Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांना आर्द्रा नक्षत्राची आशा

$
0
0
पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे गेले. रविवारपासून लागलेल्या आर्द्रा नक्षत्रात पाऊस यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मुग आणि उडीदाच्या लागवडीवर होईल.

मका उत्पादनात औरंगाबाद ‘टॉप’

$
0
0
अनुकूल हवामान, लागवडीतील प्रयोगशीलता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे औरंगाबाद जिल्हा राज्यात मका उत्पादनात ‘नंबर वन’ ठरला आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात ७ लाख ३७ हजार ४४१ टन उत्पादन झाले. फक्त तीन तालुक्यांच्या उत्पादनावर जिल्ह्याने हा विक्रम केला आहे.

दहा रुपयांत वॉटर बॅग

$
0
0
औरंगपुऱ्यातल्या दुकानांत जा. अथवा शहरात कुठेही. कमीत कमी चाळीस रुपयांपेक्षा कमी दरात वॉटर बॅग मिळणे शक्य नाही. पण रविवारच्या बाजारात अवघ्या दहा रुपयांत वॉटर बॅग मिळते. त्यामुळे इथल्या वॉटर बॅगवर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत.

‘क्रॉसपॅथी’चा डोस ‘आयएमए’च्या वर्मी

$
0
0
आयुर्वेदिक-युनानीसह होमियोपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने कायद्यानेच मान्यता दिली आहे. मात्र ‘क्रॉसपॅथी’चा हा डोस अॅलोपॅथीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’च्या (आयएमए) वर्मी बसला आहे.

क्रीडा अधिकाऱ्यांनो संपत्ती जाहीर करा

$
0
0
क्रीडा विभागात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संपत्ती जाहीर करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. या संदर्भात पुण्यात सोमवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेडगेवार रुग्णालयाला दंड

$
0
0
रुग्णाकडून जास्तीचे शुल्क घेतल्यामुळे जिल्हा ग्राहक मंचाने डॉ. हेडगेवार रुग्णालयाला ठोठावलेला दोन हजार रुपयांचा दंड राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला. तसेच अतिरिक्त शुल्क व तक्रारीचा खर्च मिळून दीड हजार रुपये वापस करण्याचा मंचाचा आदेश राज्य मंचानेही कायम ठेवला आहे.

दहिफळेंना ११ लाखांचा दंड

$
0
0
डोळ्याखालील हाड फॅक्चर झाल्याने चेहरा व्यवस्थित करण्यासाठी कंबरेच हाड बसविण्याची शस्त्रक्रिया डॉ. विजय व डॉ. उज्ज्वला दहिफळे यांच्या निष्काळजीपणामुळे अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत जिल्हा ग्राहक मंचाने दोघांना सुमारे ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मैदानी स्पर्धेमध्ये उभे केले मित्राला

$
0
0
पोलिस भरतीमध्ये उमेदवाराने स्वतःच्या जागी मैदानी स्पर्धेमध्ये मित्राचा वापर केल्याचा प्रकार रविवारी (२२ जून) सकाळी उघडकीला आला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

MBBSच्या जागा वाढणार ?

$
0
0
गेल्या वर्षी राज्यातील आठ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये वाढलेल्या एमबीबीएसच्या ४०० जागा यंदा सरकारची अनास्था आणि कॉलेजांचे दुर्लक्ष यामुळे कमी झाल्या आहेत. या जागा कायम राहणार काय याकडे आता राज्यभरातील पालकांचे लक्ष सरकारकडे लागले आहे.

पोलिसांनी कट हाणून पाडला

$
0
0
सिनेस्टाइल थरार, पाठलाग, पैसे मिळेपर्यंत दमछाक. मोठ्या खुबीने सारी संकटे पेलत कधी गोड बोलून तर कधी पोलिसी खाक्या दाखवत ५२ लाखांची बॅग अखेर परत मिळवली आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तीन शाळांची ‘दुकानदारी’ उघड

$
0
0
शासनाकडून कोणतीही परवानगी न घेता, बिनदिक्कतपणे मोठमोठ्या जाहिराती करून प्रवेश देणाऱ्या तीन शाळांविरोधात रविवारी (२२ जून) शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले.

गुन्हेगाराने पळवली तरुणाची दुचाकी

$
0
0
अट्टल गुन्हेगाराने तरुणाची दुचाकी पळवण्याचा प्रकार शनिवारी (२१ जून) चिकलठाणा शिवारात घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायकोर्टाचे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश

$
0
0
महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या सहा रस्त्यांच्या कामांच्या स्थितीसंदर्भात पुढील सुनावणीच्या वेळी शपथत्र सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी दिले. पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार आहे.

शाळेच्या परिसरात चिमुकल्यांचा जीव मुठीत

$
0
0
खोकडपुरा, चौराहा, शहागंज, खाराकुंवा, औरंगपुरा हा शहराचा जुना भाग. कायम वर्दळ व वाहनांची गर्दी असलेल्या या भागामध्ये जुन्या अनेक शाळा आहेत. या शाळांजवळ धोकादायक व बेशीस्त वाहतुकीमुळे विद्यार्थयांना जीव मुठीत धरुन ज्ञानदानासाठी यावे लागत असल्याचे चित्र आहे.

संबंधाला भाग पाडल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

$
0
0
विवाहितेला बळजबरीने अनैतिक सबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या आरोपी अनिल पसरटे याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायधीश आर. आर. काकाणी यांनी नामंजूर केला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचे आई, वडील व अन्य आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.

पोलिस भरती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर

$
0
0
जिल्हा ग्रामीण पोलिस विभागासाठी शिपाईपदाच्या २१५ जागांसाठी भरती प्रक्रिया सहा जूनपासून असून, सोमवारी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या २ हजार ८०० उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. परीक्षाचा निकाल बुधवारी (२३ जून) जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तब्बल ३२ तासांनंतर शेंद्र्यातील आग आटोक्यात

$
0
0
तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर शेंद्रा एमआयडीसीतील ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीतील भुशाला लागलेली आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

पोलिसांच्या अंगावर गाडी घालणारा आरोपी सापडेना

$
0
0
पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी लहू गटकाळला अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना पाच दिवसानंतरही यश आले नाही. वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बुधवारी (२३ जून) सायंकाळी पोलिस कर्मचारी कारवाई करत असतानाच हा प्रकार घडला होता.

रस्त्यांंविषयी शपथपत्र सादर करा

$
0
0
महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या सहा रस्त्यांच्या कामांच्या स्थितीसंदर्भात पुढील सुनावणीच्या वेळी शपथत्र सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी दिले.

अनधिकृत नळांविरुद्ध आंदोलनाचा इशारा

$
0
0
शिवाजीनगर भागातील १२ योजनेतील सीएल ३, सील ४ या घराच्या साठी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतून शेजारीच असलेल्या रेणुकानगरला अनधिकृतपणे नळकनेक्शन्स देण्यात आले आहेत. हे नळ कनेक्शन्स तोडा अन्यता आंदोलन करू, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images