Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परवानगी हिंदी माध्यमाची शाळा मात्र मराठीत सुरू!

0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक बनावट शाळा शहर व जिल्ह्यात सुरू आहेत. कहर म्हणजे एका शाळेने मान्यता हिंदी माध्यमाची घेतली असून, शाळा मात्र मराठी माध्यमातून चालविली जाते, असा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई यांनी उघडकीस आणला.

उत्तीर्णांपेक्षा शहरात प्रवेश क्षमता जास्त

0
0
‘दहावीचा निकाल लागला, आता अकरावीला अॅडमिशन घ्यावं कुठं,’ असा प्रश्न बहुतांश विद्यार्थी, पालकांना पडतो. शहरात दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले २० हजार ८७७ विद्यार्थी आणि अकरावी, पॉलिटेक्निक, आयटीआय यांची प्रवेश क्षमता २३ हजार ४५९ आहे.

‘लातूर पॅटर्न’चे वर्चस्व कायम

0
0
दहावीचा निकाल लागताच काही जणांनी पुरेशा माहितीच्या अभावी लातूर पॅटर्नला घरघर लागली अशी ओरड केली. मात्र, लातूर पॅटर्न आजही कायम असल्याचे गेल्या तीन वर्षातील दहावीच्या निकालाची अधिकृत आकडेवारी सिद्ध करते.

मदार स्थानिक नेटवर्कवरच

0
0
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी ४८ तास उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीतच यावेळी प्रचाराची सूत्रे सांभाळली. त्यामुळे ज्याचे स्थानिक नेटवर्क पक्के तो उमेदवार निवडून येणार आहे.

बदला घेण्यासाठी अश्लील ‘एसएमएस’

0
0
सहायक फौजदाराला व त्यांच्या पत्नी, मुलाना अश्लील एसएमएस पाठवून मानसिक त्रास देणाऱ्या महिलेला सायबर सेलने अटक केली आहे. ओळखीतून निर्माण झालेले घनिष्ठ सबंधात दुरावा आल्यामुळे बदला घेण्यासाठी तिने हे कृत्य केले.

शाळांची तपासणी होणार

0
0
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार एकूण प्रवेशापैकी २५ टक्के प्रवेश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असताना शहरातील अनेक शाळांनी यंदा त्याची अंमलबजावणी न केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या.

आता रडणार नाही, लढणार!

0
0
‘माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करीन आता रडणार नाही तर तुमच्या साथीने लढणार आहे’, अशी भावनिक साद आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी घातली. बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवान गड येथे त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे आस्थिकलश पंकजा पालवे-मुंडे यांनी गडावर आणला.

भुकेसाठी काहीही केव्हाही...

0
0
कॉलेजच्या अॅडमिशनची प्रोसेस आता पूर्ण झाल्या आहेत. बारावीनंतर कॉलेजमध्ये पहिलं पाऊलही टाकलंय. टॉकेटिव्ह राहण्यातच मुलांना मजा आहे कारण बोलताना खानपानपासून ते अगदी कॉलेजच्या विविध मंडळांवर निवडीपर्यंत चर्चा होऊ लागली आहे.

क्षयरोग केंद्र अजूनही पाण्याविनाच

0
0
आमखास मैदानाजवळील जिल्हा क्षयरोग केंद्र तब्बल तीन ते चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठ्याची जोडणी केंद्रात असली तरी पाण्याचा एकही थेंब केंद्राच्या नशिबी नसल्याचे दुर्दैव आहे.

राज्यमंत्री अमित देशमुख यांनी नाकारला सत्कार

0
0
राज्यमंत्रीपदी अमित देशमुख यांची वर्णी लागल्यानंतर त्यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला होता. त्यासाठी एक बैठकही घेतली. परंतु, त्या बैठकीला विरोधीपक्षाचे मान्यवर असे कोणी उपस्थित नव्हते ही वस्तुस्थिती होती.

अनुजाला व्हायचंय यशस्वी इंजिनीअर

0
0
आलेल्या नैसर्गिक संकटाला धैर्याने तोंड द्या, परत कोणीही आत्महत्येचा विचारही मनात आणू नका ही विनवणी करणारी आळणी (ता. उस्मानाबाद) येथील अनुजा कुलकर्णी या विद्यार्थीनीने दहावी परीक्षेत ६२ टक्के गुण मिळविले आहेत.

उपचारांअभावी हरीण तडफडले

0
0
पाण्याच्या शोधत आलेल्या हरणाच्या पिलावर कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने जखमी झाले होते. हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात गुरुवार उपचारसाठी हरणाला नेण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात उपलब्ध नसल्याने तब्बल पाच तास उशिरापर्यंत हरणाला विव्हळावे लागले.

परभणी पालिका बरखास्त करा

0
0
गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे पालिका बरखास्त करावी अशी मागणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

बीड बायपाससाठी जून अखेरपर्यंत भूसंपादन

0
0
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील बीड शहराबाहेरून काढण्यात येणाऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन जून अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात देण्यात येईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

मातीचा सुगंध दरवळला!

0
0
मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने कन्नड आणि खुलताबादवासीय सुखावले आहेत. गुरुवारी (१९ जून) खुलताबाद शहरासह तालुक्यात साडे चार वाजेच्या सुमारास सर्वत्र पावसाने हजेरी लावली. खरिपाच्या पेरण्यासाठी सज्ज झालेला शेतकरी आजच्या पावसाने सुखावला आहे.

हर्सूल तलावात तरुणाचा मृत्यू

0
0
हर्सूल तलावात गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (१९ जून) सकाळी आढळून आला. महेश विठ्ठल खेडकर असे या तरुणाचे नाव असून, तो एन ६ परिसरातील रहिवासी होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लाखो लोकांपासून तुटलेले स्टेशन

0
0
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचे नाव काढताच फक्त समस्या डोळ्यांसमोर येतात. इथे जाण्यासाठी लोकांना हाल सहन करावे लागतात. हे स्टेशन देवळाई, बाळापूर, सातारा या परिसरात वसलेल्या अशा लाखो लोकांपासून तुटलेले आहे.

इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करणार

0
0
शहरातील पथदिव्यांची अवस्था चांगली नाही, हे महापालिका आयुक्तांना मान्य आहे. शहराचे इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्याचे काम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर, नगराध्यक्षांच्या मुदतवाढीला आव्हान

0
0
महाराष्ट्रात महापौर, उपमहापौर व नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देणाऱ्या कायद्यालाच मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी हायकोर्टाने राज्य शासन, प्रधान सचिव व इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे.

कोर्टाचे आदेश मोडून वाहने सुसाट

0
0
घातपाती कारवाया आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वाहनांच्या काचांवर कोणतीही वस्तू चिकटवू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले; मात्र त्याचे सर्रास उल्लंघन करून शहरात हजारो चारचाकी वाहने धावत आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images