Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अंबाजोगाई जिल्ह्याला यंदाही ‘खो’च

$
0
0
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या अंबाजोगाई जिल्ह्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच दाखविण्यात आल्या.

भोंदू महाराजाविरोधात गुन्हा दाखल

$
0
0
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे भोंदूगिरी करून जनतेस लुटणाऱ्या एकनाथ लोमटे कथित महाराजाविरोधात येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.

टाकसाळेंना कोर्टाचा दिलासा

$
0
0
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करीत चौकशी सुरू करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचे वेध

$
0
0
जागतिक बाजारपेठ आणि कापसाच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. यंदा कपाशीच्या पारंपरिक वाणाकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी लांब धाग्याच्या बीटी बियाण्यांना पसंती दिली आहे.

पोलिसांच्या कारवाईचा परिणाम शून्य

$
0
0
जालना शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी गुरूवारी रस्त्यावरील बेकायदेशीर रिक्षा व वाहनांच्या चाकातील हवा सोडून वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची जाहीर कानउघाडणीही केली.

शाळांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन करा

$
0
0
‘एज्युकेशन हब’ म्हणून झपाट्याने पुढे येत असलेल्या औरंगाबादमध्ये शालेय प्रवेशाबाबत पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. यंदा १६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. प्रवेशाबाबत अनेक पालकांच्या तक्रारी असतात.

‘केवायसी’मुळे पेट्रोल संकटाची शक्यता

$
0
0
पेट्रोलियम कंपनीने पंपचालकांकडून ‘नो यूअर कस्टमर’ (केवायसी) अर्ज भरून घेताना विक्रेत्यांकडे बँक बॅलेन्सशीटची मागणी केली आहे. त्याला पेट्रोल पंपचालकांनी विरोध सुरू केला आहे.

रिक्षा चोरून तो फक्त इंजिन विकायचा

$
0
0
कुठलीही गोष्ट करण्यासाठी कल्पकता लागते हे म्हणतात ते खोटे नाही. चक्का चोरीच्या घटनेतही तसे उघड झाले आहे. त्या चोराची कल्पकता ही की, तो कधी रिक्षा चोरायचा.

कुदळीचा घाव बसला, पण वेळ चुकली

$
0
0
कुदळीचे घाव घालत एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (१२ जून)पहाटे मयूरपार्क भागात घडली. नागरिकांच्या आरडाओरड्याने आरोपीने धूम ठोकली. याप्रकरणी तीन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

कोर्टाचा अवमान, आयुक्तांना नोटिस

$
0
0
पर्युषण पर्वात शहरातील मांसविक्री बंद ठेवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई न केल्याने हायकोर्टाने, पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना नोटिस बजावली आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होईल.

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट

$
0
0
यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच निम्मा जून उलटूनही पावसाला सुरुवात न झाल्यामुळे मराठवाड्यातील पेरण्या लांबल्या असून, संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

मुलीस डांबणाऱ्या भोंदूस अटक

$
0
0
उपचारांसाठी आलेल्या १६ वर्षीय मुलीस मांत्रिकाने पत्नीच्या मदतीने रात्रभर डांबल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री राजीवनगर भागात हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मुलीने तक्रार दिली.

काँग्रेस तालुकाध्यक्ष गजाआड

$
0
0
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या लोहारा शाखेतून कर्ज घेतलेल्या दोन शेतकऱ्यांनी पंधरा वर्षांनंतरही कर्जाचा भरणा न करता तारण दिलेली जमीन पत्नीच्या नावे परस्पर हस्तांतरीत केल्यामुळे बँकेने या दोन्ही शेतकऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पेरण्या ठप्प; शेतकरी चिंतातूर

$
0
0
अविकसित आणि दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या ठप्प आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत चिंतातूर आहे.

‘एमबीबीएस’च्या १६ हजार जागा घटल्या

$
0
0
पायाभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्यावरून देशभरातील सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस प्रथम वर्षाच्या तब्बल १५ हजार ८९० जागा भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) कमी केल्या आहेत.

महावितरणची स्वतःलाच ‘क्लीन चिट’

$
0
0
शहरातील पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळित असून, महापालिका प्रशासन वारंवार खंडित होणाऱ्या विजेचे कारण पुढे करीत आहे, मात्र महापालिकेच्या यंत्रणेतच बिघाड आल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे.

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके

$
0
0
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (१४ जून), शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. त्यापैकी एक गणवेश पहिल्या पंधरा दिवसांत देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

‘तहसील’ विभाजनाचा प्रस्ताव

$
0
0
औरंगाबाद तहसीलचे शहर आणि ग्रामीण असे विभाजन करण्याचा नवा प्रस्ताव येत्या आठवडाभरात सरकारला सादर करावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. येत्या दीड ते दोन महिन्यांत तहसील कार्यालयाचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत.

महावीर चौकात लूटमार

$
0
0
मित्राची वाट पाहात थांबलेल्या तीन तरुणांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने आइसक्रिम खाण्यासाठी पैसे द्या, असे म्हणत मारहाण केली व त्यांच्याकडील आठ हजारांची रोकड लंपास केली. प्रतिकार करणाऱ्या फिर्यादीच्या कारची काचही आरोपींनी फोडली.

इंग्रजीच्या पुस्तकात उतारा चुकला !

$
0
0
चौथीच्या इंग्रजी माध्यमाच्या इंग्रजी पुस्तकातील उतारा चुकल्याचे समोर आले आहे. बालभारतीने आता ही पुस्तके परत मागविली आहेत. आता हा उतारा दुरुस्त करण्याची प्रक्रियाही विभागीय पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रात सुरू झाली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images