Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धूळ पेरण्या, ठिबकवरील पिके धोक्यात

$
0
0
जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने धुळपेरणी वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. जेमतेम पावसावर व ठिबक सिंचनावर लागवड केलेला कापूस ही धोक्यात आहे.

मान्सूनची झळ; प्रकल्पांनी गाठला तळ

$
0
0
पुन्हा एकदा दुष्काळ. पुन्हा एकदा पाणी नाही. पुन्हा एकदा वर्षभर वणवण भटकंती. येणारा हा दुष्काळ दुष्काळानंतरचा आणि गारप‌िटीनंतरचा असेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यात पाऊस लांबल्याने मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

शिवसेनेच्या मेळाव्यात इच्छुकांत शाब्दिक चकमक

$
0
0
शिवसेनेच्या ‘माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र’ मोहिमेला पैठण येथे झालेल्या मेळाव्यात विधानसभेसाठी इच्छुकांमध्ये वादाने सलामी मिळाली आहे. इच्छुकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला.

जिल्हा जात पडताळणी समित्यांना स्थगिती

$
0
0
जिल्हास्तरीय जात पडताळणी समित्यांना त्यांचे काम सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची स्थगिती दिली आहे. त्यामुळे याविरोधात सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने सुरू केलेले आंदोलन बुधवारी (२५ जून) मागे घेतले.

सावधान, आता ब्रेक बसणार

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेत निधीचा ‘विनियोग’ लावण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. किती पैसे येणार? त्यातून काय प्रस्ताव करायचे? याविषयी अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये बैठका होत आहेत.

३५०० फार्मासिस्टचे रजा आंदोलन

$
0
0
राज्यातील १८०० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६३ ग्रामीण रुग्णालये, ८० उपजिल्हा, २७ जिल्हा, १० स्त्री रुग्णालयातील २८००, तर ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’अंतर्गत (एनआरएचएम) कार्यरत ७००, असे ३५०० औषधनिर्माण अधिकाऱ्यांनी (फार्मासिस्ट) बुधवारी (२५ जून) विविध मागण्यांसाठी सामुदायिक रजा आंदोलन केले.

शपथपत्रात सिडकोची माहिती त्रोटक

$
0
0
सिडकोतील सोयी-सुविधांबाबत महापालिकेने सादर केलेले शपथपत्र संदिग्ध व त्रोटक असून, आवश्यक तो तपशील त्यात देण्यात आलेला नाही. तसेच सध्याच्या परिस्थितीचे योग्य चित्रणही त्यात दिसत नाही, असे मत व्यक्त करीत चार आठवड्यांत सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

आयुक्तांच्या पत्रावर व्यापाऱ्यांची नाराजी

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिलेल्या पत्राच्या संदर्भात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी बुधवारी (२५ जून) महापौर कला ओझा यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘अच्छे दिन कहा गए, मोदी सहाब भुल गए’

$
0
0
‘मोदी सरकार हाय-हाय,’ ‘अच्छे दिन कहा गए, मोदी सहाब भुल गए’ अशा घोषणांनी बुधवारी (२५ जून) रेल्वे स्टेशन परिसर गजबजला. रेल्वेने जाहीर केलेल्या १४.२ टक्क्याच्या दरवाढीविरोधात कॉँग्रेसने रेल्वे रोको आंदोलन केले. आंदोलकांनी दरवाढ परत घेण्याची मागणी केली.

छोट्या कॉलेजांच्या निधीसाठी प्रयत्न

$
0
0
सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या महाविद्यालयानांच यूजीसी अनुदान देते. हे योग्य नसून छोट्या कॉलेजांनाही बळकटी मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सरकारकडून निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.

पाण्यासाठी प्राधिकरणात धाव

$
0
0
वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी प्रामुख्याने बांधण्यात येत असलेल्या नांदूर मधमेश्वर प्रकल्पाअंतर्गत मुकणे धरणातील ४२ टक्के पाणी नाशिक व नगर शहरासाठी राखीव ठेवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र जलनियमन प्राधिकरणाकडे नुकतीच दाखल करणारी आली आहे.

पोलिस ठरले चोरावर मोर

$
0
0
कुठल्याही चोरास आपण खूप बुद्धीमान आहोत, अन् पोलिस आपल्याला काहीच करू शकत नाहीत, असा विश्वास असतो. पण पोलिसांनी अशी काही चाल खेळली, की चोराला कळले देखील नाही, दरोड्याच्या गुन्ह्यात हातात बेड्या पडल्या कशा? त्याने रात्री दरोडा टाकला.

‘रिक्षा बंद’मुळे नागरिक वेठीस

$
0
0
न्यायलयाच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई सुरू केली. त्याच्या विरोधात रिक्षा संघटना; तसेच पॅथर्स रिपब्लिकन पक्षाने केलेल्या ‘रिक्षा बंद’च्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांची बुधवारी (२५ जून) गैरसोय झाली.

एसटीला दिवसात ५ लाखांचे उत्पन्न

$
0
0
रिक्षा बंद आंदोलनामुळे प्रवासी, नागरिकांसाठी एसटी महामंडळाने बुधवारी शहरातील १५ मार्गांवर ७०जादा गाड्या सोडल्या. त्यातून एसटीला सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.

‘भूमिगत’साठी १६४ कोटी आले

$
0
0
शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी शासनाकडून महापालिकेला १६४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. महापालिकेने ही रक्कम बँकेत ठेवली आहे. आता ही योजना सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्याची तयारी केली जात आहे.

टंचाई आराखड्यासाठी लगबग

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळ; तसेच गारपीटीसारख्या संकटाला तोंड देत आहे. यंदाही पावसाची उशिरा हजेरी लावली असून, आगामी काळात कमी पाऊस पडला तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

वाढीव जागांसाठी सरकार थंड

$
0
0
राज्याच्या वाट्याला गेल्या वर्षी आलेल्या एमबीबीएसच्या वाढीव ५०० जागा यंदाही मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने अजूनही हालचाली सुरू केलेल्या नाहीत. बुधवारी मेडिकल प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर याचे गांभिर्य सरकार आणि पालकांना दिसून येणार आहे.

फसवणूकप्रकरणी ३३ वर्षे कारावास!

$
0
0
व्याजासह कार देण्याचे आमीष दाखवून तीन ते पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून ‘युनिक ग्रुप’चा संचालक प्रेमचंद कांबळे याने शहरातील १३५ व्यक्तींची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केली.

साहित्य संमेलन उस्मानाबादला?

$
0
0
८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादला म‌िळण्याचे संकेत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाले असून, याबाबतची अधिकृत घोषणा मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.

मेडिकल टूरिझमचा गाईड

$
0
0
औरंगाबाद पर्यटन राजधानी म्हणून किती विकसीत होणार?, काय सुविधा मिळणार?. कसं शहर आहे?, रस्ते नाही पाणी नाही, याचंचं रडगाडं गाण्यापेक्षा आपण त्या शहरातील चांगल्या गोष्टींचं मार्केटिंग केलं तर किती फरक पडेल याचं उदाहरण औरंगाबादच्याच शहरातील एका नवयुवकानं दाखवून दिलं आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images