Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

व्हर्च्युअल क्लासरुम

0
0
कन्नड तालुक्यातील जैतापूर येथे लोकसहभाग व लोकवर्गणीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्यात आली आहे. या क्लासरूमचे उद्घाटन देवगाव रंगारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या उज्वला सोनवणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

जालन्यात मंगळसूत्र चोरी

0
0
मंगळसूत्रचोर जालन्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेत. रविवारी (६ जुलै) सकाळी एका शिक्षकेच्या गळ्यातील ८० हजारांचे गंठन हिसकावून त्यांनी पोबारा केला. शहरातील जुना जालन्यात राहणारी अश्विनी पाटील ही शिक्षिका सकाळी आनंदी स्वामी मंदिरात दर्शन करून घराकडे परतत होती. उड्डान पुलाजवळील मिसाळ टॉवर जवळ पाठीमागून आलेल्या २ अनोळखी दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील गंठन हिसकावून पोबारा केला.

डॉक्टरांचा संपाचा फटका

0
0
राज्यभरातील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेले आहेत. त्याचा फटका आता ग्रामीण भागाला बसण्यास सुरुवात झाली आहे. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे गेल्या चार दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. तेथे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने उपचारासाठी अडचणी येत आहेत.

३३६६ गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

0
0
तालुक्यातील ग्रारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८ कोटी ४९ लाख ६८ हजार ७२० रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३३६६ शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी ११ लाख ९६ हजार ६२७ रुपये खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसील कार्यायातून देण्यात आली.

शेतकऱ्यांचे डोळे पुनर्वसू नक्षत्राकडे

0
0
सकाळी आभाळात ढग दाटून येतात. दिवसभरच्या उकाड्यामुळे आज पाऊस येणार, असे वाटते. मात्र एक थेंबही पाऊस पडत नाही. ही अवस्था सव्वा महिन्यापासून कायम आहे. हमखास पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन नक्षत्रे पूर्ण कोरडी गेली आहेत.

आंबट-खारट फोड अन् जेवण गोड

0
0
लोणच्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटतेच. मग ते लिंबाचे असो, की आंब्याचे. पहिला पाऊस पडला, की लोणचे बनवण्याची तयारी सुरू होते. यावर्षी अजून पाऊस पडला नाही. तो येईल ही आशाय. सध्या बाजारात लोण्याच्याच्या कैऱ्या आल्या.

७५ हजार लोकांना निर्जळी

0
0
सिडको एन - सात येथील पंपहाऊस परिसरात रविवारी (६ जुलै) दुपारी तासभर वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा फटका पाणी वितरणावर झाला. नियोजनातील सात कॉलन्यांना फटका बसला. जवळपास ७५ हजार नागरिकांना सलग तिसऱ्या दिवशी निर्जळी घडली.

सिटीबसअभावी तुटले सातारा

0
0
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे सातारावासियांचे बेहाल सुरू आहेत. ना कधी सिटीबस येते, ना कधी अॅपेरिक्षा. मग रात्री बेरात्री तर सोडाच दिवसाही प्रवास करायचा तर कसा? असा सवाल नागरिक करत आहेत.

पोषण आहार कामगारांचा प्रश्न

0
0
शालेय पोषण आहार योजनेतील काम हे बचत गटाकडे न देता पूर्ववत कामगार व मदतनिसांकडेच द्यावे, अशी मागणी करत महाराष्ट्र शालेय पोषण आहार समन्वय समितीतर्फे रविवारी (६ जुलै) निर्धार मेळावा घेण्यात आला.

एव्हरेस्ट गर्ल म्हणते मुलींना शिकवा

0
0
वयाच्या तेराव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर चढलेली पूर्णा मालावत रविवारी (६ जुलै) बंजारा समाजाने केलेल्या सत्काराने भारावून गेली. ‘गोर सीकवाडी’ संस्थेने भानुदास चव्हाण सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता.

हॉलतिकिटामुळे नोकरीचा ‘पत्ता’ कट

0
0
महिला बालविकास विभागातील कुक (स्वयंपाकी) व केअरटेकर (काळजीवाहक) पदासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. शहरातील अठरा सेंटरवरून घेण्यात आलेल्या या परीक्षेला मराठवाड्यासह बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमधील परीक्षार्थी आले होते.

स्वतंत्र रेल्वे झोन जाहीर करा

0
0
मराठवाड्यातील रेल्वे विकास खुंटला आहे. मोदी सरकारचे रेल्वेमंत्री सदानंद गौडा हे आपला पहिला अर्थसंकल्प उद्या सादर करतील. रेल्वेप्रश्नी मराठवाड्याला ‘अच्छे दिन कधी येणार?’ या रेल्वे अर्थसंकल्पत, तर प्रलंबित मागण्या मान्य होणार का? याचीच प्रतीक्षा उभा मराठवाडा करतो आहे.

‘मॅग्मो’च्या डॉक्टरांवर कारवाई?

0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर असलेल्या औरंगाबाद विभागातील ३७१ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन सोमवारी होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने संपावर गेलेल्या डॉक्टरांना सोमवारी सकाळी दहापर्यंतची मुदत दिली आहे.

जिल्हा पुन्हा टँकरच्या स्वाधीन

0
0
पावसाने दडी मारल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यामधील सुमारे चारशे गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, जिल्ह्यामध्ये सध्या २०९ गावांना प्रशासनाकडून ३०६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पोलिस भरतीला तोबा गर्दी

0
0
शहर पोलिस भरती प्रक्रियेसाठी रविवारी शहरात दोन ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण चार हजार १०३ उमेदवारांनी परीक्षा दिली असून परीक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उस्मानाबाद परिसरात पावसाचा शिडकावा

0
0
गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या आशा पुनर्वसू नक्षत्रात सुरू झालेल्या पावसाने पल्लवित झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात रविवारी दुपारनंतर आणि सायंकाळी तसेच सोमवारी दुपारी पावसाचा शिडकावा झाला.

बीड जिल्ह्यात दमदार पाऊस

0
0
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन झाले नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. मात्र रविवारी मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पालिकांच्या निवडणुका १६ जुलै रोजी होणार

0
0
जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन व परतूर या नगर परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा निवडणुका १६ जुलै रोजी होणार आहेत. या चारही नगर परिषदांमध्ये प्रशासकीय अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

शेतकऱ्याला फक्त ३७ रुपयांची मदत

0
0
गेल्या मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली आहे. या नुकसान भरपाईच्या रकमेबद्दल नाराजी असताना एका शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीसारखी अवस्था झाली आहे.

तीन तालुक्यात जोरदार, इतरत्र रिमझिम

0
0
जिल्ह्यातील काही तालुक्यात रविवारी (६ जुलै) रात्री उशिरा पावसाचे आगमन झाले. सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री या तीन तालुक्यात पावसामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र कन्नड, गंगापूर, वैजापूर, पैठण या तालुक्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images