Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राजीव सातवांच्या निवडीस आव्हान

$
0
0
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार राजीव सातव यांच्या निवडीला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. मुझफ्फर (बिहार) कोर्टातील गुन्हेगारी खटल्याची माहिती उमेदवारी अर्ज; तसेच शपथपत्र सादर करताना जाणीवपूर्वक दडवली, असा आक्षेप घेत निवड रद्द करण्याची विनंती निवडणूक याचिकेत करण्यात आली आहे.

३८३ दूध उत्पादक संस्थांना टाळे

$
0
0
फक्त स्वतःच्या उद्धारासाठी झटणाऱ्या, केवळ कागदोपत्री शेखी मिरवणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ३८३ दूध उत्पादक सहकारी संस्थाना टाळे ठोकण्यात आले आहे. सहायक निबंधक सहकार संस्थेच्या दूग्ध विभागाने ही बेधडक कारवाई केली. त्यामुळे निव्वळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकांपुरत्या उरलेल्या संस्थाना आता चाप बसला आहे.

वीस हजार जणांना आरोग्य योजनेचा लाभ

$
0
0
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अत्यंत प्रभावीपणे नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आली. दोन वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील २०,५४५ पेशंटना या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठीचा अंदाजे ३९ कोटी रुपये इतका खर्च हॉस्पिटलना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली आहे.

सहा वर्षांच्या बालिकेची गेवराईत हत्या

$
0
0
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे सहा वर्षांच्या एका मुलीचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला असून ही घटना नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या खुनाच्या तपासासाठी पाच पथके तैनात केली आहेत.

मच्छिमारांचे आंदोलन

$
0
0
माजलगाव तलावातील मासेमारीसाठी दिलेल्या टेंडरची मुदत संपल्याने नव्याने टेंडर करावे, स्थानिक मच्छिमारांना त्याद्वारे रोजगार मिळावा या मागणीसाठी ‘लोकशासन आणि आव्हान’ संघटनेचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तलाव परिसरात जमावबंदी आदेश झुगारून आंदोलन करण्यात आले.

साहित्य संमेलनाबाबत उस्मानाबादकरांना ठेंगा

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद पंजाबला मिळाल्याने उस्मानाबादकरांची निराशा झाली आहे. ८८वे साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची चर्चा होती.

पेरणीच नाही, तर विमा कसा काढणार?

$
0
0
खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी होण्यापूर्वीच पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्याने हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत.

प्राचार्य, संशोधक रामदास डांगे यांचे निधन

$
0
0
प्राचार्य, संशोधक रामदास खुशालराव डांगे (वय ७७) यांचे मुंबईत मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परभणीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘टोलवसुली बंद’चा बिगुल वाजला

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन टोलनाके मंगळवारपासून बंद करण्यात आले. राज्य सरकारने एक जुलैपासून राज्यातील ४४ टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उस्मानाबादमधील दोन टोलनाके बंद होत आहेत.

मराठा, मुस्लिम आरक्षण हा कॉँग्रेस - राष्ट्रवादीचा डाव

$
0
0
मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला निवडणुकीच्या तोंडावर दिलेले आरक्षण हा कॉँग्रेस - राष्ट्रवादीचा वेगळा डाव आहे. त्यांचा उद्देश निराळा आहे. हे आरक्षण मुळीच टिकणार नाही, असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केला.

टंचाईला तोंड देण्याऐवजी देवाचा धावा

$
0
0
पाऊस न आल्यामुळे दुष्काळाची चाहूल लागली असताना आपत्कलीन उपाययोजना करण्याऐवजी तालुक्याचे प्रमुख अधिकारी पावसासाठी देवाचा धावा करीत आहेत. पाणीटंचाई तीव्र होणार असल्याचे स्पष्ट दिसत असताना आपत्कलीन व्यवस्थापन समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही.

भाजप-शिवसेनेत तू-तू मै-मै

$
0
0
भारतीय जनता पक्षातर्फे पैठण विधानसभेच्या मतदार संघाची मागणी करण्यात आल्यानंतर शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुक्यात केवळ दोन नगरसेवक एवढीच राजकीय ताकत असलेल्या भाजपने अंथरूण पाहून पाय पसरावे, असा सल्ला येथील शिवसेनेतर्फे भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

तोंडचा घास हिरावला

$
0
0
एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या तोंडचा घास हिरावला आहे. चारा टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या दूध उत्पादक चढ्या दराने चारा खरेदी करीत आहेत.

शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

$
0
0
शिवसेना कार्यकर्त्यात सोमवारी सायंकाळी वादावादी झाली. विद्युतीकरण समितीच्या बैठकीत जीटीएलसंदर्भात प्रश्न विचारण्याच्या कारणावरुन ही हमरीतुमरी झाली. कोकणवाडी सिग्नल चौकातील आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्ककार्यालयासमोर हा प्रकार घडला. यात संपर्ककार्यालयाची एक काच फुटली.

५०० वाढीव जागांबाबत आज होणार निर्णय?

$
0
0
गेल्या वर्षी राज्यात वाढवून मिळालेल्या वाढीव ५०० जागा सरकार आणि मेडिकल कॉलेजांच्या दुर्लक्षामुळे यंदा एमसीआयने कमी केल्या होत्या. या जागा पुन्हा वाढवून घेण्यासंदर्भात बुधवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

कामचुकार कर्मचाऱ्यांची चंगळ!

$
0
0
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या कार्यालयात अचानक भेट देऊन वेळेवर न आलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र वेळेची सूट मिळावी अशी व्यवस्था खुद्द राज्य सरकारनेच केली आहे.

जिल्हा भकास अन् सुभेदारीचा विकास!

$
0
0
मराठवाड्याच्या तोंडचे पाणी दुष्काळी स्थितीमुळे पळाले आहे. दिवसभर सुरू असलेले वारे आणि तापणारा सूर्य, काळजात ‘धस्स’ निर्माण करतोय. शेतकऱ्याच्या जिवाची चिंतेने लाही-लाही होतेय. औरंगाबादकर पाण्याचे टॅँकर कितीने खरेदी करावे लागणार? मिळणार तरी का? याच काळजीत आहे.

‘अच्छे दिन’ येऊ लागले

$
0
0
योग्य प्रकारचे आर्थिक नियोजन गेल्या पाच वर्षांत प्रथमच झाल्याचे महापालिकेशी संबंधित व्यक्ती सांगतात. आर्थिक शिस्त लावण्यासाठी कणखर भूमिका घ्यावी लागते. कणखर भूमिकेची चर्चा देशपातळीवर जशी सुरू झाली तशीच ती महापालिकेच्या स्तरावरही सुरू झाली आहे.

शेंदूरवाद्यात एका रात्रीत दोन दरोडे

$
0
0
शेंदूरवादा परिसरात दरोडेखोरांनी मंगळवारी (१ जुलै) पहाटे दोन ठिकणी धुमाकूळ घालत दरोडा टाकला. शेतवस्तीवरील कुटुंबाला मारहाण करीत जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

घोटी हायवेलगत सिडकोची नगरे

$
0
0
सिडकोने नागपूर- घोटी महामार्गालगत नगर पाच व सहा वसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी नगर तीन मधील ६९३९.८९ हेक्टर क्षेत्र नागरीकरणासाठी अयोग्य असल्यामुळे ते वगळ्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images