Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तब्बल ४८ तास वीज गायब

$
0
0
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील वीजवितरण यंत्रणा जुनी झाल्याचा फटका जवळपास ३०० उद्योजकांना बसला. सोमवारी (९ जून) सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे एमआयडीसीतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

पालिकेच्या मालमत्ता कराचे ‘लॉग ऑन’

$
0
0
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याचे आवाहन नागरिकांना केले असून त्या उद्देशाने उद्देशाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांत एका दिवसाचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

पाइपलाइन फुटल्याने नागरिकांचे हाल

$
0
0
हिमायतनगर तालुक्यातील वटफळी येथे नळ योजनेची पाइपलाइन फुटल्याने नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तीन मुलींसह पित्याचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0
हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या तीन मुलींसह पित्याचा बुडून मृत्यू झाला. सर्वांत लहान मुलगी कोमल मात्र बचावली आहे. रात्री उशिरापर्यंत एका मुलीचा मृतदेह तलावातून काढण्यात यश आले आहे. तीन मृतदेहांचा शोध अद्यापही लागलेला नाही.

वाळूमाफियांच्या साठेबाजीला उधाण

$
0
0
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून रेती घाट नसलेल्या ठिकाणांहून वाळू माफियांनी रेतीचा बेसुमार उपसा करण्यावर भर दिला असून पावसाळ्यापूर्वी रेतीची साठेबाजी करण्याकडे त्यांचा कल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंडेंच्या अस्थी गोदावरीत विसर्जित

$
0
0
सुमारे पन्नास हजार कार्यकर्ते व समाजबांधवांच्या उपस्थितीत गुरुवारी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी करून गोदावरीत अस्थी विसर्जन करण्यात आले. नाथ समाधी मंदिरामागील कृष्णकमल तीर्थावर वैदिक मंत्रोच्चाराच्या घोषात हा धार्मिक विधी होताना कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.

वसतिगृह प्रवेश यंदा ऑनलाइन

$
0
0
समाजकल्याण विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात यंदा ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करावे लागणार आहे. येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल. समाजकल्याणचे जिल्ह्यात एकूण १७ वसतिगृह असून त्यांची एकूण विद्यार्थी क्षमता २,४०० एवढी आहे.

दररोज साडेतीन लाख अंड्यांचा फडशा!

$
0
0
उन्हाळ्यात अंडी खाऊ नयेत, हा बिनबुडाचा सल्ला धुडकावून लावत औरंगाबादकर दररोज तब्बल साडेतीन ते चार लाख अंडी फस्त करीत आहेत! शहरात तेवढी अंडी तयार होत नसल्यामुळे ती हैदराबाद, नवापूर, होस्पेट आदी शहरांमधून मागविली जात आहेत.

सभागृहे झाली जुगाऱ्यांचा अड्डा

$
0
0
परिसरात पसरलेला प्रचंड कचरा, उनाड मुलांचा अड्डा आणि जुगाऱ्यांनी मांडलेला पत्त्यांचा डाव. कैलासनगरच्या सामाजिक सभागृहाचे हे चित्र शहरातील सर्व सामाजिक सभागृहांचे प्रातिनिधित्व करते.

उंच आकाशातून पाहा देवगिरी किल्ला

$
0
0
साहसी पर्यटनाचा थरार अनुभवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी औरंगाबादजवळ दौलताबाद येथे हॉट एअर बलूनची राइडची सोय करण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये पर्यटन वाढीसाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘एलबीटी’च्या बैठकीला महापौरांची दांडी!

$
0
0
स्थानिक संस्था करासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केलेल्या बैठकीला महापौर कला ओझा गेल्याच नाहीत. त्यांच्या या अनास्थेबद्दल महापालिकेतील विरोधीपक्षाच्या प्रमुख नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

प्रेमीयुगूलाला संतप्त जमावाचा चोप

$
0
0
संतप्त जमावाने प्रेमीयुगूलाला गुरुवारी (१२ जून) दुपारी मयूरपार्क भागात चोप दिल्याची घटना घडली. जमावावर सौम्य बळाचा वापर करत पोलिसांनी त्यांच्या तावडीतून युगलाची सुटका केली.

टेलिफिशिंग अॅटॅकरची टांगती तलवार

$
0
0
‘हॅलो मै एसबीएच बँक के दिल्ली हेड ऑफिससे गुप्ता बात कर रहा हूं, आपका डेबिट कार्ड ब्लॉक हो चुका है, कृपया अपना कार्ड नंबर बताईये ताकी आपकी सेवा तुरंत शुरू की जा सकती है,’ असे फोन सध्या एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डधारकांना सर्रास येत आहेत.

सर्रास ट्रिपल सिट वाहतूक सुरू

$
0
0
शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडून गेली आहे. जालना रोड, अदालत रोड, व्हिआयपी मार्ग, सेव्हनहिल, जळगाव टी पॉइंट या मार्गावर गुरुवारी (१२ जून) दुचाकीवर सर्रास ट्रिपल सिट वाहतूक सुरू असलेली दिसली. मिलकॉर्नर भागात तर पोलिसही ट्रिपल सिट वाहतूक करण्यात मागे नव्हते.

क्रीडा संकुलातील गवत खाल्ले

$
0
0
विभागीय क्रीडा संकुलात अधिकारी आणि कंत्राटदाराने हिरवळच खाल्ल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. हिरवळ जतन करण्याच्या नावाखाली सुमारे पंधरा लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

१२०भूखंडच पालिकेच्या नावे

$
0
0
महापालिकेच्या मालकीच्या व महापालिकेकडे हस्तांतर झालेल्या १,३०० भूखंडांपैकी फक्त १२० भूखंड अधिकृतपणे पालिकेच्या नावावर झाले आहेत. तब्बल १,१८० भूखंड अद्यापही पालिकेच्या नावावर होणे बाकी आहे. भूखंड नावावर करून घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.

रस्ता अपघातात बीडजवळ आठ ठार

$
0
0
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर, उभ्या असलेल्या ट्रकवर तवेरा धडकून, तवेरातील सहा जण जागीच ठार झाले तर, दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील नामलगावजवळ गुरुवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

नांदेडमध्ये वीज पडून ७ ठार

$
0
0
जिल्ह्यात झालेल्या अचानक पावसामुळे शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली. त्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून ५ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. माहूर तालुक्यातील लांजी शिवारात ३, कंधार तालुक्यातील ब्रह्मवाडी येथे २ तर लोहा तालुक्यातील धानोरा येथे १ जण ठार तर मुखेड तालुक्यात एक जण ठार झाल्याची घटना आमच्या वार्ताहरांनी कळविली आहे.

दारूसाठी पैसे मागितल्याने खून

$
0
0
दारू पिण्यासाठी पैसे मागितले म्हणून एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना पिंपळवाडी येथे घडली. विलास राधाकिसन जोडणार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.

बालकाच्या अन्ननलिकेतून काढला सेल

$
0
0
खेळता-खेळता बालकाच्या तोंडात सेल गेला आणि थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. उलट्या सुरू झाल्या आणि पालकांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी दुर्बिणीद्वारे शर्थीचे प्रयत्न करून सेल काढण्यात आला. आता बालकाची प्रकृती सुधारत आहे. मागच्या १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images