Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाचशेची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0
पाचशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गुन्हेशाखेच्या तत्कालीन कर्मचाऱ्याला वर्षाची सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

‘हंड्रेड डेज’मध्ये ‘साई’ प्रशिक्षण केंद्र

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या योजनेत क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) औरंगाबादेतील केंद्राचा समावेश करण्यात आला असून, औरंगाबाद केंद्रातील लवकरच सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

...चक्क चौदा लाखांची बाइक!

$
0
0
दीडशे मर्सिडिज बेंझ खरेदी करणारे औरंगाबाद. डीएमआयसीमुळे देशभर नाव झालेले औरंगाबाद. इथली समृद्धी झपाट्याने वाढते आहे. शहराचा मूड लेटेस्ट मोबाइल व्हर्जन, बाजारात नवी आलेली बाइक आणि फेसबुक, ट्विटरवर होणाऱ्या अपडेटनुसार बदलतो आहे.

२४०० कोटींची खिरापत

$
0
0
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पाचशे कोटी रुपयांच्या बदल्यात २० वर्षाच २४०० कोटी रुपयांची खिरापत देण्याचे नियोजन पालिकेने केली आहे. ठेकेदारावरच्या या कृपादृष्टीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

दौलताबादमध्ये तोडफोड

$
0
0
लोडशेडिंगच्या विरोधात संतप्त दौलताबाद येथे संतप्त जमावाने, मंगळवारी मध्यरात्री, रास्ता रोको करुन ग्रामपंचायत व महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली. घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत २२ आरोपींना अटक केली.

औरंगाबादेत आज, उद्या पाणी नाही

$
0
0
शहराच्या अनेक भागात गुरुवार व शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. तर, काही भागात पाणीपुरवठा उशिरा होईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

लोकनेत्याला साश्रूनयनांनी निरोप

$
0
0
राज्याच्या राजकारणावर आपला स्वतंत्र ठसा उमटवून गेलेले लोकनेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना परळीत लाखोंच्या जनसागराने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. मुंडे यांची कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी दुपारी दोनच्या सुमारास पार्थिवाला मुखाग्नी दिला. आपल्यासाठी सतत संघर्षरत असलेल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून गर्दी उसळली होती.

भाडेकरूकडून दीड लाखावर डल्ला

$
0
0
शहरातील मोदीखाना परिसरात राहणाऱ्या एका भाडेकरूनेच घरमालकाच्या घरावर डल्ला मारून दीड लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित भाडेकरूविरोधात सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पालकमंत्र्याचे आश्वासन हवेत विरले

$
0
0
गेल्यावर्षी महिला मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री डी.पी सावंत यांनी नांदेडला महिला आयटीआय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या जून महिन्यात महिला आयटीआय सुरू होण्याची शक्यता नाही. या सोबतच परभणी येथे सुरू होणाऱ्या महिला आयटीआयची शक्यताही मावळली आहे.

वादळी पावसाचा उस्मानाबादला फटका

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यासह शहर परिसरात गुरुवारी सायंकाळी चार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरवासियांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

वादळी वाऱ्याने महावितरणचे नुकसान

$
0
0
बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्यात अतिउच्च दाब वाहिनीचे मनोरे तर महावितरणचे शेकडो खांब कोसळल्याने अनेक उपकेंद्रांना येणारा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

‘पंकजा मुंडेंना मंत्रिपद द्यावे’

$
0
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या राज्यातील समर्थकात नैराश्य आले आहे. आपला मोठा आधार व मोठा नेता गमावल्याचे दु:ख त्यांना झाले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थी विसर्जित

$
0
0
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन गुरुवारी सकाळी गंगाखेड येथील गोदावरी गंगापात्रात शोकाकुल वातावरणात करण्यात आले.

मराठवाड्यावर अजूनही शोककळा

$
0
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन होऊन गुरुवारी तीन दिवस लोटली आहेत. मराठवाड्यातील नागरिक मात्र, या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत.

जालन्याचे आंबे निघाले अमेरिकेला…!

$
0
0
फळांचा राजा असलेल्या आंब्याला अमेरिकतून चांगलीच मागणी वाढली आहे. यावर्षी जालन्यातून आजपर्यंत तब्बल साडेतेरा टन आंब्यांची निर्यात झाली आहे. महिनाअखेरपर्यंत यात आणखी १० टनाची भर पडण्याची शक्यता आहे.

उद्योगांसाठी शून्य, फक्त निवडणुकीचे गाजर

$
0
0
राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सादर केलेला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे केवळ धूळफेक आहे आणि खरे म्हणजे निवडणुकीचे गाजर आहे.

विद्यापीठात मुंडे यांना श्रद्धांजली

$
0
0
दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री व मराठवाड्याचे सुपूत्र गोपीनाथ मुंडे यांना गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयासमोर श्रद्धांजली सभा झाली.

कृषी अधिकाऱ्यास खुलताबादमध्ये मारहाण

$
0
0
शेतकरी सल्ला समितीचे अशासकीय सदस्य संजय तायडे पाटील यांनी मंडळ कृषी अधिकारी डी. एम. जाधव यांना गुरुवारी (५ जून) मारहाण केली. ही घटना दुपारी साडेचार वाजता तालुका कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण यांच्या दालनात घडली.

गारपीटग्रस्तांचे २१९ कोटी रुपये पडून

$
0
0
राज्य सरकारने गारपीटग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेला ४६० कोटी रुपयांचा निधी नुकताच मिळाला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत गारपीटग्रस्तांसाठी ९७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून प्रशासनाने आतापर्यंत ७५१ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

जिल्ह्यात आजपासून पोलिसभरती

$
0
0
जिल्ह्यात शुक्रवारपासून (६ जून) पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. शहर पोलिस दलातील पोलिस भरतीसाठी एकूण ३८४ जागांसाठी पंधरा हजारावर अर्ज आले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>