Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तांब्याने पाणी टाकून पिके जगवण्याचा प्रयत्न

$
0
0
तालुक्यात पावसाअभावी कापूस, मका आदी पिके जळू लागली आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याअभावी उगवण झालेली पिके आणखी किती दिवस तग धरून राहतील, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या काही भागात उगवण झालेली पिके तांब्याने पाणी टाकून जगवण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

दुष्काळग्रस्त नव्हे ‘पाणीदार’ गाव

$
0
0
शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे ‘शहरांकडून गावांकडे स्थलांतर’ घडवण्यासाठी ‘वनराई’ संस्था प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नातूनच बाजार वाहेगाव (जि. जालना) गावाचा कायापालट झाला. बारा महिने पाणी टंचाई असलेल्या गावात आता लाखो लिटर पाणी आहे.

मराठवाड्यात ४९५ गावे, ३२५ वाड्या तहानलेल्या

$
0
0
जुलै महिन्यातही पाऊस रुसल्यामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत टँकरची संख्या ऐन पावसाळ्यात वाढत आहे. मराठवाड्यातील ४९५ गावे व ३२५ वाड्या तहानलेल्या असून त्यांना ६४२ टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.

मराठवाड्यात पावसाचा रुसवा

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जुन ते ऑक्टोबर या वार्षिक सरासरीच्या फक्त १०.१७ टक्के पाऊस झाला आहे. तर आज पर्यंत पडलेल्या पावसाची अपेक्षित पावसाच्या तुलनेत फक्त ३३.२ टक्के पाऊस पडल्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.

अण्णाभाऊंच्या कुटुंबाला ५१ हजार रुपयांचा निधी

$
0
0
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना जंयतीनिमित्त सर्वधर्मीय उत्सव समितीतर्फे ५१ हजार रुपयांचा निधी १८ जुलै रोजी दिला जाणार आहे अशी माहिती समितीचे संयोजक सुरेश चव्हाण यांनी दिली.

चार वर्षांपासून तुषार ठेवतोय रमजानचे रोजे

$
0
0
पहाटे तीन वाजता मित्र फोन करून सहरची वेळ झाल्याची माहिती देतात. आई पहाटे साडेतीन वाजेपर्यत गरम जेवण तयार करून देते. सायंकाळी इफ्तारच्या वेळेत रोजा सोडला जातो. गेल्या चार वर्षापासून न्यायनगरमधील तुषार मोटे याचा रमजानच्या महिन्यातील हा दिनक्रम आहे.

चाळीस टक्के खरिपाचे नुकसान?

$
0
0
एका महिन्यानंतरही पावसाची शक्यता नसल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आहे. कडधान्य पिके हातची गेल्यानंतर फक्त कापूस आणि मका ही दोनच पिके घेणे शक्य आहे. येत्या आठवड्यातही पावसाने दडी मारल्यास खरीप उत्पादनात किमान ४० टक्के घट होण्याची भीती कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

घाटीतील मनोविकृती वॉर्डाच्या ‘फॉल सीलिंग’चा भाग कोसळला

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सध्याच्या वॉर्डातील ‘फॉल सिलिंग’चा काही भाग दोन दिवसांपूर्वी कोसळला. सुर्दैवाने यामध्ये वॉर्डातील मनोरुग्ण जखमी झाला नाही; परंतु कोसळलेल्या ‘फॉल सिलिंग’च्या तुकड्यासोबत भरपूर माती, कचराही पडला.

‘शासकीय दंत’ला शासनाचाच हात

$
0
0
मराठवाड्यातील एकमेव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे वसतिगृह, दोन प्रयोगशाळा, छोटे सभागृह, जिमखाना तसेच कॅन्टीनचे काम वर्षानुवर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे वसतिगृहाचा चार मजली सांगाडा नुसताच उभा आहे.

पाच हजार क्विंटल मका भिजला

$
0
0
तब्बल पाच हजार क्विंटल मका रेल्वेच्या मालधक्क्यावर भिजला. रविवारी (१३ जुलै) दुपारी पाच वाजेपर्यंत हा मका उचलण्यात आला नव्हता की त्यावर ताडपत्रीही टाकण्यात आली नव्हती.

शेकडोंची भूक भागवणारे गुरूमत विद्यालय

$
0
0
गुरू ग्रंथसाहिबमधील या ओळींचा अर्थ म्हणजे प्रसाद आणि सत्संग त्या ठिकाणी कुठलीच कमी नसते. याचा प्रत्यय साताऱ्यात सुरू असलेल्या गुरूमत विद्यालयात येतो. येथे दररोज अनाथ आश्रमातील विद्यार्थी, परिसरातील गरीब असे शेकडोंच्या संख्येने येथे सुरू असलेल्या लंगरमध्ये भूक भागवतात.

सूचनांऐवजी मुलाखतींनी निरीक्षक चक्रावले

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक गजानन शेकटावत रविवारी (१३ जुलै) औरंगाबादेत आले होते. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या शेकटावतांसमोर अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

मेडिकलच्या वाढीव जागांची घोषणा उद्या?

$
0
0
पायाभूत सुविधांची पूर्तता न केल्यावरून रद्द केलेल्या मेडिकच्या वाढीव ५०० जागा पुन्हा मिळण्याबाबत मंगळवारी घोषणा अपेक्षित आहे. शनिवारी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेत बैठक झाली. तीत बंगालला १०५० जागा वाढवून मिळाल्या.

कॉलेजांचा फुगा फुटला

$
0
0
कॉलेजांमधील सोयी- सुविधा, प्राचार्य- प्राध्यापकांच्या रिक्त जागा या उच्च शिक्षणक्षेत्रातील प्रमुख समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादीत झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या जॉईंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सलरच्या आढावा बैठकीत हाच मुद्दा गाजला.

एसटीने ‘तिचा’ आवाज दबला

$
0
0
सलग आठ तास क्षणाचीही विश्रांती न घेता काम. त्यानंतर सन्मानाची वागणूक तर सोडाच वरिष्ठांकडूनही अनेकदा छी-थू होते. सुट्टी मागायला गेलो की मिळत नाही. मिळाली अन् पर्यायी वाहकाची सोय झालीच नाही, तर तब्बल अडीच हजारांपर्यंतचा दंड होतो.

‘शतकोटी’च्या खड्ड्यांची चौकशी

$
0
0
जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून गावागावात खड्डे आणि रोपांची नोंद कागदोपत्रीच असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा!

$
0
0
काँग्रेसने औरंगाबादेत विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लिम उमेदवारास संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी रविवारी निरीक्षकांसमोर केली.

मराठवाडा पुन्हा कोरडाठाक

$
0
0
मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे विभागात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईसदृश्य परिस्थितीबाबत मंत्री तसेच प्रशासनाच्या बैठका होत असल्या, तरी टंचाई निवारण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

‘महसूल’च्या कारवाईत दोनशे सिलिंडर जप्त

$
0
0
घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई करून जिल्ह्यातून सुमारे २०० सिलिंडर जप्त केले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या ठिकाणी शनिवारी ही तपासणी‌ मोहीम हाती घेण्यात आली होती.

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस

$
0
0
नांदेड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून रविवारी रात्री एकूण १०५.३१ मिमी पावसाची नोंद झाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images