Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाज्यांच्या दरांना ‘गगनही ठेंगणे’

0
0
पावसाने ओढ दिल्याने उस्मानाबाद शहर व परिसरात भाजी-पाल्यांचे दर कडाडले असून गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे. दरवाढीमुळे भाजी पाल्यांची ग्राहकांची मागणीसुद्धा घटली आहे.

बीडमध्ये अतिवृष्टी, उस्मानाबादमध्ये जोरदार

0
0
उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा परिसरात मंगळवारी दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तेरणा नदीला भरून वाहू लागली आहे. बीड शहरात सोमवारी रात्री धुवाँधार पाऊस झाला. बीड आणि युसुफ वडगाव येथे अतिवृष्टीची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यासाठी ‘थोडी खुशी थोडा गम’

0
0
लातूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्या, तरी बिदर-मुंबई ही नवी रेल्वे मुंबईला जाण्यासाठी मिळणार असल्याचा आनंद रेल्वे प्रवाशात असून रेल्वे स्टेशनवरील आवश्यक सेवा सुविधांच्या विकासासाठी केलेल्या तरतुदीचा नक्की फायदा होणार असल्याची आशावादी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनेने मांडली.

सोलापूर-बऱ्हाणपूर रेल्वे नाहीच

0
0
रेल्वे बजेटमध्ये यंदा मराठवाड्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सोलापूर-बऱ्हाणपूर, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद याबरोबरच परळी-बीड-अहमदनगर या रेल्वे मार्गांच्या प्रस्तावाला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

पालिकेची सभा दहा मिनिटांत गुंडाळली

0
0
प्रचंड गदारोळ, वादविवादाने गाजणारी पालिकेची सभा मंगळवारी (८ जुलै) फक्त दहा मिनिटांत गुंडाळण्यात आली. मंजूर, मंजूर, मंजूर म्हणत यावेळी १२ विषयांना मंजुरी देण्यात आली. पालिकेवर प्रशासक नेमला असून या परिस्थितीत ही सर्व साधारण सभा झाल्याने या सभेला विशेष महत्त्व आहे.

टंचाईच्या काळात शेततळी मिळेना!

0
0
पाणी टंचाईच्या काळात फळबागांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या शेततळ्यांना मंजुरी मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. २०१४-१५ या वर्षी शेततळ्यांचे उद्दिष्ट नसल्याचे स्पष्टीकरण कृषी विभागाने दिले आहे तर, फळबागा जगवण्यासाठी फळबागांची गरज असल्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नामांकित कंपनीत रोजगाराची संधी

0
0
बेरोजगारांना नामंकित कंपन्यामध्ये रोजगारांची संधी प्राप्त व्हावी, यासाठी जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे येत्या १५ जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालजीपुरा, बसस्टँन्ड रोड, येथील केंद्रात सकाळी साडे दहा वाजता, या मेळाव्यास सुरुवात होणार आहे.

घाटी धरते सात महिने वेठीस

0
0
मतिमंदत्वाच्या प्रमाणपत्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) चक्क सहा ते सात महिने वेठीस धरण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र शहरात दुसरीकडे कुठेही मिळण्याची सोय नसल्याने मतिमंदांना घाटीशिवाय पर्याय नाही.

नवीन मतदारांना मिळणार १५ ऑगस्टपर्यंत ओळखपत्र

0
0
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या नवीन मतदार नोंदणी मोहिमेत नावनोंदणी केलेल्या नवमतदारांना १५ ऑगस्टपर्यंत घरपोच मतदार ओळखपत्र मिळणार आहे.

भाषा बंदोबस्ताची

0
0
नागरिकांची कामे खरोखरच गतीने व्हावीत, असे जर वाटत असेल तर, सभापतींसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयापेक्षा झोन कार्यालयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मुख्यालयातून धोरणात्मक निर्णय होतात पण त्या निर्णयांची अंमलबजावणी झोन कार्यालयात होते.

शिस्तीत मिळेल विठोबाचे दर्शन

0
0
आषाढी एकादशीनिमित्त छोटे पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिर ट्र्स्टतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

विद्यापीठात उभारणार ‘सेंटर फॉर करिक्युलम’

0
0
उद्योगांच्या गरजेनुसार पदवी, पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात बदल व्हावेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता ‘सेंटर फॉर करिक्युलम’ उभारणार आहे.

भाजपची हुकूमशाही लोकशाहीला मारक

0
0
केंद्रात विरोधीपक्ष नेतेपद देण्यासाठी भाजपने अनुकुलता न दर्शविल्याचा काँग्रेस नेत्यांनी निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका लोकशाहीला मारक असल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केली.

उड्डाणपुलामुळे ग्रीन बेल्टमध्ये रस्ता

0
0
उड्डाणपुलाच्या कामामुळे जालना रोडवरच्या ग्रीन बेल्टमध्ये पर्यायी रस्ता तयार करण्याची योजना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आखली आहे. या कामामुळे सुमारे १४८ झाडे तोडली जाणार आहेत.

शहरात तासाभरात २४ मिली मीटर पाऊस

0
0
पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता आषाढी एकाशीच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी (८ जुलै) शहरात पावसाने हजेरी लावली. दुपारी सव्वातीन वाजता सुरू झालेल्या पाऊस शहराच्या जवळपास सर्वच भागात बरसला.

‘क्रांती चौक-स्टेशन’साठी जुलैअखेरीचा वायदा

0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आता नवीन डेडलाइन दिली आहे. जुलैअखेर पर्यंत सिमेंटचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेचि फळ काय सत्तांतराचे!

0
0
बिहार, पश्चिम बंगाल किंवा कर्नाटक. रेल्वेचे मंत्रिपद या तीनच राज्यांकडे गेले पाहिजे असा दंडक आहे. (अपवाद मधू दंडवते व राम नाईक यांचा) नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेही तो पाळला आणि अपेक्षेप्रमाणे इतर राज्यांना ठेंगा दाखवणारा पहिला अर्थसंकल्प कर्नाटकचे सदानंद गौडा यांनी सादर केला.

युतीसोबत काँग्रेसचे दोन नगरसेवक

0
0
नगराध्यक्षाच्या उमेदवारीचा अंतर्गत वाद व मुस्लिम नगरसेवकास नगराध्यक्षपद न देण्याचा निर्णय यामुळे काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक शिवसेनेला मिळाल्याने पैठण नगर परिषदेतील काँग्रेसची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुलगुरूंना हायकोर्टाची नोटीस

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अपात्र गाइडप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणी खंडपीठाने कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण सचिव आणि बीसीयूडी संचालकांना नोटिस बजावली आहे.

पोलिस भरतीचा ‘निक्काल’

0
0
शहर पोलिस विभागासाठी शिपाई पदांच्या ३८१ जागांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल मागे घेण्याची वेळ पोलिस प्रशासनावर आली आहे. गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याची तक्रारी काही उमेदवारांनी केल्यानंतर उत्तरपत्रिका व गुणांची फेरपडतळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images