Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत्नीसह मुलांनी केली वडिलांना मारहाण

$
0
0
घरात चप्पल घालून आल्याच्या कारणावरून पत्नीसह मुलांनी वडिलांना मारहाण केली. न्यायनगर येथे शुक्रवारी (५ जुलै) सकाळी हा प्रकार घडला असून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालयाची झाडाझडती

$
0
0
नाविन्यपूर्ण योजनेतून घेतलेल्या सात लाख रुपये किमतीच्या कुस्ती मॅट गायब होण्याच्या प्रकाराची क्रीडा खात्याने गंभीरतेने दखल घेतली असून, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी सलग दोन दिवस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची झाडाझडती घेतली आहे.

‘मटा आयटी एक्स्पो’ला मोठा प्रतिसाद

$
0
0
‘अत्याध्युनिक टेक्नॉलॉजी’ची लेटेस्ट उपकरणे पाहण्यासाठी शहरातील तंत्रज्ञानप्रेमींनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये रविवारी (५ जुलै) गर्दी केली.

महिला उद्योजकांची संख्या वाढीसाठी प्रयत्न करणार

$
0
0
औरंगाबादेत महिला उद्योजकांची संख्या वाढली पाहिजे. किमान ५० ते ६० महिला उद्योजक तयार झाल्या पाहिजेत, त्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) येत्या वर्षात विविध उपक्रम राबविणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

वसतिगृहांच्या टेरेसला दरवाजे बसवा

$
0
0
इमारतीच्या छतावरून विद्यार्थ्यांने केलेल्य आत्महत्येमुळे किल्लेअर्क येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात सुरक्षेसाठी खास उपाययोजना आखण्यात आली आहे.

सिटी बँकेला दणका

$
0
0
बँक खात्यात दहा लाख रुपयांचा चेक वटवताना निष्काळजीपणा दाखवल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने सिटी बँकेला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात धर्मेंद्र रामनाणी यांच्या बाजूने निकाल देताना मंचाने बँकेला तीन वर्षांच्या व्याजासह मूळ रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.

निष्काळजीपणा ठरला अडथळा

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पुढाकाराने ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असले तरी नऊ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून झेडपी मुख्यालयात अहवाल सादर करण्यात आलेला नाही.

शिवसेनेची व्यूहरचना तयार

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५७० मतदान केंद्रांसाठी शिवसेनेच्या ६६ टीम काम करणार आहेत, अशी घोषणा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबिरात शनिवारी (५ जुलै) केली.

प्रसंगी नऊही जागा लढवू

$
0
0
‘राणा भीमदेवी थाटात राहू नका. औरंगाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सर्व नऊ जागा लढवण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो आदेश येईल तो आमच्यासाठी अंतिम असेल,’ असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार विनोद घोसाळकर व खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी भाजपला दिला.

बनावट स्पार्क प्लग जप्त

$
0
0
मायको बॉस कंपनीच्या नावाखाली बनावट स्पार्क प्लगची विक्री करून ग्राहकांची व कंपनीची फसवणूक करणाऱ्या एका विक्रेत्यास सिटी चौक पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून सुमारे पाच हजार रुपये किमंतीचा बनावट स्पार्क स्पार्क प्लगचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ते गाणे माझ्याकडून हिरावले!

$
0
0
‘पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर १९६४ मध्ये ‘ए मेरे वतन के लोगो’ गीत गाण्यासाठी मला बोलावले. गाण्याची रिहर्सल झाली; मात्र व्यासपीठाच्या मागे सांगण्यात आले की तुम्हाला इतर गाणी गावी लागणार आहेत. माझ्याकडून हे गाणे हिरावून घेण्याचे कोडे अजूनही उलगडले नाही,’ असा गौप्यस्फोट प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी केला. नांदेड येथे रविवारी आषाढी महोत्सवात घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी जीवनातील अविस्मरणीय प्रसंग सांगून रसिकांना जिंकले.

सात दरोडेखोर जेरबंद

$
0
0
दरोड्याच्या तयारीत रोपवाटिकेत दबा धरून बसलेल्या सात अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात कळंब पोलिसांना यश आले. याप्रकरणी या सातही जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीकडून हत्यार, मिरची पुड, लोखंडी चाकू, नॉयलान दोरी आदी साहित्य जप्त करण्यात आले.

तोतया पोलिसांना अटक

$
0
0
पोलिस असल्याचे भासवून पोलिस दलात भरती करतो असे सांगून रोख रक्कम व दागिने घेवून तरूणांची फसवणूक करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरुद्ध येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपची नजर

$
0
0
भाजप-शिवसेना युतीमध्ये लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. यापूर्वी तशी भगवी लाट लोहा व कंधार तालुक्यामध्ये होती. आता मात्र, त्यामध्ये अंतर्गत गट-तट तसेच इतर मातब्बरांनी इतर पक्षाशी घरोबा केल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. त्या तुलनेत भाजपाची शक्ती वाढली असल्याने त्यांनी पूर्वीचा कंधार विधानसभा आता फेररचनेत लोहा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

स्वामी विवेकानंद यात्रेचे स्वागत

$
0
0
औंढा नागनाथ येथे स्वामी विवेकानंद यात्रेचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने स्वामी विवेकांनद यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

शिवसेनेचे आंदोलन

$
0
0
लोकक्षोभामुळे राज्यातील अनेक टोलनाके बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे. नरसी- मुखेड- ताजबंद शिरुर या राज्य रस्ता क्र. २२५च्या नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू होणार असताना त्या आधीच संबंधित एजन्सीने टोल वसुली सुरू केली. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेने चक्का जाम आंदोलन केले.

चौघांविरुद्ध गुन्हा

$
0
0
सोशल मीडीयाच्या माध्यमातून अक्षेपार्ह ग्रुप मेसेज टाकल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणास बेदम मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सकाळी १०.३० वाजता कंधार येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेबिजच्या इंजेक्शनअभावी मृत्यू

$
0
0
एका मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या युवकाचा बळी गेला. मुदखेडच्या रुग्णालयात वेळीच रेबीजचे इंजेक्शन मिळाले असते तर हा युव‌क वाचला असता, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. या प्रकारामुळे मुदखेड येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे.

आरोग्ययंत्रणा कोलमडली

$
0
0
विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बीड जिल्ह्यातील १८४ डॉक्टर या संपात सहभागी झालेले असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.

बीडचे ४५ हजार मतदार वाढले

$
0
0
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला निवडणूक विभाग लागला आहे. या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचे अभियान जून महिन्यात राबवण्यात आले. या नोंदणीत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात पुरवणी यादीत ३० जूनपर्यंत ४५ हजार ९१९ मतदारांची भर पडली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images