Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भटक्या कुत्र्यांचा तीर्थपुरीत धुमाकुळ

$
0
0
घनसावंगी येथील तीर्थपुरी येथे एक आठवड्यापासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यांना लहान मुले व मोठ्यांना चावा घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजची लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रा चावलेल्यांना उपचारासाठी अंबड व जालन्याला जावे लागले.

सिमेंट नालाबांधामुळे सावखेड्यात पाणी

$
0
0
कृषी विभागाने सावखेडा येथे बांधलेल्या सिमेंट नाला बांधामुळे येथील शेतांना विद्युत पुरवठ्याशिवाय पाणी मिळत आहे. शिवाय पाणीटंचाईच्या या काळातही शेतीला पाणी उपलब्ध असल्याने येथील चित्र झपाट्याने बदलत आहे.

पीरकल्याण प्रकल्पावरील सहा शेती पंप जप्त

$
0
0
जालना तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्पातून शेतीला चोरून पाणी देणाऱ्या सहा शेतकऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी बुधवार ( २ जुलै) कारवाई केली आहे. या शेतकऱ्यांचे पाणी उपसा करणारे सहा पंप व पाइपलाइन जप्त केली. या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाढीव वीज बिलांचा शॉक

$
0
0
पैठण गेटवरील एका गॅरेजवाल्याचे विजेचे ‌बील या महिन्यात नियमित बिलापेक्षा जास्त आले आहे. वाढीव बिल आलेच कसे? त्यात दुरुस्ती होणार की नाही? असे प्रश्न त्यांना पडले आहेत. हा प्रश्न एका गॅरेजवाल्याचा नवे तर शहरातील सर्वच वीज ग्राहकांचा आहे. वाढीव बिलाच्या तक्रारी घेऊन जीटीएलच्या कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.

दुष्काळी छायेचा उद्या आढावा

$
0
0
दुष्काळी छायेने पुन्हा एकदा मराठवाड्याला धास्ती भरलीय. शेतकऱ्यांपासून जितराबांपर्यंत साऱ्यांची डोळे आभाळाकडे. दावणी चाऱ्याविना रिकाम्या पडलेल्या. या संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

बीड जिल्ह्यात केवळ २% पेरणी

$
0
0
बीड जिल्ह्यात जून महिना संपला तरी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ बारा हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या केवळ दोन टक्केच पेरणी झाली असून खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख हेक्टरच्या जवळपास असताना पावसाअभावी लाखो हेक्टर वरची पेरणी खोळंबली आहे.

उस्मानाबादेत आघाडीत बिघाडी

$
0
0
राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे नांदत असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत नसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षानी स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

‘पाणी साठवा गाव वाचवा’

$
0
0
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याला तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून मिळणारा तीन लाख रुपयांच्या निधीचा वापर यंदा जलसंधारणाच्या कामासाठी करण्याचा निर्णय एकमताने झाला. ही माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुन्हे तपासात औरंगाबादचा नीचांक

$
0
0
औरंगाबादेत २०१३मध्ये एकूण गुन्ह्यांत ४४ कोटी रूपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. यापैकी फक्त दोन कोटी ३२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाची ही माहिती असून देशात निचांकी वसुलीत औरंगाबाद शेवटून चौथ्या क्रमांकावर आहे.

‘गिटार’ मेरी जान...

$
0
0
कोणत्याही म्युझिक बँडमध्ये हातात गिटार घेऊन तल्लीन होऊन गाणारा लीड सिंगरच जास्त भाव खाऊन जातो. पाश्चिमात्य वाद्यांमधील गिटारची जादू अधिक वाढली आहे.

फाटक्या आयुष्यातही तिची शिक्षणाची वीण घट्ट

$
0
0
गाव सोडून आई-वडील दोघेही शहरात आले व ‘टेलरिंग’च्या जोरावर कसेबसे पोट भरू लागले. जीवन जगणेच तारेवरची कसरत झाल्यामुळे गरीबीचे चटके सहन करीत शिक्षण घ्यावे लागले. जुनी पुस्तके, हलक्या वह्या आणि मावशीने किंवा इतर नातेवाईकांनी भरलेल्या ‘फी’तून शिक्षण कसेबसे सुरू राहिले. अर्थात, बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर क्षितिजा ज्ञानेश्वर इंगळे हिने ९०.६० टक्के घेऊन भरारी घेतली आहे.

