Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घरगुती व्यावसायिकांना निवासी वीज दर

$
0
0
दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती व्यावसायिक व शाळा, वाचनालयांसारख्या सार्वजनिक उपक्रमांना निवासी दराने आकारणी करावी, असा निर्णय महाराष्ट्र वीज निमायक आयोगाने दिला आहे.

खून प्रकरणातूनयुवकाला मारहाण

$
0
0
खून प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा आरोप करीत, चौघा जणांनी एका युवकाला हॉकी स्टीकने मारहाण केली.

'पासपोर्ट कार्यालय शहरामध्ये सुरू करा'

$
0
0
औरंगाबाद शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पासपोर्ट कार्यालय अस्तित्वात होते. मात्र हे पासपोर्ट कार्यालय औरंगाबाद शहरात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार चोरणारी टोळी जेरबंद

$
0
0
आंतरराज्य चारचाकी वाहनचोरांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीकडून चोरीची दोन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहे.

३८ जणांची 'गाइडशीप' रद्द

$
0
0
निकष डावलत मिळविलेली पीएचडी गाइडशीप ३८ जणांना महागात पडली आहे. अशा अपात्र मार्गदर्शकांची गाइडशीप रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असून, तशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

मनसे पदाधिकारी समाजवादीच्या वाटेवर

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन कार्यकारिणी निवडीवर नाराज असलेले प्रमुख पदाधिकारी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष मुंबईत बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

हिमायतनगर शहराला पुराचा वेढा

$
0
0
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर परिसरात मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे हिमायतनगर शहराला पुराने वेढा घातला आहे.

हदगावातील लघुसिंचन प्रकल्प फुटला

$
0
0
गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या संततधारेमुळे हदगाव तालुक्यातील डोंगरगाव लघुसिंचन प्रकल्प फुटल्याने हदगाव शहरात पुराचे पाणी ‌शिरले आहे.

उस्मानाबादला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा

$
0
0
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. पण गेल्या वर्षीपासून दुष्काळाने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यावर मात्र अजूनही वरूणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही.

बेकायदा गर्भपात : बोगस डॉक्टराविरूद्ध गुन्हा

$
0
0
बेकायदा गर्भपात करणा-या व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणा-या नांदेड येथील एका महिलेला पोलिस आणि वैद्यकीय पथकाने धाड टाकून रंगेहाथ पकडले. या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पगारासाठी आत्मदहनाचा इशारा

$
0
0
पैठण नगर पालिकेच्या कर्मचा-यांचे मागच्या पाच महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचा-यांनी थकित वेतन त्वरित न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

बनावट जीआरप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0
गृह विभागाचा बनावट जीआर तयार करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.

‘अजित सीड्स’नी घेतले पिवळ्या वाघांना दत्तक

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात असलेल्या दोन पिवळ्या वाघांना अजित सीड्स या कंपनीने दत्तक घेतले आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी ही माहिती दिली आहे.

मानधनासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे चालविण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी ‌मानधनासाठी मंगळवारी मुख्य प्रशासकीय इमारतीत ठिय्या आंदोलन व कुलसचिवांना घेराव घातला.

मोकाट जनावरांकडे पालिकेचा कानाडोळा

$
0
0
शहरातील मुख्य रस्त्यांवर ठाण मांडणा-या मोकाट जनावरांमुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना नागमोडी वळणे घेत चालावे लागते.

अंतिम वर्षासाठी कॅरिऑन द्या...

$
0
0
इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षासाठी कॅरिऑन द्यावा, अशी मागणी करून इंजिनीअरिंगचे विद्यार्थी विद्यापीठात धाव घेत आहेत. विद्यापीठाने सुधारित अभ्यासक्रम लागू करताना या विद्यार्थ्यांना मागील वर्षी कॅरिऑन दिला होता.

अजंठा फार्माच्या सेझवर सत्याग्रह

$
0
0
जेष्ठ समाजसेवक मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी अजंठा फार्माच्या सेझसाठी २००८ मध्ये घेण्यात आलेल्या जमिनीपैकी ३५ हेक्टर जमीन मंगळवारी नांगरली.

पत्नीसह ४ वर्षीय बालिकेचा खून

$
0
0
घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये न आणल्याने देगलूर येथील एका नराधमाने पत्नी आणि चार वर्षीय बालिकेचा खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

अखेर बिबट्या जेरबंद

$
0
0
गंगापूर शिवारातील काही घटनांची दखल घेत वन विभागाने गंगापूर शिवारात पिंजरे लावले होते. यामधील एका पिंजऱ्यात चिकन बिबटयाच्या शिकारीसाठी लावण्यात आले होते.

मृतसाठा चार दिवसांत भरणार

$
0
0
दारणा, भावली प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गोदावरीत सोडण्यात आलेले पाणी नाथसागरापर्यंत पोहोचण्यास तीन दिवसांपूर्वी सुरुवात झाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images