Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तोतया पोलिसांचा धुमाकूळ

0
0
तोतया पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसर तसेच शहानूरमियाँ दर्गा येथेही दोन वृद्धांना तपासणीच्या नावाखाली लुबाडल्याचे समोर आले आहे.

नव्या STची 'वारी' खंडीत

0
0
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी नव्याने बांधणी केलेल्या गाड्या सोडण्याच्या एसटी महामंडळाच्या परंपरेमध्ये यंदा खंड पडणार आहे. नवीन गाड्यांची निर्मितीच बंद झाल्यामुळे ६७ वर्षांपासूनची परंपरा खंडीत होणार आहे.

सहा जिल्ह्यांत जमिनींची ई मोजणी

0
0
राज्यातील काही जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ई मोजणी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिली. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘ई मोजणी’ प्रकल्प राबवला जाणार आहे.

परळी केंद्र ठप्प

0
0
कोळसा आणि पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ हा रविवारी बंद करावा लागला. त्यामुळे ११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉटच वीजनिर्मिती सुरू आहे.

निकृष्ट रस्ते कामाबद्दल अभिनंदन!

0
0
श्हरातील सदर बाजार पोलिस स्टेशन ते सरस्वती प्रेस या रस्त्याचे डांबरीकरण सध्या निकृष्ट होत असल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने सुरेश देशमुख या नागरिकाने रस्त्यावर फलक लावून या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.

प्रा. चंद्रकांत पाटील यांना ‘महाराष्ट्र भारती’ पुरस्कार

0
0
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा अखिल भारतीय हिंदी साहित्य सेवेसाठी दिला जाणारा ‘महाराष्ट्र भारती’ हा सर्वोच्च पुरस्कार यंदा मराठी व हिंदीचे ज्येष्ठ कवी, समीक्षक, अनुवादक, संपादक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे.

‘सुभेदारी’साठी पाच कोटी मंजूर

0
0
जिल्हा वार्षिक योजना २०१४ – १५ करीता २९१ कोटी रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री बाळसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच येणाऱ्या वर्षात करावयाच्या महत्वाच्या कामांबाबत नियोजन करण्यात आले.

हद्दपारी संपताच चोरीचे वेध

0
0
त्याची हद्दपारी आदेशाची मुदत संपून अवघे चार दिवस झाले होते. चौथ्या दिवशीच त्याने टीव्ही सेंटर भागात सराफा दुकानात शिरून मोबाईल पळवला, मात्र सीसीटीव्हीमध्ये त्याचे चित्रीकरण झाले होते. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी या अट्टल गुन्हेगाराला अटक करीत लॉकअपमध्ये त्याची रवानगी केली आहे.

मटण विक्रेत्याच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी

0
0
मटण घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याने गंभीर जखमी झाल्याचा प्रकार बुधवारी (३० जून) चिकलठाणा भागात घडला होता. उपचारादरम्यान रविवारी (२९ जून) रात्री या नागरिकाचा मृत्यू झाला.

पाणीसाठे जपा; मागणीनंतर ४८ तासांत टँकर

0
0
पावसाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने जिल्ह्यातील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पाणीसाठे जपावेत व परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी (३० जून) दिल्या.

दुर्दम्य इच्छाशक्तीला स्क्रॅप रिक्षाचा आधार

0
0
प्रतिकूल परिस्थितीशी झगडतच तिने दहावीची परीक्षा दिली आणि त्यात तिला तब्बल ९० टक्के गुण मिळाले. तिने लगेच डॉक्टर होण्याचा संकल्पही सोडला; पण हा संकल्प पूर्णत्वास कसा जाणार? असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा वडिलांच्या स्क्रॅप झालेल्या रिक्षाचा आधार आठवला.

महापालिकेत रंगले कार्यक्रम पत्रिकानाट्य

0
0
कार्यक्रम पत्रिकेतून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव वगळल्यामुळे संतापलेल्या स्थायी समितीच्या सभापतींचा तिळपापड झाला. त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून छापलेल्या पत्रिका रद्द करण्याचे व पुन्हा नव्याने पत्रिका छापण्याचे आदेश दिले.

मनपा कर्मचाऱ्यांचे पगार एक दिवस आधीच

0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यासाठी व्यापाऱ्यांनी असहकार पुकारलेला असताना व आर्थिक ओढाताण सुरू असताना महापालिका प्रशासनाने अधिकारी - कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेच्या एक दिवस अगोदरच केले. महापालिकेच्या इतिहासात ३० तारखेला पगार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘मसाप’च्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

0
0
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ३१ ऑगस्ट २०१४ ते १६ जानेवारी २०१५ या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह कुंडलिक अतकरे यांनी दिली.

‘किटली गार्डन’ने केली नात्याची वीण घट्ट

0
0
सिडको एन-३ परिसर हा शहरातील एक सधन भाग म्हणून परिचीत आहे. दुसरी पिढी ही नोकरी, शिक्षणानिमित्त राज्याबाहेर तसेच देशाबाहेर गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा बोलबाला या परिसरात दिसून येतो. वाढत्या वयातही तरुणांना लाजवील असा पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन ‘किटली गार्डन’ विकसित केले. या गार्डनमुळे सामाजिक नात्यांची वीण घट्ट झाली आहे.

पाण्यासाठी नागरिकांनी वॉर्ड कार्यालयाला कुलूप ठोकले

0
0
सिडको एन ९ - एम २ संतज्ञानेश्वर नगर मधील काही घरांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीच येत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी नगरसेविका उर्मिला चित्ते यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या सिडको एन ७ येथील वॉर्ड कार्यालयाला कुलूप ठोकले.

इराकी ‌नागरिकांवर पोलिसांचे लक्ष

0
0
इराक मध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू आहे. तीन वेगवेगळ्या समाजामध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. औरंगाबाद शहरात देखील अनेक इराकी नागरिक शिक्षणासाठी आलेले आहेत. या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे अथवा अन्य काही हालचाली सुरू आहेत का, या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयाच्या वतीने दक्षता बाळगण्यात येत आहे.

खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू

0
0
मोंढा नाका उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (३० जून) रात्री घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अद्याप सोमवारीरात्रीपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. बांधकाम केल्यानंतर एक बाजू उघडी राहिल्याने हा अपघात घडला आहे.

झिरो बजेट शेतीतील ‘कुबेर’

0
0
कधी गारपीट झोडपते, कधी दुष्काळ झोडपतो, तर कधी महागडी किटकनाशके आणि खते. मग शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे? या बिकट परिस्थितीवर कुबेर गेवराई (ता. औरंगाबाद) येथील राधाकिसन कुबेर या अल्पभूधारक शेतकऱ्याने झिरो बजेट शेतीतून मात केली. ‘दशपर्णी’ व ‘जीवामृत’ वापरुन कुबेर यांनी अवघ्या दोन एकरमध्ये विनाखर्च वार्षिक सहा लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

दारू माफियांचा पोलिसांवर हल्ला

0
0
अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावर मंठा तालुक्यातील गारटेकी तांडा येथे दारू माफियांनी सहकुटूंब हल्ला केला. ही घटना रविवारी (२९ जून) रात्री घडली. या घटनेत दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images