Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वेरूळ लेणीसमोरचा पूल धोकादायक

$
0
0
औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वेरूळ लेणी समोरील पुलाचे कठडे गायब झाल्यामुळे तो धोकदायक बनला आहे. या पुलावरून यापूर्वी अनेक वाहने कोसळली आहेत, परंतु या अपघातात जीवितहानी हानी झाली नाही. तरीही प्रवाशांच्या जिवाला धोका असल्यामुळे या पुलाला कठडे बांधण्याची आवश्यकता आहे.

भारनियमनात दोन तासांची फुलंब्री तालुक्यात वाढ

$
0
0
महावितरणने दोन तासांनी वीज भारनियमन वाढवल्यामुळे शेती अडचणीत आली आहे. वीज नसल्यामुळे वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे पिके सुकत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. या परिस्थितीत उन्हाळी पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

‘नांमका’तून उद्या सोडणार पाणी

$
0
0
नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर व कोपरगाव तालुक्यांतील लाभक्षेत्रातील गावांसाठी शुक्रवारी (६ जून) पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील जवळपास ३० गावांना उन्हाळी आवर्तनाचे शिल्लक पाणी मिळणार आहे. हे पाणी वैजापूरच्या हद्दीत रविवारी (८ जून) पोहचण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाने केली पैठणमध्ये दाणादाण

$
0
0
सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाने पैठण शहराला झोडपले. वादळी वाऱ्यामुळे बुधवारी (४ जून) अनेक झाडे व विजेचे खांब पडल्याने संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला. अनेक घरांचे व दुकानांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे.

वैजापूर पंचायत समिती उपसभापतींचा राजीनामा

$
0
0
वैजापूर पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती अॅड. प्रताप निंबाळकर यांनी बुधवारी (४ जून) पदाचा तालुकाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या सभापती लहानूबाई डिके यांनी सर्व सदस्यांना पदे उपभोगता यावीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.

सभाप‌तिपदासाठी शिवसेनेत जोरदार स्पर्धा

$
0
0
महापालिकेच्या स्थायी समिती सभापत‌िपदाची निवडणूक ६ जून रोजी होणार असून बुधवारपासून (४ जून) उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. अर्जाचे वाटप गुरुवारपर्यंत केले जाणार आहे. सभापतीपदासाठी ६ जून रोजी सकाळी दहा वाजता निवडणूक होणार आहे. हे पद मिळवण्यासाठी शिवसेनेत जोरदार स्पर्धा लागली आहे.

‘विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी प्रयत्नशील’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. बी. ए. चोपडे यांनी बुधवारी (४ जून) स्वीकारली. ‘मायक्रोबियल मॉलेक्युलर जेनेटिक्स’ विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ असलेले डॉ. चोपडे यांनी संशोधन, विकास आणि परिवर्तन या त्रिसूत्रीवर विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

मृत्यूनंतरही चार तास मृतदेह ‘ट्रॉमा’मध्येच पडून

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) ट्रॉमा विभागात दाखल महिलेचा दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आणि मृत्यूनंतरही मृतदेह तिथेच चार तास पडून राहिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ट्रॉमाच्या ब्रदरनेही अरेरावीची भाषा वापरल्याची तक्रार नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.

तलाठी सोकावले; शेतकरी धास्तावले

$
0
0
जमिनीला सोन्याचे मोल आल्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी सरकारी नियम डावलून जमिनीचे परस्पर फेर करुन अनागोंदी निर्माण केली आहे. चितेगाव (ता. पैठण) येथील सजाचे तलाठी टी. व्ही. सानप यांनी तब्बल ५६९ फेर बेकायदा केल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांतून ‘पीएमसी’ बेदखल

$
0
0
व्हाइट टॉपिंगच्या कामावर देखरेखीचे काम करणाऱ्या पीएमसीला कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून महापालिकेच्या प्रशासनाने काम थांबवण्यास सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल येत्या काळात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

पदवीधरसाठी तीन हजार कर्मचाऱ्यांचा ताफा

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी विभागीय प्रशासनाला ३ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रशासनाच्या वतिने या कर्मचाऱ्यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

‘साई’त बहरली नयनरम्य वनराई

$
0
0
अवघ्या दशकभरात सव्वालाखापेक्षा अधिक वृक्षवल्ली लावून पर्यावरणाचा एक आगळावेगळा आदर्श साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राने पाडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ७५ हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

टार्गेट ४७ लाख झाडांचे; खड्डे खोदले १५ लाख

$
0
0
जिल्हा प्रशासनाला २०१४ - १५ या आर्थिक वर्षात शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत विविध जातींच्या ४७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. मात्र यासाठी फक्त १५ लाख ८१ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे ही योजना बऱ्यापैकी कागदावरच आहे.

६० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट

$
0
0
महापालिकेने यंदा संपूर्ण शहरात साठ हजार झाडे लावण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्याची सुरुवात उद्या गुरुवारी पर्यावरण दिनी हर्सूल तलावाच्या जवळच्या स्मृतीवन उद्यानातून होणार आहे. शहरातील प्रमुख उद्याने, मोकळ्या जागांची निवड वृक्षारोपणासाठी करण्यात आली आहे.

चार वर्षांपासून पर्यावरण अहवालच नाही

$
0
0
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या व पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित झालेल्या औरंगाबाद शहराचा पर्यावरण अहवाल चार वर्षात तयारच केला नाही, अशी माहिती मिळाली आहे. पर्यावरण अहवाल तयार करा, असे म्हणत पालिकेचे विविध संस्थांच्या दारात भटकणे सुरूच आहे.

रस्त्यांसाठी अडीच हजार झाडांची कत्तल

$
0
0
शहरात अवघी ३.४ टक्के वनराई उरलेली असतानाच रस्त्यांसाठी आणखी अडीच हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. पैठण रोडवरील चार पदरी रस्ता, तर सिडको बसस्थानक व महावीर चौकातील उड्डाणपुलासाठी झाडांची कत्तल होणार आहे. सर्वाधिक कत्तल ही पैठण रोडवर होणार आहे. रस्त्यासह समांतर योजनेसाठी दोन हजार झाडांचा बळी जाणार आहे.

‘एमडीआर-टीबी लॅब’ सुरू होण्यास सज्ज

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत ‘एमडीआर-टीबी लॅब’ सुरू होणार असून, त्यासाठी विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. या विशेष प्रयोगशाळेसाठी लागणारी उपकरणे व स्वतंत्र मनुष्यबळ तयार आहे.

भल्या पहाटेच चोऱ्या करणारे दोघे अटकेत

$
0
0
फक्त भल्या पहाटे चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना सायबरसेलच्या प‌थकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सहा मोबाइल जप्त केलेत. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

फेसबुकच्या मुख्यालयाचे पोलिसांनी ठोठावले दार

$
0
0
महापुरुषांच्या आक्षेपार्ह मजकुराबाबत शहर पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलने, थेट फेसबुकच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयाशी संपर्क साधला. फेसबुकवर हा मजकूर अपलोड करणाऱ्याची माहिती येत्या दोन दिवसांत मिळेल, असे सायबरसेलच्या वतीने सांगण्यात आले.

गोदामामधून ९० हजारांचे पार्टस् लंपास

$
0
0
चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीच्या गोदामातून ९० हजाराचे लोखंडी पार्टस पळवल्याची घटना शुक्रवारी घडली. चिकलठाणा एमआयडीसी भागात पद्मावती पॉलिपॅक्स प्रा. लि. नावाच्या कंपनीचे गोदाम आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images