Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भराडीची शेतमजूर रमा बोर्डात गुणवंत

$
0
0
राहायला छप्पर, थकलेले वडील, आजारी आई, बहिणींच्या लग्नाचे कर्ज व मजुरी करून जगवणाऱ्या भावावर कुटुंबाची भिस्त या परिस्थितीत अर्धवेळ शेतमजुरी करणाऱ्या रमा भिवसन शेळके या विद्यार्थिनीने बारावीच्या हिंदी व मराठी विषयात बोर्डात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.

अर्धवट पूल सोडून गुत्तेदार गायब

$
0
0
निष्क्रियता, लाल फितीचा कारभार आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा कळस म्हणजे गिरिजा नदीवरील पुलाचे बांधकाम. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. गुत्तेदार गायब आहे.

वाढीव खर्चाच्या निर्णयानंतरच पाणीपुरवठ्याचे हस्तांतरण

$
0
0
‘समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी ७९२ कोटी रुपयांपेक्षा एक रुपयाही जास्तीचा खर्च देणार नाही. शहरातील नागरिकांवर बोझा पडावा, अशा पद्धतीने कोणताही निर्णय घेणार नाही, त्यामुळे समांतर जलवाहिनीसाठीच्या वाढीव खर्चाचे काय ते सांगा, त्यानंतरच पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचे ठरवू,’ अशा शब्दांत महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलीटी कंपनीला सुनावले.

‘डीन’ची जाहीर खरडपट्टी

$
0
0
माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याही कितीतरी पुढे जाऊन नवे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आश्वासनांचा मुसळधार पाऊस पाडत विद्यार्थ्यांच्या भरमसाठ तक्रारींवरून दोन्ही अधिष्ठातांची जाहीर खरडपट्टीच काढली.

पार्किंग वसुलीचा घोळ

$
0
0
मध्यवर्ती बस स्थानकामध्ये (सीबीएस) ठेकेदाराकडून परवानगीपेक्षा जास्त जागेवर पार्किंगचे शुल्क वसूल होत असताना दुर्लक्ष केल्याप्रकरणी एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनच २८ लाख रुपयांची वसुली करण्याचा अहवाल एसटी सुरक्षा व दक्षता पथकाने पाठविला आहे.

मराठवाडा दुष्काळाच्या दावणीला

$
0
0
सकाळी आभाळात ढग दाटून येतात. आज पाऊस येणार, असे मन सांगत राहते. अन् बघता-बघता सुसाट वारा हे स्वप्न क्षणार्धात उधळून लावतो. गेल्या काही दिवसांपासून असेच सुरू आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनच्या वाटेत, दक्षिण भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्याने खोडा घातला आहे.

कला क्षेत्राला नवसंजीवनी

$
0
0
मराठवाड्यातील कलावंतांचे प्रश्न मार्गी लावणे आणि सांस्कृतिक अनुशेष भरुन काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभागीय कार्यालय जुलै महिन्यात औरंगाबाद शहरात सुरू होणार आहे.

भाजीपाल्याचे भाव कडाडले

$
0
0
पाणी टंचाईमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली असून, बाजारपेठेतील आवकही मंदावली आहे. परिणामी, भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. फुलकोबी, वांगे, गवार या भाज्या ५० ते ६० रुपये किलो, तर दोडके, कारले आणि शेवगा शेंगासाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत आहे.

‘शोले स्टाइल’ आंदोलन

$
0
0
बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांची नाव यादीतून वगळली गेली होती. त्यामुळे पात्र लाभधारकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ बीड येथील प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जावून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदार यांनी पात्र लाभधारकांना तत्काळ मंजुरी दिल्याचे सांगितले.

रिक्षाचालक आज संपावर

$
0
0
शहरवासियांनो सावधान. सकाळी मुलांना शाळेत सोडायचे असेल, ड्युटीवर जायचे असेल, स्टॅँडवर जायचे असेल तर उद्या (२५ जून) घरापर्यंत रिक्षा येणार नाही. रिक्षा चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे बुधवारचा दिवस तुमच्यांसाठी हाल अन् अपेष्टांचा असणार आहे.

बाल गुन्हेगारी चिंताजनक वळणावर

$
0
0
मयूरपार्क भागात एटीएम फोडताना एका १६ वर्षाच्या बालकाला सिडको पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. त्यापुर्वी एका १६ वर्षाच्या बालकाला ४० वर्षाच्या महिलेला अश्लील फोन करुन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटना उदाहरणादाखल आहेत, मात्र गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन बालकांचे प्रमाण हा चिंताजनक विषय ठरत चालला आहे.

अल्पवयीन मुलावर जुन्या वादातून हल्ला

$
0
0
जुन्या वादातून १५ वर्षांच्या मुलावर चाकुहल्ला करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (२३ जून) दुपारी बेगमपुरा भागात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई, भाऊ रागावल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
घरात बकऱ्या शिरल्यामुळे आई व भाऊ रागावल्यामुळे नाराज झालेल्या अकरावीतील एका तरुणीने ‌गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळील जय मल्हारनगर येथे मंगळवारी (२४ जून) घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मदानीचौक भागातून चार संशयित ताब्यात

$
0
0
गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या टोळीला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (२३ जून) पहाटे अटक केली. सहायक फौजदार रमेश पोळ व त्यांचे सहकारी जिन्सी हद्दीत पहाटे पावणेचार वाजता पेट्रोलिंग करीत होते.

‘एमटीडीसी’समोर जलवाहिनी फुटली

$
0
0
रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एमटीडीसी कार्यालयाच्या समोर मंगळवारी (२४ जून) पहाटे जलवाहिनी फुटली. यामुळे रस्त्याच्या लगत असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. प्रामुख्याने तळ मजल्यावर असलेल्या दुकानांचे या घटनेमुळे मोठे नुकसान झाले.

ठाकरेनगरात घरफोडीत सात लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
एन २, ठाकरेनगर भागात इंजिनीयरचे घर फोडून सात लाखांचा ऐवज पळवल्याची घटना सोमवारी (२३ जून) मध्यरात्री घडली. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी दाखल असलेल्या आईच्या उपचारासाठी जमा केलेली अडीच लाखांची रक्कम; तसेच लग्नासाठी घेतलेल्या साडेचार लाख रुपयाच्या दागिन्यांचा त्यात समावेश आहे.

कमी पावसामुळे टंचाईची चिंता

$
0
0
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कृषी विभागाने पीक नियोजन हाती घेतले आहे. कमी पर्जन्यमानातील पिके आणि व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील पावसाचे प्रमाण वेगळे असल्यामुळे टंचाईच्या काळात तालुकानिहाय आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत कृषी विभागाने विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.

बस- रिक्षाच्या अपघातात चारजण जखमी

$
0
0
बस व रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. आड नदीवरील पुलावर मंगळवारी (२४ जून) दुपारी बारा वाजता ही घटना घडली. या अपघातानंतर जळगाव रस्त्यावरील वाहतूक तासभर थांबली होती.

लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिस अधिकारी निलंबित

$
0
0
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासात कुचराई करणे, सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव थोरातांना भोवले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी मंगळवारी (२४ जून) दिले.

तीन वर्षांच्या बालकाचा टीव्ही अंगावर पडून मृत्यू

$
0
0
वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगर भागातील एक तीन वर्षाचा मुलगा घरातील टीव्ही अंगावर पडून मरण पावला. ही घटना मंगळवारी (२४ जून) सकाळी अकरा वाजता घडली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images