Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खुलताबादच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांचा आग्रह

$
0
0
गंगापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी खुलताबाद तालुक्यातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावेळी उमेदवारी देण्यासाठी आग्रह करण्याचा एकमुखी ठराव बैठकीत संमत करण्यात आला.

झेडपीतला कुठला शिक्षणाधिकारी अधिकृत?

$
0
0
औरंगाबाद जिल्हा परिषदेत बेकायदेशीररीत्या दोन शिक्षणाधिकारी कार्यरत असल्याची चौकशी करावी, अशी मागणी खासगी मान्यताप्राप्त (प्रा. मा.) महासंघाने केली आहे.

अॅपेचा धक्का पाठ सोडेना

$
0
0
एक दोन नव्हे तब्बल पाच वर्ष त्यांनी सिटीबससाठी लढा दिला. आंदोलने केली. निवेदने दिली. फक्त हसऱ्या चेहऱ्यातून आश्वासन मिळाले. अॅपेचे धक्के खावून पाठीचा पोक वाढला. पण अजूनही मिटमिटा, पडेगावपर्यंत सिटीबस सुरू झालीच नाही.

फेरमूल्यांकनात झाली घसघशीत गुणवाढ

$
0
0
गुणपडताळणी आणि पूनर्मूल्यांकन प्रक्रियेतून ‌बारावीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. दोन्ही प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी दहा टक्के विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकेतील गुण वाढले आहेत. विद्यार्थ्यांना फायदा झाला असला, तरी बदलामुळे उत्तरपत्रिका तपासणीत त्रुटी राहिल्याचे समोर येते.

स्टेशन रोडला एकच डेडलाइन द्या

$
0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन वारंवार हुकू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची एकच डेडलाइन द्या आणि त्या डेडलाइनमध्ये काम पूर्ण करा, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी (७ जुलै) महापालिका आयुक्तांना बजावले.

मुकुंदवाडी स्टेशनच्या विकासाची सूचना

$
0
0
सिडको, सातरा, चिकलठाणा व सातारा भागातील प्रवासी दररोज मोठ्या संख्येने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवरून रेल्वे पकडतात. शेकडो प्रवाशांच्या सोईसाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचा विकास करावा, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

विठुरायांच्या भक्तांसाठी छोटे पंढरपूर झाले सज्ज

$
0
0
वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भक्ताच्या स्वागतासाठी छोटे पंढरपूर सज्ज झाले आहे. मंदिर परिसरात कोणाताही अनूचित प्रकार घडून नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

मराठवाडा साहित्य संमेलन यंदा उदगीरला सप्टेंबरमध्ये

$
0
0
नियोजित ३६वे मराठवाडा साहित्य संमेलन उद्गीर (जि. लातूर) येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी (७ जुलै) संमेलन स्थळाची घोषणा केली.

विविध क्रीडा अनुदान योजना रडारवर

$
0
0
राज्यात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी शासनाने क्रीडा खात्याला विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपये दिले. या योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार होत असल्याचे अनेक गोष्टींतून सिद्ध होत आहे. या गैरप्रकारांना चाप घालण्यासाठी क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी कठोर पावले उचलली आहेत.

महापालिकेच्या भूमिकेमुळे विजेचे खांब रस्त्यातच

$
0
0
मोंढा नाका येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. पूल उभारणीदरम्यान वाहतुकीस अडथळा येऊ नये, म्हणून रस्ताच्या बाजुला असलेले पंखे मजबूत करण्यात आले.

ग्रुप हाउसिंगचा चौकशी अहवाल सचिवांच्या दप्तरी

$
0
0
महापालिकेच्या क्षेत्रातील ग्रुप हाउसिंगच्या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याच्या सचिवांच्या दप्तरी जमा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या अहवालाच्या अनुशंगाने महापालिका आयुक्तांना कारवाईचे आदेश येत्या काळात दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डी, पैठण, पंढरपूरसाठी गुरू पौर्णिमनिमित्त जादा बस

$
0
0
गुरू पौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी शिर्डीसह पैठण, पंढरपूर येथे जाण्यासाठी एसटीने ८५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डीला १९ जादा बस सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर यात्रेसाठी ६६ जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात सहा जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
वेगवेगळ्या घटनेते विष प्राशन करून जिल्ह्यात सहा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे समजू शकले नाही.

रस्त्यांच्या कामांचे शपथपत्र सादर करा

$
0
0
शहरातील रस्त्यांच्या कामाची स्थिती व दर्जाबाबत विचारणा करीत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी (७ जुलै) सुनावणीवेळी महापालिकेला दिले आहेत.

मालधक्क्यावर सिमेंट, युरिया भिजला

$
0
0
रेल्वेद्वारे आलेला माल वेळेच्या आत न उचलल्यामुळे रविवारी (६ जुलै) रात्रीच्या पावसामुळे सिमेंट आणि युरियाचे पोते भिजले. त्यामुळे सुमारे १० लाखांच्या मालाचे नुकसान झाले आहे. रेल्वे विभागाने शेड न उभारल्याने या मालाचा नुकसान झाल्याचा आरोप हुंडेकऱ्यांनी केला आहे.

पीक विमा उरला कागदावरच

$
0
0
राज्यातील काही जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना राबवण्यात आली. या योजनेत त्रुटी असल्यामुळे यावर्षी राज्यभर राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे.

महापालिका शाळेकडे गर्दी वाढली

$
0
0
महापालिकेच्या शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. ठराविक शाळांसाठी विद्यार्थी व पालकांकडून डिमांड वाढत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी ए. एम. शेख यांनी दिली आहे. यंदा दहा टक्के विद्यार्थी संख्या वाढीचे टार्गेट देण्यात आले आहे.

रितेशचे चाहते रेटारेटीत जखमी

$
0
0
अभिनेता रितेश देशमुखला पाहण्यासाठी सोमवारी (७ जुलै) प्रोझोन मॉलमध्ये झालेल्या हुल्लडबाजीत १४ चाहते जखमी झाले. ‘लय भारी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रोझोन मॉलमध्ये रितेशचा चाहत्यांशी संवाद आयोजित करण्यात आला होता.

‘आषाढी’वर दुष्काळी ढग

$
0
0
यंदा आषाढी एकादशीच्या बाजारावर दुष्काळाचे काळे ढग आलेत. पावसाने दडी मारल्याने फळ-भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी उपवासाच्या पदार्थांचे भाव कडाडलेत. बाजारातला निरुत्साह पाहता, यंदा सामान्यांची आषाढी एकादशी निरंकारी होणार असल्याचे दिसून येते.

सर्वदूर पावसाने मराठवाडा सुखावला

$
0
0
पावसाचे दोन्ही नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच, रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात महिन्याभरानंतर एकाच दिवशी साडेदहा मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images