Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बनावट दस्तावेज करणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0
अजंठा फार्मा सेझसाठी खोटे कागदपत्र व दस्तावेज करणाऱ्या एमआयडीसी व महसूल अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नाथनगर वडखा येथील ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे.

बिल्डरांच्या फायद्यासाठी साताऱ्यात रस्ता वळवला

$
0
0
झालर क्षेत्राच्या झोन- ५ मधील धनदांडगे व बिल्डरांच्या जमिनी वाचवण्यासाठी गट क्रमांक १६९ मधून रस्ता डावीकडे गट क्रमांक ९१ कडे वळवण्यात आला आहे, असा आक्षेप सातारा येथील रहिवाशांनी घेतला आहे.

चर्मकार महासंघ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

$
0
0
माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवनराम यांच्या नावे चर्मकार आयोगांची स्थापन करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

बेरोजगारांना ४७ लाखांना घातला गंडा

$
0
0
सीआरपीएफमध्ये नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून परळीच्या महाभागाने रांजणगाव शेणपुंजी परिसरात नऊ युवकांना ४७ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

दरोड्याच्या घटनांमुळे पैठण तालुक्यात दहशत

$
0
0
पैठण तालुक्यातील दरेगाव शिवारातील शेतवस्तीत मंगळवारी रात्री सात-आठ दरोडेखोरांनी शेतवस्तीवरील एका घरावर हल्ला करत नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पैठण एमआयडीसी परिसरात दीड महिन्यांमध्ये दरोड्याच्या तीन घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

उड्डाणपुलावरून कार कोसळली

$
0
0
लातूर शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ असणाऱ्या उड्डाणपुलावर बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर कारचालक जखमी झाला. या घटनेत दुचाकीला ठोकरल्यानंतर भरधाव स्कोडा कार पुलावरून खाली कोसळली.

मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर दुष्काळ निवारणासाठी मदत

$
0
0
राज्यातील दुष्काळ काहीसा सुसह्य व्हावा, या हेतूने दुष्काळ निवारणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थान समितीच्या वतीने एक कोटी रुपये देण्याची घोषणा देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी मेमध्ये केली होती.

नाहिदाबानो पठाण यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सातारा सर्कलमधील सदस्य आणि अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. पठाण यांचे जात प्रमाणपत्र नुकतेच विभागीय जात पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी हे आदेश दिले आहेत.

हिमायतनगरवर ओल्या दुष्काळाचे सावट

$
0
0
पावसाने उघडीप दिल्याने हिमायतनगर आणि परिसरातील नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. मात्र, आठ दिवसांमध्ये तीन वेळा पूर अनुभवणाऱ्या या गावांच्या नुकसानीची दाहकता आता समोर येत आहे. या पुरामुळे ८० टक्के पिके मुळासकट उखडली असून, उरलेली पिके जगतील, याचीही शक्यता कमीच आहे. त्यामुळे तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे संकट घोंघावू लागले आहे.

उपविभागांच्या निर्मितीला राजकीय रंग

$
0
0
राज्यात दोन तालुक्यांसाठी एक उपविभाग निर्माण करण्याचा घाट सरकारने घातला आहे. अकरा तालुके असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये सहा उपविभाग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यात सहाऐवजी सात उपविभाग निर्माण करावेत, अशी मागणी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

अडचणीतून संधी शोधल्यास यश निश्चित

$
0
0
अपार मेहनत, विश्वास यासोबत वाटचालीदरम्यान येणाऱ्या अडचणीतून संधी शोधली, तर कुठल्याही क्षेत्रात यश हमखास मिळते, असा कानमंत्र बागला ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांनी दिला.

गुंतवणूक धोरणाविरोधात ‘बीएसएनएल’मध्ये निदर्शने

$
0
0
दूरसंचार व संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीत वाढ करण्याच्या शासन निर्णयास भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) फोरम ऑफ युनियनने कडाडून विरोध केला आहे. केंद्र सरकाराच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सिडको येथील संचार भवनासमोर जोरदार निदर्शने केली.

प्रमोशनच्या वादावरून महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे

$
0
0
अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या नायब तहसीलदारपदी प्रमोशनसाठी सरकारने निश्चित केलेल्या प्रमाणाच्या विरोधात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले.

जायकवाडीचा मृतसाठा भरण्याच्या उंबरठ्यावर

$
0
0
जोरदार पावासानंतर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदापात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचा मृतसाठा भरून निघण्याच्या बेतात आहे. धरणातील एकूण साठा ७१२.९९६ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला आहे. नाथसागरात गेल्या २४ तासांत २५.४२ दशलक्ष घनमीटर पाणी आले आहे.

पाणीवाटपाचा ‘अभ्यास’ अडचणीचा

$
0
0
मराठवाड्याला गोदावरी खोऱ्यातील हक्काचा वाटा मिळण्यासाठी सरकारने अभ्यासगटाच्या शिफारसी सरकारला अडचणीच्या ठरणाऱ्या वाटल्या आहेत. त्यामुळे ‘एकदा फेरविचार करा,’ अशा सूचना अभ्यासगटाला देण्यात आल्या आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर अभ्यासगटाची औरंगाबादेत बैठक होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

धोकादायक इमारतींना टेकू

$
0
0
धोकादायक इमारती पडू नयेत, यासाठी आता या इमारतींना बांबूंचा आधार देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रामुख्याने ज्या इमारती रस्त्यांच्या बाजूने आहेत, त्या इमारतींना असा आधार दिला जाणार आहे.

लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन

$
0
0
गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ हे मनमानी कारभार करीत असून, सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा आरोप करीत पंचायत समितीच्या मासिक सभेवर सदस्यांनी गुरुवारी बहिष्कार चाकला.

कच्च्या रस्त्यामुळे ‘नरकयातना’

$
0
0
भारतनगर, मातोश्रीनगर वॉर्ड क्रमांक ८२ मधील न्यू हनुमाननगरमधील रहिवाशांना कच्या रस्त्यामुळे अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. चिखलाचा रस्ता तुडवत जाताना या भागात रोजच अपघात घडतात.

जिवंत साठ्यासाठी काय केले?

$
0
0
जायकवाडी जलाशयात जिवंत साठा पुनर्स्थापित करण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याबाबतची माहिती पुढील सुनावणीवेळी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नरेश पाटील व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत.

माव्याची छुपी विक्री तेजीत

$
0
0
तरुणांमधील व्यसनाधिनता कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने गुटख्यापाठोपाठ माव्याच्या विक्रीवर बंदी आणली आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुटखा आणि माव्याची छुप्या पद्धतीने विक्री करण्यात येत असून, या विक्रीला अन्न-औषध प्रशासनाकडील यंत्रणेचा अभाव असल्यामुळे या विक्रीला मोकळे रान मिळत असल्याची चर्चा आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images