Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तरुणीस डांबणाऱ्या चौघांना कोठडी

$
0
0
तरुणीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डांबून ठेवणाऱ्या मांत्रिकाच्या महिला साथीदाराला रविवारी (२९ जून) सकाळी पोलिसांनी अटक केली. या चार आरोपींना कोर्टात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

आठवड्यात येणार १५० कोटी

$
0
0
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी (डीएमआयसी) आतापर्यंत ६१० कोटी रुपयांचे वाटप झाले असून येत्या आठवड्यात आ‌णखी दीडशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार यांनी दिली.

पोलिसाची आत्महत्या

$
0
0
क्रांतीचौक पोलिस कॉलनीमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (२९ जून) दुपारी घडला. पोलिस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

रुग्णालयात वेतनवाढीसाठी आंदोलन

$
0
0
वेतनवाढ व सेवाशर्थीविषयक मागण्यांकडे कामगार व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत १६ जूनपासून भारतीय मजदूर संघाच्या वतीने डॉ. हडगेवार रुग्णालयात काळ्या फिती लावून काम करण्यात येत आहे. त्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष कायम असल्याने २७ जूनपासून रुग्णालयाच्या गेटवर कामगार रोज एक तास निदर्शने करीत आहेत.

दरोड्यातील आरोपींकडून १८ हजारांचा माल जप्त

$
0
0
पंढरपूर येथील उद्योग आयकॉन कॉम्प्लेक्समध्ये धाडसी दरोडा टाकत दोन सुरक्षा रक्षकास जबर मारहाण करून धाडसी चोरी केली होती. यातील चार आरोपींकडून तब्बल १८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल आहे.

लग्न जमवण्याचा हट्ट धरत भोसकले

$
0
0
‘माझ्या मुलाचे तुझ्या साडूच्या मुलीशी लग्न लावून दे’ असे म्हणत आई-वडिलांनी मध्यस्थ असणाऱ्याचा भोसकून खून केला. ही थरारक घटना शनिवारी रात्री बीड बायपास येथील महूनगरमध्ये घडली. अखेर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

अल्पवयीन मुलीला पाहून इमारतीत घुसण्याचा प्रयत्न

$
0
0
बजाजनगर येथील एका बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून खोली भाड्याने घेण्याचा बहाना करीत तीन तरुणांनी शनिवारी (२८ जून) घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा वाईट हेतू लक्षात येताच तिने आरडा ओरडा करताच ते पळून गेले.

मंत्री दानवेंच्या कार्यक्रमात भाजपची शिवसेनेवर टीका

$
0
0
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शनिवारी (२८ जून) झालेल्या सत्कार सोहळ्यात तालुक्यातील शिवसेना- भाजप युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव व तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे यांनी शिवसेनेवर टीका करीत विधानसभेच्या जागा वाटपात भाजपने आक्रमक भूमिका घ्यावी, अशी भूमिका मांडली.

विशेष मुलांची गगनभरारी

$
0
0
तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील सुमारे ३५ विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आकाशात उंच भरारी घेत पॅरासोलिंग व पॅराग्लायडिंगची मजा लुटली. तिसगाव- पंढरपूर रस्त्यावरील भांगसीमाता गडावर अपंग, गतिमंद, दृष्टिदोष व कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सोशल मीडियात वरूणराजाची प्रार्थना

$
0
0
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांबरोबर सर्वांचेच पावसाकडे लक्ष लागले आहे. पावसासाठी ठिकठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत. त्याचवेळी फेसबुक व व्हाट्स् अॅपसारख्या सोशल मीडियांवर सुद्धा पावसाची आळवणी करण्यात येत आहे. सोशल मीडियातून पावसाला गाऱ्हाणे घालणारे ग्रामीण भागातील मंडळी अधिक प्रमाणात आहेत.

सोन्याची अंगठी चोरताना डॉक्टरला रंगेहाथ पकडले

$
0
0
प्लॉट खरेदीचा बहाना करून घरात घुसून सोन्याची अंगठी चोरून नेण्याचा प्रयत्न करत करणाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अटक करण्यात आलेली व्यक्ती एम. बी. बी. एस. डॉक्टर असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. सदर बाजार पोलिस घटनास्थळी पोहचण्याआधी नागरिकांना त्याचे हातपाय बांधून चोप दिला.

