Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आक्षेपार्ह मजकूर टाकणारा अटकेत

$
0
0
व्हॉट्स अॅपवर भावना भडकवणारा मजकूर टाकणाऱ्या तरुणाला क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमआयडीसी वाळूज भागातून सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. पोस्ट टाकल्यानंतर हा तरूण ग्रुपमधून बाहेर पडला होता.

‘त्या’ विद्यार्थ्यांना दहावीत फर्स्ट क्लास

$
0
0
दहावीच्या निकाल लागला. त्यात ‘ते’ तिघेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांच्या मित्रांना, घरच्यांना क्षणभर आनंद झाला. पण त्यांच्या आठवणीने गळा दाटून आला. कारण ते आता या जगात नव्हते. फक्त त्यांच्या आठवणी शिल्लक होत्या.

मातीकामावर गुणवंतांना कळाला निकाल

$
0
0
दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची झुंबड इंटरनेट कॅफेवर उडालेली असताना महापालिकेच्या मुकुंदवाडी येथील शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना निकालाचा किंवा इंटरनेट कॅफेचा गंधही नव्हता. ते दोघे नेहमीप्रमाणे मातीकाम करण्यासाठी गेले होते.

...मज सावळा विठ्ठल आवडी!

$
0
0
९ ते ११ जुलै रोजी दरम्यान होणाऱ्या आषाढी वारी महोत्सवात सहभागी होण्यासाठी पैठणच्या संत एकनाथ महाराज यांची पालखी पैठणहून गुरुवारी (१९ जून) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

असे ‘अच्छे दिन’ काय कामाचे ?

$
0
0
टॉवर्ससाठीचे भूखंड आणि भूमिगत गटार योजनेचे टेंडर यामुळे काही जणांनाच ‘अच्छे दिन’ येतील, पण हे अच्छे दिन शहरासाठी चांगले असतीलच असे नाही. त्यामुळे असे ‘अच्छे दिन’ काय कामाचे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली तर नवल वाटायला नको.

LBTबाबत कोणताही निर्णय मान्य

$
0
0
स्थानिक संस्थाकर (एलबीटी) ठेवा, नाहीतर विक्रीकराशी जोडा, पण आम्हाला आमचे पैसे नियमित द्या, असा सुस्पष्ट उल्लेख करणारा अहवाल महापालिकेने महाराष्ट्र शासनाकडे शनिवारीच पाठवला आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांसह पालिका प्रशासनाचे डोळे शासनाच्या निर्णयाकडे लागले आहेत.

निकालाचा टक्का वाढला

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. औरंगाबाद विभागाची निकालाची टक्केवारी वाढली असून मागील पाच हा सर्वाधिक टक्केवारीचा निकाल ठरला आहे. विभागाचा निकाल ८७.०६ एवढा आहे.

मोदी जुलैअखेर औरंगाबादेत

$
0
0
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद शहरातील पश्चिम विभागीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रास (साई) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैअखेर भेट देणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीच्यानिमित्ताने साई क्रीडा केंद्रातील विविध सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, या भेटीमुळे केंद्राचा कायापालट होणार आहे.

दहावीच्या निकालात पालिका शाळांचा टक्का वाढला

$
0
0
दहावीच्या परीक्षेत नांदेड वाघाळा शहर पालिकेच्या जंगमवाडीच्या मराठी आणि खय्युम प्लॉटच्या उर्दू माध्यमाच्या शाळांचा निकालाचा टक्का वाढला आहे. जंगमवाडी शाळेच्या मंगेश गणेश घोडके या विद्यार्थ्याने ९३ टक्के गुण घेऊन मनपा शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.

वीज पडण्यापूर्वी दोन तास आधी समजणार

$
0
0
मराठवाड्यातील वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. राज्यात वीस ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यापैकी सोळा ठिकाणी सेन्सर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पालिकेतर्फे गुणवंतांना १७ लाखांची बक्षिसे

$
0
0
महापालिका शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सुमारे सतरा लाखांची बक्षिसे वाटप केली जाणार आहेत. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या बक्षिसांची घोषणा केली असून, पुढील आठवड्यात बक्षिस वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

वीज जोडणीसाठी लाच घेणाऱ्या अभियंत्यास अटक

$
0
0
वीज जोडणीसाठी नऊ हजारांची लाच घेणाऱ्या वीज महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याससह दोघांना बुधवारी (१८ जून) अटक करण्यात आली. विजय गणेश काथार आणि जगन्नाथ शंकर वाणी अशी आरोपीची नावे आहे.

बकाल स्टेशन आणते प्रवाशांना टेन्शन

$
0
0
फक्त बकालपणा भरलेला. अस्वच्छता आणि घाणीचे आगर, अरुंद रस्ता, प्रवाशांच्या सामानांच्या होणाऱ्या भुरट्या चोऱ्या. एकंदर काय तर सारा प्रकार चीड आणि संताप आणणारा. हे फक्त तुम्हाला मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर दिसेल.

आरोग्य खात्याची बनवाबनवी

$
0
0
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग म्हणजे बनवाबनवीचे मुख्यालय असल्याचे खुद्द सीइओ दीपक चौधरी यांच्यासमोर मंगळवारी (१७ जून) स्पष्ट झाले. स्थायी समितीच्या सभेत बायोमेट्रिक मशीनचा घोटाळा सदस्यांनी बाहेर काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावाः उत्तमसिंह पवार

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील सपाटून झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व कॉँग्रेस प्रभारींनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉँग्रेस नेते उत्तमसिंह पवार यांनी बुधवारी (१८ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू

$
0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे वसंतराव नाईक चौकात (सिडको बसस्टँड) उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू होणार आहे.

शहरातील रस्ते, वीज, पाणी, गटारीचा प्रश्न मार्गी लावला

$
0
0
शहरासाठी महत्वाचे असलेले वीज, रस्ता, पाणी आणि गटार हे प्रश्न मार्गी लागले आहेत. आता मालमत्तांच्या रिअसेसमेंटकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. मालमत्तांचे रिअसेसमेंट झाले तर महापालिकेचे उत्पन्न अनेक पटींनी वाढेल, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला.

रस्त्यावरच विद्यार्थ्यांची सिनेस्टाइल हाणामारी

$
0
0
जालना रोडवरील अग्रसेन चौकाजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी (१८ जून) सकाळी अकरा वाजता घडला. सिनेस्टाइल पद्धतीने चाकू, बेल्टचा वापर या हाणामारीत करण्यात आला. या घटनेत एकजण चाकुहल्ल्यात जखमी झाला असून, एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

कुख्यात गुंड टिपू, झाल्या साथीदारासह जेरबंद

$
0
0
अट्टल गुन्हेगार टिपू, झाल्या व त्याच्या एका साथीदाराला सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी (१८ जून) जेरबंद केले आहे. सोमवारी (१६ जून) मध्यरात्री सिडको नाईक कॉलेजजवळ टिपू व त्याच्या चार साथीदारांनी हातात तलवार घेऊन धुमाकूळ घातला होता.

पोलिस आयुक्तालयात भरतीदरम्यान दक्षता

$
0
0
पोलिस भरतीदरम्यान मुंबई येथे उमेदवारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयात पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांबाबत दक्षता बाळगण्यात येत आहे. सावलीत मैदानी स्पर्धा घेण्यात येत असून, उमेदवारांसाठी पाणी, ग्लुकोज व कँटीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images