Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नांदेडमध्ये नगरसेवकांत राडा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत एमआयएमपक्ष मॅनेज झाले असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी नांदेड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्या करणावरून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी आपसात धक्काबुक्की केली. नगरसेवकांतील या राड्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

अकरा वर्षे उलटूनही रक्कम मिळेना

$
0
0
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अकरा वर्षापूर्वी आदेश देऊनही ऑटोरिक्षा घेण्यासाठी भरलेले ७२ हजार रुपये ग्राहकाला मिळत नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने या रकमेच्या वसुलीसाठी लोकशाही दिनात धाव घेतली आहे.

तरुणांनी ओढली नाथवंशजांची गाडी

$
0
0
संत एकनाथाच्या पालखीसोबतच्या नाथवंशजाना बैलगाडीत बसवून तीन किलोमीटर ओढून डोंगराच्या पलीकडे नेण्याची परंपरा पाटोदा तालुक्यातील हटकरवाडी येथील तरुणांनी यंदाही पार पाडली.

घृष्णेश्वर साखर कारखाना विक्रीला

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी गदाना येथील घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना विक्रीसाठी काढला आहे. बँकेने दिवाळखोर व थकीत कर्जदार असेले राज्यातील सहकारी साखर कारखाने व सुतगिरण्यांच्या विक्रीची जाहिरात १६ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

खेट्या मारूनही पाणी मिळेना

$
0
0
देवडीबाजार- रोहिला गल्ली भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा अर्ज देऊन केली. परंतु त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.

सहाव्या मजल्यावरून अप-डाउन

$
0
0
सामाजिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे किल्लेअर्क येथील समाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील शेकडो विद्यार्थ्यांना साडेतीन वर्षापासून दररोज सहा मजले चढावे- उतरावे लागत आहेत. सहा मजली वसतीगृहात लिफ्ट बसविली नसल्याने पायऱ्या चढून उतरून विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे.

शेतकऱ्यांचा तहसीलदारांना ‘घेराओ’

$
0
0
औरंगाबाद तालुक्यातील ४२ गारपीटग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना अद्यापही शासनाने जाहीर केलेली मदत मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.२६) औरंगाबाद तहसीलदारांना ‘घेराओ’ घातला व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

खाद्यतेल पाच रुपयांनी महागले

$
0
0
रेल्वे भाडेवाढीपाठोपाठ सर्वसामान्यांना आता खाद्य तेलाच्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. करडई व शेगदाणा तेल प्रतिलिटर पाच व सोयाबीन तेलाचे भाव दोन रुपयांने वाढले आहेत.

गुणवंतांना १७ लाख वाटता, ‘आमचं काय?’

$
0
0
‘गुणवंत विद्यार्थ्यांना १७ लाख रुपये वाटता आणि आमचं काय,’ असा चमत्कारिक आणि संतापजनक प्रश्न विचारून महापालिकेतील शिवसेनेच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांना अक्षरशः भांडावून सोडले. त्या पदाधिकाऱ्याची समजूत घालता घालता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले.

‘कचऱ्या’च्या विजेचा पथदिव्यांना प्रकाश

$
0
0
कचऱ्यापासून निर्मिती केलेल्या विजेचा पथदिव्यांसाठी वापर करण्याचा उपक्रम सिडको एन-१ वॉर्डात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी (२६ जून) नागरिकांची बैठक झाली. बैठकीच्या आयोजनासाठी या वॉर्डाचे नगरसेवक राजू शिंदे यांनी पुढाकार घेतला.

अचानक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाहीच

$
0
0
नियम मोडून रिक्षा चालविणाऱ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात रिक्षाचालकांनी बुधवारी (२५ जून) आंदोलन केले. त्यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पोलिसांनी मात्र या आंदोलकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

पाणी कपात नाही, चिंता करू नका

$
0
0
‘अजून चार महिने पाऊस पडला नाही, तरी काळजी करू नका. पाणीकपात करण्याची कोणतीही योजना नाही,’ असे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शहरवासीयांना दिलासा दिला आहे.

तलाठी अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात

$
0
0
सात-बाराचा उतारा देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गंगापूर तालुक्यातील एका तलाठ्यास अँटी करप्शन ब्युरोने गुरुवारी (२६ जून) पकडले. याप्रकरणी गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चला मतदार नोंदणीला

$
0
0
विधानसभा; तसेच महापालिका निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नावनोंदणी करून घ्यावी, यासाठी प्रशासनातर्फे २८ (शनिवार) व २९ (रविवार) रोजी सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नावनोंदणी, दुरुस्तीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

कौतुक सोहळ्यात महापौरांचा रुसवा

$
0
0
दहावीत यश मिळविलेल्या पालिका शाळांतील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यातही पदाधिकाऱ्यांनी रुसव्याफुगव्यांचे दर्शन घडवले. सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता विद्यार्थ्यांना १७ लाखांची रोख बक्षिसे कशी वाटता, असा मुद्दा उपस्थित करून महापौर कला ओझा यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले.

भाजीमंडईत माथेफिरूचा गोळीबार

$
0
0
पंढरपूर येथील भाजीमंडईत किरकोळ अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीत एका माथेफिरूने केलेल्या पिस्तुलाच्या गोळीबारात ३०वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जिल्हा परिषदेत भरली शाळा

$
0
0
पहिली ते आठवीचे आठ वर्ग, एकूण ६२ विद्यार्थी आणि शिक्षक मात्र एकच. ही स्थिती आहे जाफराबाद तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची. गेल्या चार वर्षांपासून शाळेतील आठ वर्गांचा भार एकाच शिक्षकावर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा विपरित परणिाम होत आहे.

हवामान बदलावर मात करणे शक्य

$
0
0
‘हवामान बदलाचा फटका सर्वात प्रथम शेतीला बसतो. दुष्काळ आणि अतिथंडी या दोन संकटात शेतकरी सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी संशोधन केंद्रासोबतच शेतकऱ्यांच्या शेतात नवीन प्रयोग करण्याची गरज आहे.

गुणांची बेरीज बोर्ड विसरले

$
0
0
माध्यमिक व उच्च ‌माध्यमिक शिक्षण मंडळाचा विसरभोळेपणा विद्यार्थ्यांला मनस्ताप देणारा ठरला. बारावीतील एका विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत इंग्रजीचे गुण देणेच बोर्ड विसरले.

डीएमआयसी भूसंपादनास आव्हान

$
0
0
‘डीएमआयसी’ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला बिडकीन येथील शेतकरी लता श्रीनिवास दलाल, सुभाष केशव डुबे व इतरांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणी प्रतिवाद्यांना नोटिस बजावण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images