Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मतदार नावनोंदणीला आजपासून सुरुवात

$
0
0
मतदार याद्यांच्या पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार तसेच चुकीने मतदार यादीतून नावे वगळली गेली असतील. अशा मतदानापासून वंचित राहाव्या लागल्या सर्व मतदारांसाठी सोमवारपासून (दि. ९) मतदार यादीत नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

खुलताबादला लोडशेडिंगचा शॉक

$
0
0
राज्यात वीजनिर्मिती करणारे संच बिघडल्याने विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात तीन हजार ते पाच हजार मेगावॅट वीज कमी पडू लागली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने लोडशेडिंग सुरू केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाई

$
0
0
हिंगोली जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी प्रशासन काहीही प्रयत्न करीत नसल्याचे चित्र आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ या मोठ्या शहरांसह अनेक गावंमध्ये पिण्याच्या शुद्ध आणि पुरेसे पाणी नाही.

१० ते २० टक्क्यांनी शालेय साहित्य महागले

$
0
0
कागद, उत्पादन प्रक्रियेच्या खर्चातील वाढ यामुळे शालेय साहित्यांच्या किंमतींमध्ये सरासरी १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. पुस्तकांच्या किंमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही.

‘मुंडेनी जोपासले राजकारणापलिकडे संबंध’

$
0
0
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना रविवारी जालन्यात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘गोपीनाथ मुंडे हे कोण्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते. त्यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने अपिरिमित नुकसान झाले,’ असे प्रतिपादन राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

९३ हजार ब्रास वाळू वाचली

$
0
0
गेल्या आर्थिक वर्षात लिलावात कोणीही न घेतलेल्या १८ वाळूपट्ट्यांसाठी नुकताच देकार पद्धतीने लिलाव करण्यात आला. यापैकी केवळ दोनच वाळुपट्ट्यांना ठेकेदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे आता जिल्ह्यातील १२ आणि संयुक्त ४ संयुक्त अशा १६ वाळुपट्ट्यातील उपसा आता होणार नाही.

चौथीच्या पाठ्यपुस्तकात सयाजीरावांचा पाठ

$
0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि निर्मिती मंडळाने चौथीच्या बालभारती पाठ्यपुस्तकाच बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड ह्या गुणग्राहक राजाची दूरदृष्टी दाखवणारा बाबा भांड यांचा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर आक्षेप

$
0
0
उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकांकडून हलगर्जीपणा झाल्याने नापास झाल्याची ओरड बारावीचे विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत घेण्यासाठी बोर्डात धाव घेत आहेत.

राष्ट्रपुरुष विटंबनेचे राज्यभरात पडसाद

$
0
0
सोशल मीडियातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कथित विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी राज्यभर अनेक ठिकाणी उमटले.

‘नर्सिंग’साठी सीईटीची अट शिथिल

$
0
0
यंदाच्या पी. बी. बी. एस्सी आणि एम. एस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी सुरू असलेली सीईटीची अट महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये मंत्रालयाने शिथिल केली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य खासगी नर्सिंग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी कळविली आहे.

तीन वेगळे कुलगुरू

$
0
0
डॉ. विजय पांढरीपांडे, डॉ. विद्यासागर व नवनियुक्त डॉ. बी. ए. चोपडे हे तिन्ही कुलगुरू शास्त्रज्ञ आहेत. कुलगुरू निवडीची पद्धत बदलल्यानंतर त्या अर्थाने विद्यापीठाचा लाभ झाला आहे. डॉ. पांढरीपांडे यांनी विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळवून पाया रचला.

घाटीच्या ओपीडीत लवकरच ‘एक्स-रे’

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तब्बल तीन वर्षानंतर ‘एक्स-रे’ची सुविधा उपलब्ध होणार आहे. ओपीडीसाठी एक स्वतंत्र उपकरण, तर दोन नवीन उपकरणे सर्जिकल बिल्डींगमध्ये असलेल्या क्ष-किरण विभागामध्ये उपलब्ध होणार आहे.

पर्यायी रस्त्यावर पार्किंगचे अतिक्रमण

$
0
0
उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी जालना रस्त्यावर दुतर्फा पर्यायी रस्ता बनवून देण्यात आला. आयते डांबरीकरण झालेल्या या रस्त्यावर पार्किंगचे अतिक्रमण झाल्याने एरव्ही ट्रॅफिकची वाट लागलेला जालना रस्त्याचा श्वास पुरता कोंडला आहे. पुढे हे काम वेगाने सुरू झाल्यानंतर अडचणीत भर पडणार आहे.

भाजपच्या नियोजनावर राष्ट्रवादीची नजर

$
0
0
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराला सोमवारपासून जोर येणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीकडची प्रचारयंत्रणा थांबली होती. पण सोमवारपासून पुन्हा एकदा प्रचार धडाक्यात सुरू हेणार आहे.

विजयाने गाफील राहू नका

$
0
0
‘लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला म्हणून गाफिल राहू नका. चार महिने हातात आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आता विधानसभेवर भगवा फडकावण्यासाठी कामाला लागा,’ असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

पाण्यासाठी घाम निघाला

$
0
0
वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोडमडलेले औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक अद्याप सुरळीत होऊ शकले नाही. पालिका प्रशासन आणि ‘महावितरण’ यांच्यातील विसंवादाचा परिणाम शहरवासीयांना भोगावा लागत आहे.

पर्यटकांसाठी ‘एसी’ एसटी

$
0
0
औरंगाबादहून वेरूळ, अजिंठ्याला जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. येत्या महिनाभरात एसटी महामंडळाकडून अजिंठा व वेरूळसाठी वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून पर्यटकांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

हिंगोली शिवसेनेत धुसफूस

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर उफाळून आलेली जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. दोन गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. ही धुसफूस आता फेसबूकद्वारे ग्लोबल बनली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालण्याची मागणी सामान्य शिवसैनिक करीत आहेत.

‘अच्छे दिन’साठी झगडा सुरू

$
0
0
‘शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ कधीच येत नसतात. त्यामुळे महायुतीत असलो तरी शेतकऱ्यांसाठी संघर्ष कायम सुरू राहणार आहे. किमान हमी भाव, योग्य ऊस दर आणि दूध प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार आहे.

६ मेडिकल कॉलेजांत प्रवेश नाही

$
0
0
पायाभूत सुविधा न पुरविल्यामुळे राज्यासाठी नव्याने मंजूर झालेल्या सहा शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश होणार नाहीत. त्यामुळे ६०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी हुकणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images