Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लातूरवर ‘सीसीटीव्ही’चा वॉच

0
0
‘डीपीसी’च्या नाविन्यपूर्ण योजनेतून लातूर शहरात ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा आणि जनसुविधा योजनेतून स्मशानभुमीचे १०० टक्के बांधकाम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी झालेल्या ‘डीपीडीसी’च्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इं‌जिनीअरिंगमध्ये मराठा आरक्षण

0
0
राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा पहिला लाभ थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, बी फार्मसीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या संदर्भातील परिपत्रक शुक्रवारी (१८ जुलै) तंत्रशिक्षण विभागाने जारी केले.

रस्ता कागदावरच; मोबदला रोखीने

0
0
चंपाचौक ते जालना रोड हा शहर विकास योजनेतील रस्ता कागदावरच असताना, या रस्त्यासाठी ९०० मालमत्तांपैकी फक्त एका भूखंडाच्या मालकाला दोन कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशानाने मांडला आहे. हा प्रस्ताव उद्या शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आहे.

सोयाबीनचे बियाणे नव्याने देणार

0
0
लातूर विभागात पावसाची प्रतीक्षा असतानाच शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. हे पेरलेले सोयाबीनचे बियाणेच उगवले नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पेरणी करताना यंदा शेतकऱ्यांनी घराच्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे.

भर पावसाळ्यात पॅचवर्कवर खैरात

0
0
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पॅचवर्कची कामे केली जातात. यंदा मात्र महापालिकेने चक्क पाऊस सुरू झाल्यावर पॅचवर्कच्या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे काय?

0
0
मराठा आरक्षणाचा पहिला लाभ थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, बी फार्मसी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले, मात्र यात मुस्लिम समाजाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

आदित्य ठाकरे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

0
0
युवासेनेच्या मराठवाडास्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात मार्गदर्शन करणे हा नेहमीचा फंडा न घेता ठाकरे यांनी जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पाण्याची पळवापळवी सुरू

0
0
दीड महिना उलटून गेला तरीही साऱ्या महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा आहे. उपलब्ध असलेले पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवा, असे सरकारचे आदेश असताना ते धाब्यावर बसवून ओझर बंधाऱ्याच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.

कागदावरील रस्त्याच्या मोबदल्याला स्थगिती

0
0
शहर विकास योजनेतील रस्ता कागदावरच असताना, केवळ एका भूखंड मालकाला दोन कोटी रुपयांचा मोबदला देण्याच्या प्रस्तावाला शनिवारी अखेर स्थगिती मिळाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शनिवारी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये याच विषयावर गरमागरम चर्चा झाली.

‘केबीसी’ प्रकरणात तक्रारींचा ओघ सुरूच

0
0
केबीसी कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. आतापर्यंत १२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, शनिवारीही (१९ जुलै) चार तक्रारदारांनी निवेदन सादर केले. दररोज तक्रारी येत असल्याने एकत्रित एकच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लाखाचे भागभांडवल तीस कोटींवर

0
0
लाखो गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या केबीसी कंपनीने एक लाख रुपयांच्या भाग भांडवलावरील धंदा चार वर्षांत तीस कोटी ७२ लाखापर्यंत गेला होता. केबीसीच्या ऑडिट रिपोर्टमधील बँलन्स शीटमध्ये चार वर्षांचा हा अहवाल आहे मात्र या बँलन्स शीटवर कोणता व्यवसाय, कोणत्या उत्पादनाची खरेदी याबाबत कोणताही उल्लेख नाही.

भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

0
0
संसार उद्ध्वस्त होणार आहे. उपचार करून सर्व ठीक करतो, अशी थाप मारून भोंदूबाबाने विवाहितेवर बलात्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून तो या महिलेवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट

0
0
दररोज भरून येणारे आभाळ आणि वाऱ्याने पळून जाणारे ढग यामुळे नांदेड जिल्ह्यावर दुष्कळाची छाया आहे. अनेक शेतकऱ्यांवर तिसऱ्या वेळेस पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे आगामी काळात शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टरी ५० हजारची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

एव्हरीबडी कॅन टॉक इंग्लिश

0
0
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अस्खलित इंग्रजी बोलला पाहिजे, यासाठी औरंगाबाद झेडपीच्या शिक्षण विभागाने ‘लँग्वेज लॅब’चा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत १५ ऑगस्ट रोजी या लॅबचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.

गुटखाबंदीला मुदतवाढ

0
0
गुटखा बंदीच्या निर्णयानंतर गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यांतील आठ जिल्ह्यांत मिळून केवळ पावणेआठ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ९० प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने गुटखा व पान मसाल्यावरील बंदी तिसऱ्या वर्षीही लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘कन्नडचा हरवलेला आमदार शोधा’

0
0
‘मनसेच्या चिन्हावर निवडून आलेले कन्नडचे आमदार, पक्ष सोडून गायब झाले आहेत, त्यांना शोधावे,’ आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. येथे शुक्रवारी (१८ जुलै) झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पाणलोटाच्या कामांमुळे टंचाईवर मात

0
0
जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. बहुतांश जलसाठे कोरडे आहेत. पैठण तालुक्यात ५० मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोटची कामे झाल्यामुळे दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या ववा गावाने पाणीटंचाईवर मात केली आहे.

पैठणमधून लढण्याचा राज ठाकरेंना प्रस्ताव

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पैठणमधून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी येथील कार्यकर्त्यांनी मेळाव्यात केली आहे. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, संपर्कप्रमुख सतीश नारकर, प्रदेश सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांच्या उपस्थितीत शनिवारी (१९ जुलै) कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

निवडणूक आचारसंहितेचा विनियोजन खर्चाला फटका

0
0
पंचायत समितीला सन २०१३- १४ मध्ये विनियोजन लेखे म्हणून मिळालेल्या पाच लाख रुपयांपैकी फक्त ९४ हजार ७७३ रुपये खर्च झाले. खर्च झालेली रक्कम सभापतींची मोटार व सरपंच मेळाव्यासाठी खर्च झाली.

लोकशाहीची भरली शाळा

0
0
पोदार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. आज मात्र हातात वही नव्हती. अन् पेनही. आजची शाळा होती लोकशाहीची. तिथल्या प्रक्रियेच्या उजळणीची. सोळा जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमाची शनिवारी (१९ जुलै) समाप्ती झाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images