Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठाचा संशोधकांना झटका

$
0
0
फार्मसीच्या तब्बल चार वर्षात दोन पेट घेतल्या. पण एकाही पेटचा निकाल जाहीर न करण्याचा पराक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केला आहे. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्रच्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांवर संशोधनसाठी इतर विद्यापीठांचे उंबरे झिजवायची पाळी आली आहे.

शहरातील नेटवर्क होणार जॅम

$
0
0
संपूर्ण औरंगाबाद शहराचे नेटवर्क आता जाम होणार आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने मोबाइल कंपन्यांच्या टॉवर्सवर कारवाई सुरू केली असून, गुरुवारी (१७ जुलै) ४० टॉवर्स सील करण्यात आले. शुक्रवारीही ही कारवाई सुरू राहणार आहे.

८०० कोटींची पाणी योजना

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआसयी) प्रकल्पातील शेंद्रा-बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्कसाठी ८०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी (१७ जुलै) औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केली.

कित्येक गावांत स्मशानशांतता

$
0
0
‘कौन बनेगा करोडपती’च्या तालावर ‘केबीसी’ने सामान्यांना कोट्यधीश होण्याचे आमिष दाखवून जी लूट केली, तिचे परिणाम मराठवाड्यातील कित्येक गावांना भोगावे लागत आहेत. पैठण तालुक्यातील जी गावे या लाटेत उद्ध्वस्त झाली, तेथे स्मशान शांतता पसरली आहे.

कोणाच्याही इशाऱ्यांना भीक घालीत नाही

$
0
0
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिबिरात राज्यमंत्री अमित देशमुख आणि आमदार दिलीप देशमुख यांनी शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांची नाव न घेता खरडपट्टी केली होती.

नांदेडच्या सातही जागा भाजपनेच लढवाव्यात

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या विधानसभेच्या सातही जागा भाजपने लढवव्यात असा ठराव या मतदारसंघातील कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यावर जिल्हा कार्यसमितीच्या झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सिल्लोड तालुक्यात मर्यादित पाणीसाठा

$
0
0
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अत्यंत तुरळक पाऊस पडल्याने ऐन पावसाळ्यातही विहिरी अधिग्रहित करून टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

परतूर देणार नाही, उलट भोकरदन काँग्रेसला द्या

$
0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेसला विधानसभेसाठी परतूरची जागा देणार नाही. उलट कॉँग्रेसला फसवून घेतलेली भोकदनची जागा परत द्या, अशी मागणी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी केली आहे. गुरुवारी (१७ जुलै) आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांना हा आक्रमक पवित्रा घेतला.

एक कोटीच्या वसुलीस जिल्हा प्रशासनाचा ठेंगा

$
0
0
स्वस्त धान्य दुकानातून विक्री केलेल्या अधिसूचित मालावरील एक कोटी रुपयांच्या बाजार फीची जिल्हा प्रशासनाकडे थकबाकी आहे. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल पंधरा वेळा विनंती पत्रे देऊनही जिल्हा प्रशासन दोन वर्षापासून ही थकबाकी अदा करीत नाही.

नॅशनल हाय-वेसाठी भूसंपादन लवकरच

$
0
0
सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. बायपास परिसर वगळून जिल्ह्यातील उर्वरित भागात भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

उमेदवारी वाटपात समर्थकांना न्याय देणार

$
0
0
दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना ज्यांना शब्द दिला होता, त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तिकिट वाटपात योग्य न्याय मिळेल, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी गुरुवारी (१७ जुलै) पत्रकारांशी बोलताना दिली.

बड्या उद्योजकांनी बुडवले एक लाख ४० हजार कोटी

$
0
0
‘बड्या उद्योजकांनी गेल्या सात वर्षात राष्ट्रीयकृत बँकांचे एक लाख ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. हा पैसा जनतेने विश्वासाने बँकांमध्ये ठेवला आहे. त्यामुळे बँकेची थकबाकी न भरणे फौजदारी गुन्हा ठरवावा,’ अशी मागणी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापुरकर यांनी केली.

इलेक्ट्रॉनिक्स, आयटीमधील एमएस्सीची ‘निलिट’मध्ये संधी

$
0
0
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये (निलिट) विद्यार्थ्यांना आता ‘इंटिग्रेटेड एमएससी-एमटेक डिग्री प्रोग्राम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राणे यांच्यासोबत जाण्याची शहरातील समर्थकांची तयारी

$
0
0
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने अस्वस्थ असलेले राणे पक्ष सोडतील की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, पण राणे पक्ष सोडणार नसून मंत्रिपदाचाच त्याग करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केबीसीच्या गुंतवणूकदारांची पोलिस आयुक्तांकडे धाव

$
0
0
वाळूज एमआयडीसी भागातील केबीसीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी शुक्रवारी (१८ जुलै) पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांची भेट घेत केबीसी कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी आर्थीक गुन्हेशाखेकडे हे प्रकरण चौकशीसाठी सोपवण्यात आले आहे.

गाजा पट्टीवरील हल्ला बंद करा

$
0
0
रमजान महिन्यात गाजा पट्टीमधील निरपराध लोकांवर केले जात असलेले बाँबहल्ले बंद करा, इस्त्राइलच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका, अशा घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नुमाइंदा काउंन्सिलच्या नेतृत्वाखाली विविध मुस्लिम संघटनांच्या वतिने शुक्रवारी (१८ जुलै) धरणे आंदोलन करण्यात आले.

सहा हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ

$
0
0
मराठा समाजाला इंजिनीअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशासाठी आरक्षण देण्याच्या निर्णयाचा लाभ सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर बी फार्मसीच्या प्रवेशात सुमारे ३०० विद्यार्थ्यांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.

डाळी, भाजीपाल्यात स्पर्धा

$
0
0
पावसाने ओढ दिल्यामुळे भाज्यांचा दर ६० रुपये किलोवर गेला आहे. आता त्यांचाच कित्ता गिरवत मूग, उडीद डाळींचे दर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी महागलेत. सध्या भाजीपाला आणि डाळींमध्ये महागाईची स्पर्धा सुरू आहे. त्यात सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

शिक्षणाच्या हक्काची शाळा

$
0
0
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाच्या आकडेवारीची शिक्षण विभागच ‘शाळा’ करत असल्याचे समोर आले आहे. पात्र शाळा किती, अपेक्षित, प्रत्यक्षात प्रवेश किती याचा ताळमेळच बसत नाही.

जालन्यात ‘मिनी’ केबीसी

$
0
0
अल्पावधीत बक्कळ माया कमवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या ‘केबीसी’ कंपनीने लोकांना कोट्यवधी रुपयांचा चूना लावला. तसाच प्रकार जालन्यात उघड झाला आहे. ‘नॅशनल कार्पोरेशन ऑफ इंडस्ट्रिज’ नावाच्या एका कंपनीने कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळलेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images