Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘पाणीबाणी’ सुरूच

$
0
0
महापालिका आणि महावितरण यांच्यातील विसंवादामुळे शहराच्या अनेक भागात सलग सहाव्या दिवशीही पाणीपुरवठा झाला नाही. सिडको, हडको व गारखेडा भागातील नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागले.

चार महिन्यांत अकरा जणांचा बळी

$
0
0
मराठवाड्यात गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस आणि वीज पडण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. वीज पडल्याने जीव गमवावे लागण्याचे प्रमाणही मराठवाड्यात लक्षणीय आहे. एकट्या बीड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात अकरा जणांचा बळी गेला आहे.

‘शुद्धजल’ निर्मितीचे तीन प्रकल्प सील

$
0
0
सिडको येथील एमआयडीसी भागातील वॉटर प्लांटमधील पाणी नमुन्यात सायनाइड आढळून आल्यानंतर अवैध मार्गाने मिनरल वॉटरची निर्मिती करणाऱ्या नांदेड परिसरातील तीन ‘शुद्धजल निर्मिती प्रकल्पांना’ अन्न आणि औषधी प्रशासनाने सील ठोकले.

ताम्रपटांची माहिती मंत्रालयात नाही!

$
0
0
राज्याच्या मंत्रालयातून स्वातंत्र्यसैनिकांच्या फाईली गहाळ झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता केंद्र शासनाने राज्य सरकारला दिलेले ताम्रपट व ताम्रपट प्रदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची यादी उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

$
0
0
मृग नक्षत्रातील पावसाने दगा दिल्यामुळे पूर्ण तयारी करूनही तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला उशीर झाला तर, उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाला सुरुवात न झाल्याने बियाणे खरेदीसाठी अद्याप शेतकऱ्यांची गर्दी झालेली नाही.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा पावसाची

$
0
0
मृग नक्षत्र सुरू झाल्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. जमिनीची पूर्वमशागत करुन शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. खते-बियाण्यांचा मुबलक साठा असल्यामुळे सर्वजण पहिल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

शेंदुरवादा सर्कलमधील गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

$
0
0
गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा सर्कलमध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. गारपीटग्रस्त भागातील पंचनामे वस्तुस्थिती न बघता केलेले आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागांचे पंचनामे योग्य न झाल्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही.

सार्वजनिक आरोग्य सेवेला उपचारांची गरज

$
0
0
राज्यातील ग्रामीण भागाचे आरोग्य जपण्याची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले. पाच दिवस ग्रामीण भागातील आरोग्य पुरते बिघडले होते. प्रशासनाने मात्र काहीच परिणाम झाला नाही असा दावा केला.

बीड बायपासवरील ‘सीसीटीव्ही’ बंद

$
0
0
गेल्या आठ दिवसांपासून बीड बायपासवरील १५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या कॅमेऱ्यांचे कंट्रोल सातारा पोलिस ठाण्यात आहे, मात्र कॅमेरे बंद पडल्यामुळे या मार्गावार होणारे घात कळत नाहीत. सोबत अपघातांचीही नोंद होत नाही.

भाजीपाल्याची महागाई

$
0
0
भाजीपाल्याची आवक मंदावल्यामुळे ग्राहकांच्या मोठा फटका बसत आहे. कांदे, फुलकोबी, वांगे, दोडके या भाज्यांचे भाव वधारले असून जेवणाची चव वाढविणाऱ्या कोथिंबीरच्या एका जुडीसाठी दहा रुपये मोजावे लागत आहे.

विद्यार्थ्यांसाठी विशेष सेमिनार

$
0
0
दहावीनंतर पुढे काय? याबाबत विशेष मार्गदर्शन शिबिराचे गुरुवारी १२ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी चार वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे हा सेमिनार होईल. यावेळी राज्य आणि देशपातळीवर होणाऱ्या विविध परीक्षा तसेच करिअरच्या संधी विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मराठवाड्यात ‘स्वाभिमानी’ची चाचपणी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढवणारी ‘स्वाभिमानी’ मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

सिडको-हडकोतले पाणी पेटले

$
0
0
शहराच्या सिडको - हडको भागात पाणीबाणी कायमच आहे. सहा-सहा दिवस पाणी येत नसल्यामुळे नागरिक कमालीचे त्रासले आहेत. खासदार, महापौर यांनी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी बैठका घेतल्यानंतरही पाणीची समस्या कायम आहे.

कर्णपुरा परिसरात बिबट्याचा वावर

$
0
0
कर्णपुरा, बनेवाडी परिसरात गेल्या पंधरा दिवसामध्ये कुत्रा व मोर वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा आला असल्याची शक्यता असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सिलिंडर पाइपच्या स्फोटाने घाटीत घबराट

$
0
0
घाटीतील नवजात शिशू अतीदक्षता विभागासाठी कार्यान्वित सेंट्रल ऑक्सिजन सिस्टममधील पाइप फुटून छोटा स्फोट झाला. या स्फोटाने घाटीत घबराट पसरली होती. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेने कुठलेही नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

गंगापूरचा लाचखोर विस्तार अधिकारी जाळ्यात

$
0
0
गंगापूर पंचायत ‌समितीचा विस्तार अधिकारी लक्ष्मण गव्हाणे यास पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (९जून) दुपारी गंगापूर येथे अटक केली.

जालन्याचे नेत्रालय देशाच्या (दृष्टी)पटलावर

$
0
0
‘मृत्यूनंतरही जग पाहण्याची संधी,’ अशा भावनिक प्रचारानंतरही देशामध्ये नेत्रदानाचा प्रचार वेगाने झालेला नाही. मात्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये कार्यरत असणाऱ्या एका संस्थेने अल्पावधीतच नेत्रदानाविषयी ‘दृष्ट’ लागण्यासारखी कामगिरी केली आहे.

वेबसाइटवरून मिळणार मतदार नोंदणीची माहिती

$
0
0
मतदारांना नाव नोंदणीनंतर आता आपल्या अर्जाच्या स्थितीची माहिती थेट www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून समजू शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.

पहिल्या पावसात जीटीएल फेल

$
0
0
जूनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसात जीटीएल सपशेल फेल झाले. शहरातील अनेक भागात वीज गायब झाल्याने नागरिकांना थंड सरीतही घामाघूम व्हावे लागले.

गारपीटग्रस्तांचे १७ कोटी पडून

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेल्या १०८ कोटी रुपयांपैकी १७ कोटी रुपयांचे अद्याप शेतकऱ्यांना वाटप झालेले नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील अडचणींमुळे निधी वाटपात विलंब होत असल्याचा दावा जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images