Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अवैध सावकारीचा फास आवळला

$
0
0
सावकरी कर्जाच्या बोजाखाली दबल्याने शेतकरी, नागरिक हे कर्ज फेडताना मेटाकुटीला येतात. त्यामुळेच अवैध सावकरीला चाप लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आलेले आहेत, परंतु असे असतानाही जिल्ह्यात अवैध सावकरीचे पिकही मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे समोर आले आहे.

महापालिकांनी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत

$
0
0
‘महापालिकांनी उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत निर्माण करावेत, अस्थापनेवरचा खर्च कमी करावा,’ अशा सूचना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे एलबीटी राहणार की जाणार, यावरून निर्माण झालेला वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी या सूचना दिल्या आहेत.

रेल्वे स्टेशनजवळच्या रस्त्याला १२ फुटांची कात्री

$
0
0
भूसंपादनात महापालिका अपयशी ठरल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या जवळच्या रस्त्याची रुंदी तब्बल बारा फुटाने कमी होणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या कायमच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महावितरण कार्यालयात ‘ठिय्या’

$
0
0
शहर आणि ग्रामीण भागात भारनियमन करू नका, या मागणीसाटी जीटीएल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी सोमवारी (२३ जून) महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

$
0
0
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (२३ जून) शिवसंग्राम संघटनेने निदर्शने केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये २१ जूनपर्यंत मराठा आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

लुटमार करताना आरोपीचा पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल

$
0
0
५२ लाख रुपयांच्या लुटीच्या वेळी घटनास्थळी पकडला गेलेल्या आरकेशने पोलिस नियत्रंण कक्षाला कॉल लावल्याचे त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. पकडला गेल्याचे लक्षात आल्यामुळे हे प्रकरण आपल्यावर शेकू नये यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आर्केशने हा कॉल केला होता.

शुभेच्छांत झळकला अन् बेडीत अडकला

$
0
0
चोर कुठे आणि कसे सापडतील याचा नेम नाही. आता हेच बघा ना, पोलिसांना दहावीच्या गुणवंताना दिलेल्या शुभेच्छा पोस्टरवर एक फोटो संशयास्पद वाटला. त्यांनी त्याचा छडा लावला असता तो चक्क दुचाकी चोर निघाला. क्रांतीचौक पोलिसांनी या चोराला अहमदपूर येथून जेरबंद करत औरंगाबादला आणले.

'हेल्पिंग हँड' तुमच्यासाठी!

$
0
0
तुम्ही फक्त आवाज द्या. मदतीसाठी त्यांचे हात तयार आहेत. शिक्षण असो की आरोग्य, समस्या कुठलिही असो. औरंगाबाद टाइम्स कॉलनी, रशिदपुरा आणि हीनानगर, गणेश कॉलनी मधले युवक तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात.

राज्यात ५०० वाढीव जागा ३० दिवसांत भरणार

$
0
0
‘एमबीबीएस’च्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या ५०० वाढीव जागा येत्या ३० दिवसांत भरणार. एकही जागा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचे नुकसान अजिबात होऊ देणार नाही, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी येथे दिले. हाच वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव जागांचा विषय ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वेळोवेळी मांडला आहे.

इंजिनीअरिंगच्या परीक्षेत विद्यापीठ पुन्हा ‘गचकले’

$
0
0
इंजिनीअरिंगच्या परीक्षेत विद्यापीठ पुन्हा एकदा गचकले आहे. आपल्या गोंधळाच्या परंपरेला जागत आणि तिचे इमान राखत, सोमवारी (२३ जून) परीक्षा विभागाने आपला कार्यभाग सिद्ध केला.

स्टेशनवर बाटलीबंद पाण्याचा बाजार जोरात!

$
0
0
रेल्वे स्टेशनवर नियमित आणि साप्ताहिक रेल्वेची संख्या वाढल्याने प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर बाटलीबंद पाणी विकण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज रेल्वे स्टेशनवर सुमारे अडीच हजार बाटल्यांची विक्री करण्यात येते. म‌हिन्याला सुमारे सव्वाअकरा लाख रुपयांची उलाढाल त्यातून होत आहे.

कार्यकर्त्यांनो फुकटात करा रेल्वे प्रवास

$
0
0
राजकीय नेते, मंत्री कधी काय बोलतील याचा नेम नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद भूषविणाऱ्या जितेंद्र आव्हाडही आता त्या शर्यतीत दाखल झालेत. त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना चक्क फुकटात रेल्वे प्रवास करण्याचा सल्ला दिला.

मतमोजणीमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल

$
0
0
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (२४ जूून) चिकलठाणा एमआयडीसी भागात होणार आहे. दोन दिवस ही मतमोजणी चालण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

‘पदवीधर’ आमदार आज ठरणार

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद पद‌वीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला मंगळवारी (२४ जून) सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीची रंगीत तालीम सोमवारी (२३ जून) करण्यात आली.

विभागीय आयुक्त करणार ‘गवत खाल्या’ची शहानिशा

$
0
0
विभागीय क्रीडा संकुलातील लॉन जतन करण्यात झालेल्या गैरप्रकाराची विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष भेट देऊन ते या प्रकारणाची शहानिशा करणार आहेत.

शाळांनी केली पोलिसांची ‘शाळा’

$
0
0
राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता, अनधिकृतपणे प्रवेश देणाऱ्या तीन शाळांवर गुन्हे दाखल करून २४ तास उलटल्यानंतर पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. सोमवारी (२३ जून) पोलिसांनी केवळ शिक्षण विभागातील अधिकाऱ्याचेच जवाब नोदंविता आले.

सुशीला काबरांचा सत्कार

$
0
0
‘मंजिल आपकी राह हम है, आपके सपनो को साकार करेंगे हम,’ अशा शब्दांत अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुशीला काबरा यांचा सत्कार करण्यात आला. औरंगाबाद ‌माहेश्वरी महिला संघटनेने सोमवारी (२३ जून) काबरा यांच्या स्वागताकरता आयएमए हॉल आर्कषक रांगोळ्यांनी सजवले होते.

वॉचमनला बांधून दुकाने फोडली

$
0
0
पंढरपूर येथील तिरंगा चौकातील उद्योग आयकॉन कॉम्पलेक्समध्ये सात ते आठ जणांनी दोघा वॉचमनला जबर मारहाण करून बांधून टाकले व पाच दुकानांची शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ‘मणप्पुरम गोल्ड लोन’ च्या कार्यालयातील तिजोरी फोडता न आल्याने तब्बल एक कोटी रुपयांचे तारण ठेवलेले सोने बचावले. याच परिसरातील आणखी दोन दुकांनाचे शटरही फोडण्यात आले.

कमी पावसातही कापूस तग धरणार

$
0
0
मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या होण्याची शक्यता आहे. कमी पर्जन्यमानामुळे मूग व उडीद ही मुख्य पिके हातची गेली आहेत.

‘त्या’ अल्पवयीन जोडप्याला अखेर पोलिसांनी पकडले

$
0
0
म्हैसमाळ येथून चार महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पैठण तालुक्यातील बिडकीन जवळील मावसगाव येथील एका तलावाजवळ पोलिसांनी सोमवारी (२३ जून) पकडले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images