Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आणखी अभ्यास करा

0
0
गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाचा (समिती) अहवाल मंगळवारी सरकारला सादर करण्यात येणार होता, मात्र दिवसभराच्या बैठकीनंतर जलसंपदामंत्र्यांनी ‘आणखी अभ्यास करावा,’ असे सांगितले.

जायकवाडीचा साठा जोत्यावर

0
0
दारणा, भावली प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गोदावरीत सोडण्यात आलेले पाणी नाथसागरापर्यंत पोहोचण्यास तीन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. सध्याचा पाण्याचा ओघ कायम राहिल्यास येत्या चार दिवसांत नाथसागराचा मृतसाठा भरून निघेल.

हिमायतनगर पाण्यात

0
0
गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. शेकडो घरात पाणी शिरले असून महामार्गही पाण्याखाली गेला आहे.

कंपनीतील साहित्य लंपास

0
0
टेम्पोचालक मित्राच्या मदतीने कामगाराने कंपनीतील माल चोरल्याचा प्रकार चिकलठाणा एमआयडीसी भागात उघडकीस आला.

ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

0
0
कोर्टात फौजदारी केस दाखल करण्यावरून ज्येष्ठ नागरिकाला घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार फतियाबाद (ता. गंगापूर) येथे मंगळवारी घडला.

मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर दुष्काळ निवारणासाठी मदत

0
0
राज्यातील दुष्काळ काहीसा सुसह्य व्हावा, या हेतूने दुष्काळ निवारणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थान समितीच्या वतीने एक कोटी रुपये देण्याची घोषणा देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी मेमध्ये केली होती.

पाणीप्रश्नी पालिका कार्यालयाला कुलूप

0
0
भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पाणीप्रश्नी मंगळवारी, पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोकले. शहर व परिसराला आठ-दहा दिवसांपासून पाऊस झोडपून काढत असताना, सिडकोत नळाला पाणी कमी वेळ व कमी दाबाने येत आहे.

परमिट रुमवरील कारवाईचे अधिकार 'कस्टम'ला

0
0
गुटख्यापाठोपाठ आता परमीट रुमवरील कारवाईचे अधिकार पोलिसांकडून कमी करण्यात आले असून, हे अधिकार उत्पादन शुल्क विभागाला (कस्टम) देण्यात आले आहेत.

महिला बचत गटाचा वीज ग्राहकांना 'शॉक'

0
0
नियोजित कालावधीमध्ये वीजमीटरचे रिडिंग न घेता ग्राहकांच्या माथी अव्वाच्या सव्वा बिल मारण्याचा प्रकार देगलूरमध्ये घडला आहे.

शैला लोहिया यांचे निधन

0
0
मराठवाड्यातील ज्येष्ठ लेखिका, महिला चळवळीतील अग्रणी आणि राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या डॉ. शैला लोहिया (वय ७३) यांचे बुधवारी सकाळी अंबाजोगाईत निधन झाले.

पैनगंगेचा धोका कायम

0
0
पावसाचा जोर काहीसा ओसरल्यामुळे बुधवारी मराठवाड्याच्या काही भागातील जनतेला उसंत मिळाली. हिंगोलीतील पूर ओसरला असून, मदतकार्याला वेग येणार आहे.

डीटीएड धारकांची आज निदर्शने

0
0
तीन वर्षांपासून डीटीएड सीईटी न झाल्यामुळे राज्यातील पाच लाख डीटीएडधारक चिंतेत आहेत. सीईटी घ्यावी, या मागणीसाठी आता पुन्हा आंदोलनाचा पवित्रा डीटीएडधारकांनी घेतला असून याचाच भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी

0
0
जायकवाडी धरणामध्ये तातडीने २५ टीएमसी पाणी सोडण्याची गरज आहे; मात्र राजकीय बळाचा वापर करुन नगर जिल्ह्यातील नेते मराठवाड्याचे हक्काचे पाणी त्यांच्या भागात वळवत आहेत.

पालिकेने केलेली पाणीपट्टीवाढ रद्द करा

0
0
'औरंगाबाद महापालिकेने पाणीपट्टीत केलेली दर वाढ रद्द करा,' अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी आज बुधवारी विधान परिषदेत केली.

जायकवाडीत १५ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू

0
0
पैठण शहर व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी जायकवाडी धरणात १५००० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, आतापर्यंत धरणाची पाणीपातळी जवळपास नऊ इंचाने वाढली आहे.

'सतत प्रयत्न कराल, तर जीवनात यशस्वी व्हाल'

0
0
'अपेक्षांचे ओझे असताना जीवनात सतत प्रयत्नशील असाल, तर नक्कीच यशस्वी व्हाल,' असे मत भय्यू महाराज यांनी बुधवारी झालेल्या कार्यक्रमात झाले.

पीक विम्यासाठी शेतक-यांना मुदतवाढ

0
0
खरीप हंगामाचा पीक विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हर्सूल तलावात आलेतीन फूट पाणी

0
0
यंदाच्या उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडा पडलेल्या हर्सूल तलावात तीन फुट पाणी जमा झाले आहे. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता २८ फुटांची आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

0
0
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

रस्त्यांच्या खड्ड्यांवरून पेटले रण

0
0
खड्ड्यांची दखल घेऊन महापौर कला ओझा यांनी आज बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व ज्या रस्त्यांचा डिफेक्ट लायब्लिटी पिरेड संपलेला नाही त्या रस्त्याच्या डागडुजीचे काम संबंधित ठेकेदाराकडूनच करून घ्या, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images