आजारी जवानाला निधनानंतर पैसे मंजूर

$
0
0
महापालिकेत जवान म्हणून काम करणारा कर्मचारी मेंदू विकाराने आजारी पडला. उपचारासाठी वैद्यकीय मदत (अग्रीम रक्कम) मिळावी म्हणून त्याने सादर केलेला प्रस्ताव त्याच्या मृत्यूच्या अडीच वर्षानंतर गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

जुने ‘सीआर’ फाडा, नवे प्रस्ताव सादर करा

$
0
0
सरकारी मेडिकल कॉलेजातील वैद्यकीय शिक्षकांचे जुने गोपनीय अहवाल (सीआर) फाडून टाकून नव्याने सीआर लिहा आणि प्रस्ताव सादरा करा, जेणेकरून सहायक प्राध्यापकांना बढती देता येईल, असे अजब आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याने दिले आहेत.

सात लाख रुपयांची कुस्ती मॅट झाली ‘गायब’

$
0
0
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नावीन्यपूर्ण योजनेतून खरेदी केलेली लाखो रुपयांची कुस्ती मॅट ‘गायब’ होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वीच शहरात आलेल्या कुस्ती मॅटचा शोध अद्यापही लागलेला नाही.

खंडणी घेताना गुंड गजाआड

$
0
0
सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून आठ हजार रुपयांची खंडणी घेताना एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणवून घेणाऱ्या भामट्याला सिडको पोलिसांनी गुरुवारी (३ जुलै) सकाळी पकडले​. टाऊन सेंटर भागात ही कारवाई करण्यात आली.

हर्सूल तलावात शिक्षिकेची आत्महत्या

$
0
0
हर्सूल तलावामध्ये गुरुवारी (३ जुलै) सकाळी पालिकेच्या शाळेतील शिक्षिकेने आत्महत्या केल्याची घटना घडली. पल्लवी खंडागळे असे या शिक्ष‌िकेचे नाव असून, सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह आढळून आला. शिक्षिकेची दुचाकी, पर्स, मोबाईल तलावाच्या काठावर आढळली असून, आत्महत्या करीत असल्याचे पत्रही तेथे सापडले.

१२० लघु उद्योजकांना महावितरणाचा त्रास

$
0
0
महावितरणाची वाळूज औद्योगिक परिसरातील गट नंबर ६७ आणि ७० वडगाव कोल्हाटी भागात येणाऱ्या १२० उद्योग सध्या संकटात सापडले आहे. या भागाला वीज पुरवठ्यात अनियमितपणा; तसेच वीज जोडणीची कामे वेगाने केले जात नसल्यामुळे याचा फटका लघु उद्योजकांना बसत आहे.

निकृष्ट सिमेंट रस्त्यांबद्दल कंत्राटदार, अभियंत्यांना नोटीस

$
0
0
पैठण-आपेगाव प्राधिकरणांतर्गंत चार सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये आढळलेल्या त्रुटींची दखल जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी घेतली आहे. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारासह अभियंत्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

सासरच्या छळामुळे पतीची आत्महत्या

$
0
0
पत्नी व सासुरवाडीकडील मंडळीच्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केली. एकोड शिवारात ही घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पत्नी, सासू, सासऱ्यासह पाच जणांना चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे.

घरून काम कराल तर बंदोबस्त करू!

$
0
0
‘घरी बसून काम कराल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी जाऊन काम कराल, तर तुमचा बंदोबस्त करू’ अशा शब्दांत महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विजय वाघचौरे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. सभापती झाल्यानंतर गुरुवारी (३ जुलै) घेतलेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी ही तंबी दिल्यामुळे पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images