Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘कबड्डी मॅट’ राष्ट्रवादी भवनात

$
0
0
प्रत्येक जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडवण्यासाठी राज्य सरकारच्या क्रीडा खात्याने उपलब्ध करून दिलेली लाखो रुपयांची कबड्डी मॅट हडकोतील राष्ट्रवादी भवनात पडून आहे. एकाही स्पर्धेसाठी न वापरलेल्या या मॅटचा उपयोग, पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकांसाठी होत असल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे.

सिंचन घोटाळ्याला मुख्यमंत्रीही जबाबदार

$
0
0
‘राज्याच्या सिंचन घोटाळ्याला तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे भाजप या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करीत आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना बीडमध्ये रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार चंद्रकांत खैरे आदी नेते या वेळी उपस्थित होते.

पोलिसांसाठी इमारतीचा बोलबालाच

$
0
0
हिमायतनगरमधील जीर्ण झालेल्या इमारतीच्या धोक्यापासून पोलिसांना सुरक्षा मिळावी म्हणून नूतन इमातीचे काम सुरू केले. दोन वर्षांपासून सुरू केलेले काम अद्यापही अर्धवट असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर पोलिसांना जीवघेण्या इमारतीत काम करावे लागत आहे.

आठ हजार हेक्टरवरील पेरा धोक्यात

$
0
0
जून अर्धा संपत आला, तर पावसाचे नाव नाही. जिल्हात टॅँकरच्या फेऱ्या सुरूच आहेत. तर तालुक्यातील तब्बल आठ हजार हेक्टरवरील कापूस आणि मिरचीचा पेरा धोक्यात आला आहे. दोन-चार दिवसांत पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे.

अडचणींनंतरही पाऊणशे व्यक्तींना दृष्टीदान

$
0
0
अनेक अडचणींवर मात करीत मागच्या वर्भरात सुमारे ७५ अंध व्यक्तींना नवीन दृष्टी मिळाली आहे. परवाना नूतनीकरण झाले नसल्याने सहापैकी केवळ तीन नेत्रपेढ्यांमार्फत मागच्या वर्षी नेत्रदान झाले.

‘डीएनए’ घेण्याची घोषणा हवेतच

$
0
0
उत्तराखंड प्रलयाला सोमवारी (१६ जून)रोजी एक वर्ष पूर्ण होईल. त्यात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कुठे माय लेकराचे ताटातूट झाली, तर कुठे बहिण भावाची. या कुटुंबीयांना आपल्या गेलेल्या लोकांची माहिती मिळावी यासाठी नमुने घेण्याचे जाहीर केले, पण वर्ष उलटल्यानंतरही डीएनएचे नमुने घेतले नसल्याचे समोर आले आहे.

विकासाला खीळ बसू देऊ नका

$
0
0
औरंगाबाद उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. पाच औद्योगिक वसाहतींमध्ये ४,००० वर छोटे मोठे उद्योग आहे. उद्योगाचा ऑक्सिजन म्हणजे वीज. शहर व परिसरात जीटीएलकडून वीजवितरण केले जाते.

मनिषा इन्फ्रास्ट्रक्चरशी नाते काय?

$
0
0
मराठवाड्यात २७०० कोटी रुपये खर्च करून बंधारे बांधण्याचे कामे झाली, मात्र यातील अनेक बंधाऱ्यांमध्ये पाणी साचत नाही. बंधाऱ्यांच्या मूळ किंमतीच्या कितीतरी पट किंमत लावण्यात आली आहे. हे कामे करण्यामध्ये मनिषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीचाही समावेश आहे.

सुट्ट्या संपल्या, शाळा गजबजणार

$
0
0
कोणी मामाच्या गावाला गेलेले तर, कोणाचा उन्हाळी शिबिरातील सहभाग. उन्हाळी सुट्ट्यांच्या दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून (१६ जून) शाळा सुरू होत आहेत.

सुख-दुःखाला धावून जाणारी देवानगरी

$
0
0
केवळ स्वतःच्या कॉलनीतील रहिवाशांच्या नव्हे तर दुसऱ्यांच्याही सुख-दुःखाला अतिशय उत्स्फूर्तपणे धावून जाणारी कॉलनी म्हणजे देवानगरी. कॉलनीतील गुणवंत विद्यार्थी किंवा खेळाडूंचा सत्कार असो, की एखादी दु:खद घटना.

शंभरावर डेंगीच्या रुग्णांवर उपचार

$
0
0
शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये शंभरपेक्षा जास्त डेंगी व डेंगीसदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील अर्धेअधिक रुग्ण हे शहरातील आहेत. मागच्या आठ दिवसांत शहरातील रुग्णांचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे.

महामंडळांवर राजकीय व्यक्ती नको

$
0
0
सिंचन घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री व तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या नावावरून गाजत असलेल्या माधवराव चितळे समितीने राज्य सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

आलिशान गाड्यांची औरंगाबादेत क्रेझ

$
0
0
मुंबई-पुण्यात असलेली आलिशान आणि अत्याधुनिक गाड्यांची क्रेझ आता औरंगाबादेतही पोहोचली आहे. मर्सिडिजचे शहर म्हणून नावारुपास आलेल्या औरंगाबाद शहरात महागड्या गाड्या खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे.

लातूरच्या तहसीलदारावर चाकूहल्ला

$
0
0
लातूरमध्ये तहसीलदार महेश शेवाळे यांच्यावर आज (सोमवारी) सकाळी चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तहसीलदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. चाकूहल्ला प्रकरणी पोलिसांनी बद्रे नावाच्या शेतक-याला ताब्यात घेतले आहे.

पैठणमध्ये आमदार, उपसभापती आमने-सामने

$
0
0
आमदार संजय वाघचौरे आणि पंचायत समिती उपसभापती बाबासाहेब पवारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. वाघचौरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा पवार यांनी दिला आहे. तर आपण अशा इशाऱ्याकडे लक्ष देत नसल्याचे आमदार वाघचौरे यांनी सांगितले.

...भेटी लागे जीवा!

$
0
0
आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाचे वेध लागतात. पाऊस असो की पेरणीचा हंगाम. सर्व कामे, अडचणी सोडून त्यांना फक्त पंढरपूर गाठायचे असते. यंदाही येथील श्री गजानन महाराज मंदिर विश्वस्त मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

१,६५७ उमेदवारांची उद्या लेखी परीक्षा

$
0
0
जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. मैदानी चाचण्यांची गुणवत्ता यादी पोलिस प्रशासनाने जाहीर केली. त्यात १, ६५७ उमेदवार पात्र झाले आहेत. उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवारी (१८ जून) घेतली जाणार आहे.

पोलिसांच्या खबऱ्यांना आता ‘अच्छे दिन’

$
0
0
पोलिसांना गुन्ह्यांची, गुन्हेगारांची बातमी देणाऱ्या खबऱ्यांना पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खबऱ्यांना रोख पारितोषिके देण्याचे आदेश पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी सोमवारी (१६ जून) दिले. त्याचबरोबर आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.

५३ साहित्य स्मृती पुरस्कार केले बंद

$
0
0
मराठी वाङ्मय पुरस्कारांमधून शासनाने तब्बल ५३ साहित्यिकांच्या नावाने सुरू असलेले पुरस्कार बंद केले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images