बुढ्ढीलेन वॉर्डात ५२ टक्के मतदान

$
0
0
नगरसेवक सलीम मिर्झा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बुढ्ढीलेन वाॅर्डाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२९ जून) ५२ टक्के मतदान झाले. बुढ्ढीलेन वार्डाची मतदार संख्या ८२०० आहे. मतदान प्रक्रियेत १३ मतदान केंद्रामध्ये तीन हजार १५७ पुरूष, आणि २५१३ महिला असे एकूण ५६७० मतदारांनी हक्क बजाविला.

ग्रामसडक योजना आता नव्या रुपात

$
0
0
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली पंतप्रधान ग्राम सडक योजना नव्या स्वरुपात सुरू करणार असल्याचे केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (२८ जून) लाख पानव (ता. वैजापूर) येथे केले. केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल दानववे यांचा ग्रामस्थांतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आर. एम. वाणी हे होते.

काँक्रिटीकरणात दगडगोटे

$
0
0
तालुक्यातील नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांमध्ये काँक्रिटीकरणाच्या नावाखाली दगडधोंडे भरले जात आहेत. कामाची गुणवत्ता राखली जावी व कंत्राटदारावर वचक ठेवण्यासाठी कामाचे वेळोवेळी व्हीडिओ शुटिंग कराव, अशी मागणी गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी गोळेगावकर यांनी केली आहे.

आत्मिक स्थैर्यासाठी साधना आणि बदल आवश्यक

$
0
0
आत्मिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी करावी लागणारी साधना आणि त्यामुळे समाज जीवनावर होणारे बदल यांच्या संकल्पना वेगवेगळ्या आणि सकारात्मक असतात, असा सूर रविवारी (२९जून) चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या ‘स्वपरिवर्तनातून समाजपरिवर्तन’ शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात निघाला.

अशोकानंद प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रमात सहभोजन

$
0
0
जैनाचार्यांच्या वेशभुषेतील चिमुकली, कलशधारी महिला, रथ, बैलगाडी व घोड्यांवर स्वार होऊन सादर केलेल्या सजीव देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते. निमित्त होते रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज संघाच्या चार्तुमास प्रवेशाचे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत देखण्या मिरवणुकीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

गंभीर आजाराशी लढत शिवानीने मिळवले ७७.४० टक्के गुण

$
0
0
मागच्या तीन वर्षांपासून गंभीर आजाराशी संघर्ष करीत शिवानी दळवी या विद्यार्थिनीने अतिशय जिद्दीने दहावीच्या परीक्षेत ७७.४० टक्के गुण पटकाविले. या विद्यार्थिनीसह तिचे आई- वडिल अनिल व कांता दळवी यांचा सत्कार तिच्यावर उपचार करणारे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनिल धुळे व ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) शहर शाखेच्या वतीने रविवारी (२९ जून) करण्यात आला.

‘आरोग्य भारती’ राबविणार उपक्रम

$
0
0
‘आरोग्य भारती’च्या वतीने आरोग्याविषयी खऱ्याअर्थाने जगजागृती करण्याचा प्रयत्न देशभर होत आहे. त्याचाच भाग म्हणून आयुर्वेदासह इतर भारतीय चिकित्सा पद्धतींची माहिती देणे तसेच प्रत्यक्ष वापराविषयी प्रबोधन करणे, कुठलीही व्यक्ती आजारीच पडू नये, यासाठी मूलतः प्रयत्न करणे, असे उपक्रम राबविण्यात येतात. असे वेगवेगळे उपक्रम शहरातील ३७ गरीब वस्त्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

तक्रारदार मतदार नोंदणीवेळी गायब

$
0
0
विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नावनोंदणी करून घ्यावी, यासाठी प्रशासनातर्फे २८ (शनिवार) व २९ (रविवार) रोजी सर्व मतदान केंद्रांवर नावनोंदणी अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून नाव वगळल्याची तक्रार करणारे मतदार या नाव नोंदणीपासून दूर असल्याचे दिसले. दरम्यान जिल्ह्यात महिन्याभरात सुरू असलेल्या नावनोंदणीमध्ये २५ हजार नवीन मतदारांनी नोंदणीचे अर्ज सादर केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

LBT आणि CBTला विरोध

$
0
0
राज्य सरकारने स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) नाव बदलून त्याची वसुली विक्री कर विभागाकडे देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला औरंगाबादच्या व्यापाऱ्यांनी स्पष्ट विरोध दर्शविला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images