मुंबईहून बुधवारी (४ जून) सकाळी मुंबईहून येणाऱ्या दोन्ही विमानातील सर्व जागा आरक्षित झाल्या आहेत.

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...

0
0
काळजाला भिडणारे स्टेटस व पोस्टस सकाळपासून फेसबुक, व्हॉट्स अॅप व ट्विटर या सोशल मीडियावर धडकत होते. लोकनेता म्हणून ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडेच्या निधनाचे दुख अनेकांना जाणवत होते. प्रत्येक क्षणाला विविध विषयांचे पोस्ट; तसेच स्टेटस अपडेट करणाऱ्या नेटिझन्सने आपापल्या परीने या लोकनेत्याला श्रद्धांजली वाहिली.

भाजप कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

0
0
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील कार्यालय सुन्न झाले. येथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता व नेत्यांच्या डोळ्यात अश्रु होते.

पसरले दुःखाचे सावट!

0
0
राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटविण्याबरोबरच बीडची ओळख निर्माण करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त मंगळवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने येऊन थडकले आणि संपूर्ण जिल्हा शोकाकुल झाला.

गोपीनाथ मुंडे पंचतत्वात विलीन

0
0
हुंदके... आक्रोश... आणि ‘अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे’च्या घोषणांसह केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना बुधवारी दुपारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मुंडे यांच्यावर परळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघाताची CBI चौकशी कराःउद्धव

0
0
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंडे यांना मुखाग्नी दिल्यानंतर परळीतील जमावाने राज्यातील मंत्र्यांना घेराव घालण्यास सुरुवात केली.

दगडफेकीची चौकशी कराः पंकजा मुंडे

0
0
ज्येष्ठ भाजप नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परळी येथे दगडफेक झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी गोपीनाथ मुंडे यांची कन्या, परळीच्या आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी केली आहे.

आता आशा पंकजावर

0
0
तब्बल ४२ अंशांचे तापमान. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आवारात उभारलेले दोन छोटेखानी तंबू आणि आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघालेले हजारो चाहत्यांचे लोंढे... प्रत्येक हालचालीला दु:खाची गडद किनार.

लोकनेत्याला भावपूर्ण निरोप

0
0
राज्याच्या राजकारणावर आपला स्वतंत्र ठसा उमटवून गेलेले लोकनेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना बुधवारी परळीत लाखोंच्या जनसागराने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. मुंडे यांची कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी दुपारी दोनच्या सुमारास पार्थिवाला मुखाग्नी दिला.

विरोधक एकाच हेलिकॉप्टरमध्ये

0
0
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांचा रोष आणि सुरक्षेमुळे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय नेत्यांवर परळीतून मुंबईला जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये शेजारी-शेजारी बसण्याची वेळ आली. यात उद्धव ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ आणि माणिकराव ठाकरे यांचा सामवेश होता.

क्षीरसागर, छानवाल यांना पत्रकारिता पुरस्कार

0
0
विश्व संवाद केंद्रातर्फे दरवर्षी दिला जाणारा देवर्षि नारद पत्रकारिता पुरस्कार बीड येथील ज्येष्ठ पत्रकार नामदेवराव क्षीरसागर, तर युवा पुरस्कार औरंगाबाद येथील पत्रकार निरंजन छानवाल यांना जाहीर झाला आहे. १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजता महसूल प्रबोधिनी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

फुलंब्री तालुक्यातील पट्ट्यातून वाळू उचलण्यास कंत्राटदाराचा नकार

0
0
गिरजा नदीवरील पिंपळगाव वळण व वानेगाव या दोन वाळूपट्ट्यातून चोरटी वाळू वाहतूक होत असल्यामुळे कंत्राटदाराने फेब्रुवारी महिन्यात घेतलेले पट्टे सोडून दिले आहेत. कंत्राटदाराने हे पट्टे ३१ लाख ५० हजार रुपयांत घेतले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

सिल्लोडमध्ये व्यवहार बंद

0
0
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून शहरातील सर्व दुकाने बुधवारी (४ जून) बंद राहिली. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला दुकानदारांनी प्रतिसाद दिला. तालुक्यातील इतर मोठ्या गावांमध्येही दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

खऱ्या अर्थाने मराठवाडा पोरका

0
0
‘गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाडा खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे. मुंडेसाहेब तुम्ही पुन्हा जन्माला या,’ अशी भावना व्यक्त करत शहरातील मान्यवरांनी दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीनंतर शहरातून फेरी काढण्यात आली.

शेळके वस्तीवर चोरी

0
0
कोपरगाव रस्त्यावरील शेळके वस्ती येथे सोमवारी (२ जून) मध्यरात्री तीन चोरट्यांनी दोन घरातून सोन्याचे दागिने व मोबाईल फोन असा ४० हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेळके वस्ती भागातील प्रकाश छबु नांगरे व अन्य कुटुंबातील सदस्य झोपले होते.

‘मॅग्मो’च्या संपामुळे हॉस्पिटल ओस

0
0
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तालुक्यातील आरोग्य सेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तालुक्यातील सर्व दहा वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images