Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१५० कोटींच्या ऑर्डरची चिन्हे

$
0
0
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजचा (सीआयआय) वतिने आयोजित ‘बायर सेलर मीट’च्या माध्यमातून पुढच्या दोन महिन्यात १५० कोटींच्या ऑर्डर स्थानिक व्हेंडरना मिळण्याची शक्यता आहे.

कष्टकऱ्यांच्या विद्यापीठात विद्यार्थ्यांचा खिसा रिकामा

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने श्रेणी सुधार परीक्षा शुल्क आणि बहिस्थ परीक्षा शुल्क आकारणीत राज्यातील इतर विद्यापीठांना मागे टाकले आहे.

खासगी नाट्यगृहे जोमात; मनपाची गेली कोमात

$
0
0
सिडको परिसरातील प्रेक्षकांच्या मागणीवरुन संत तुकाराम नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली; मात्र महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाट्यगृहाला अवकळा आली आहे. नियमित स्वच्छता नसल्यामुळे आलिशान नाट्यगृहाची रया गेली आहे.

घाटी वसतिगृहात दिवे लागले; कामांचा अंधारच

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात चोवीस तासात पाण्याचे सगळे प्रश्न मिटवा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देऊन आठ दिवस उलटले. मात्र अनेक प्रश्न ‘जैसे थे’ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सद्यस्थितीत मुलांच्या वसतिगृहात एकमेव वॉटर कुलर व प्युरिफायर बसवण्यात आले आहे.

बोर्डाचा लिपिक लाच घेताना जाळ्यात

$
0
0
एसएससी बोर्डाच्या कनिष्ठ लिपिकाला पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. बोर्डाच्या इमारतीमध्ये शुक्रवारी (४ जुलै) दुपारी दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. मार्क लिस्टमध्ये नावात बदल करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.

महापौरांच्या बजेटला प्रशासनाची कात्री

$
0
0
महापौर कला ओझा यांनी महापालिकेचे बजेट ७९० कोटी रुपयांचे तयार केले असले तरी प्रशासनाची दौड मात्र ५५० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्पील ओव्हरसह नवीन विकास कामे रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाळू माफिया युनूस गुन्हे शाखेच्या जाळ्यात

$
0
0
कुख्यात वाळू माफ‌िया शेख युनूसला गुन्हेशाखेच्या पथकाने शुक्रवारी (४ जुलै) दुपारी सातारा परिसरात ताब्यात घेतले. युनूसवर शेवगाव पोलिस ठाण्यात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून, शेवगाव पोलिसांना तो वाँटेड होता.

दीडशेवर वर्कऑर्डर; कामांचा पत्ताच नाही

$
0
0
लहान कंत्राटदारांच्या बिलांकडे पालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दीडशेवर वर्कऑर्डर निघून देखील कामांचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे ही कामे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यातील सर्वच कामे देखभाल दुरुस्तीच्या निकषात मोडत आहेत.

रेल्वे विकासासाठी जमीन विका

$
0
0
चक्क रेल्वेच्या मालकीची आठ एकर जागा विकून रेल्वे मार्गाच्या विकासासाठी निधी तयार करा, असा अजब सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी मांडला आहे. शुक्रवारी (४ जुलै) रेल्वेच्या प्रश्नांबाबत त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा प्रस्ताव मांडला.

वाळूजमध्ये पुन्हा दरोडा

$
0
0
गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा पडला आहे. काल (गुरुवारी) मध्यरात्री ही घटना घडली. ४५ हजारांची घरफोडी करून चोरटे पसार झाले. यावेळी त्यांनी घरातील लोकांना जबर मारहाण केली. त्यामुळे भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

कैलासनगरात भूसंपादन सुरू

$
0
0
लक्ष्मणचावडी ते एमजीएम या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने शुक्रवारी भूसंपादनाची कारवाई सुरू केली. रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या २१ घरांवर मार्किंग करण्यात आले.

पाण्याच्या वाटपावर नेते नाराज

$
0
0
जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होणारे पाणीवाटप जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार समन्यायी पद्धतीनेच व्हावे. याबाबत योग्य तो निर्णय व्हावा, मराठवाड्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती आहे.

मंत्री म्हणतात टंचाई नाही

$
0
0
मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये ६१४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वत्र चिंतेचे सावट असताना विभागात पाणी आणि चारा टंचाई नाही असे जाहीर करीत पुनर्वसन व मदत कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी आढावा बैठक अक्षरशः गुंडाळली.

आरोग्य केंद्रात कुत्र्यांचा मुक्काम

$
0
0
महापालिकेच्या कटकटगेट येथील आरोग्य केंद्रात रुग्णांऐवजी कुत्र्यांचीच संख्या जास्त झाली आहे. कुत्र्यांचा आरोग्य केंद्रात मुक्कामच असतो. केंद्रातील फरशाही उखडलेल्या आहेत, अशी तक्रार महापालिकेतील यूपीएचे गटनेते मीर हिदायत अली केली.

जालना प्रकल्पासाठी सिडकोची बैठक

$
0
0
जालना येथील नियोजित सिडको प्रकल्प उभारणीसाठी शुक्रवारी (४ जुलै) दरेगाव, नागेवाडी भागातील शेतकऱ्यांशी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली.

‘आयटीआय’च्या प्रवेशाचे ‘ट्रायल’

$
0
0
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेशप्रक्रियेचा शनिवारपासूनचा मुर्हूतही हुकला आहे. ऑनलाइन प्रवेशाचा कॉलेजांना ताप होऊ नये, यासाठी कॉलेजांना पाच दिवस प्रवेश प्रक्रियेच्या ‘ट्रायल’साठी देण्यात आले आहेत.

दोन विविध घटनांत तरुणांची आत्महत्या

$
0
0
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार चिकलठाणा व मुकुंदवाडी हद्दीत घडला. या आत्महत्यांचे कारण समजू शकले नसून, सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके गोत्यात

$
0
0
वेतनाचे रेकॉर्डच मिळत नसल्यामुळे महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके गोत्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता मावळल्याचे बोलले जात आहे.

ट्रॅव्हल्स चालकाचा बसमध्येच मृत्यू

$
0
0
खुराणा ट्रॅव्हल्सच्या बदली बसचालकाचा चालत्या बसमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. अहमदनगर रोडवरील ढोरगाव येथे शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मेडिकल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

मुलीला माहेरी आणणाऱ्या पित्याला मारहाण

$
0
0
सासुरवाडीची मंडळी त्रास देत असल्याने मुलीला माहेरी आणणाऱ्या वृद्ध पित्याला चौघांनी मारहाण केली; तसेच या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर चाकुहल्ला करण्यात आला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images