Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनधिकृत टॉवर्सवर हातोडा

$
0
0
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील मोबाइल टॉवर्सच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अनाधिकृत टॉवर्सवर हातोडा पडणार असून, संबंधित इमारत अनाधिकृत असेल तर तिच्यावरही संक्रांत कोसळणार आहे.

‘फोक्सवॅगन’ची नवीन पोलो शहरात

$
0
0
फोक्सवॅगनने स्टायलिश, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, आकर्षक नवीन पोलो बाजारात आणली आहे. ही नवी गाडी औरंगाबादमध्येही दाखल झाली आहे.

विभागात टँकरचा आकडा सातशेंवर

$
0
0
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला होता. पावसाला सुरुवात झाली, असे वाटत असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागात टँकरची संख्या वाढू लागली आहे. एका आठवड्यात ३४ टँकरची वाढ झाली आहे. आता विभागामधील आठ जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या ७०१ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये ४४० विहिरींचे अधिग्रहण करावे लागले. आतापर्यंत प्रशासनाने १८७४ विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.

खरिपाच्या फक्त ३९ टक्के पेरण्या

$
0
0
मराठवाड्यात यंदा पावसाच्या रुसव्यामुळे फक्त ३९.२० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या ४३ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १७ जुलै पर्यंत १७ लाख २२२ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

मराठवाड्यात ४१ तालुके कोरडे

$
0
0
पुनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, मात्र दोन-तीन दिवसांत विभागातून पाऊस गायब झाला. रोज ढगाळ वातावरण असते, मात्र जोरदार वाऱ्यामुळे पाऊस पडत नाही. या स्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये विभागामध्ये केवळ ९८.६१ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

‘यशासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा’

$
0
0
ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था आणि आई-वडील अशिक्षित असल्यामुळे भावी पिढीला प्रोत्साहन मिळाले नाही. कर्तृत्ववान मुलांच्या पाठीवर घरच्यांनीही शाबासकीची थाप दिली पाहिजे. कारण पाल्यांविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यांना यशाचा टप्पा गाठता येईल,’ असे प्रतिपादन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी केले.

हितसंबंधासाठी बँक खासगीकरणाचा डाव

$
0
0
‘कॉर्पोरेट क्षेत्र पंतप्रधान नव्हे तर, उत्तम मॅनेजर निवडतात. सरकारचेच खासगीकरण होत असताना बँकांचे राष्ट्रीयकरण कसे टिकणार? आर्थिक रचनेत हितसंबंध जपण्यासाठी खासगीकरण चांगले असल्याचे ठासून सांगतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मदतीने खासगीकरणाचा डाव उधळला पाहिजे,’ असे प्रतिपादन कामगार नेते भालचंद्र कांगो यांनी केले. बँक राष्ट्रीयकरणाच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित्त शहागंज येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये शनिवारी (१९ जुलै) आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

८३ मुख्याध्यापक बचावले, १५ गुरुजींना ‘जंप प्रमोशन’

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे गेल्या आठवड्यात प्राथमिक पदवीधर शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. यात १,२३१ जागांपैकी ८१० जणांनी हे प्रमोशन स्वीकारले. अतिरिक्त झालेल्या ८३ मुख्याध्यापकांना या महिनाअखेरची डेडलाइन होती. २१ जण केंद्रप्रमुख म्हणून तर ५६ जण पदावनत होऊन पदवीधर शिक्षक झाले. तीन महिन्यांपूर्वी सहशिक्षक झालेल्या १५ जणांना थेट पदवीधर शिक्षक म्हणून जंप प्रमोशन मिळाले.

मराठवाडा साहित्य संमेलन आता डिसेंबर महिन्यात

$
0
0
उदगीर येथील नियोजित ३५वे मराठवाडा साहित्य संमेलन डिसेंबर महिन्यात होणार आहे. संमेलन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले होते; मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संमेलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह कुंडलिक अतकरे यांनी दिली.

राज्यस्तरीय पुरस्कार शाहीर तावरेंना प्रदान

$
0
0
राज्य शासनाचा २०१४-१५ या वर्षीचा ‘महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ औरंगाबाद येथील ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे यांना नुकताच मुंबईत प्रदान करण्यात आला.

सार्वजनिक सोहळ्यांनी जोडले रहिवासी

$
0
0
कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वसाहत अशी ओळख असलेले विजयनगर गारखेडा परिसरातील प्रमुख वसाहतींपैकी एक आहे. धार्मिक सलोखा आणि नियमित सार्वजनिक उपक्रमांमुळे रहिवाशांमध्ये एकोप्याचे वातावरण आहे. नुकताच विजयनगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा झाला. आठवडाभर भजन, कीर्तन आणि महाप्रसादाच्या माध्यमातून नवीन पिढीवर चांगले संस्कार करण्याचा हा उपक्रम दरवर्षी असतो.

सिटीबस दाखवा; बक्ष‌ीस मिळवा

$
0
0
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा सर्वाधिक रहदारीचा रस्ता. शहरातले टॉप कॉलेज, रेल्वेस्टेशन एमआयडीसी याच मार्गावर आहे. अनेक चाकरमानी, प्रवाशांना रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. पण या रस्त्यावर फक्त एक सिटीबस सोडता, सार्वजनिक वाहतुकीची कसलीही व्यवस्था नाही. त्यामुळे सामान्यांचे हाल सुरू आहेत. परिवहन महामंडळाने हा रस्ता रिक्षा चालकांना आंदण दिलाय का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो आहे.

शेट्टींनी बडवला योजनांचा बँड

$
0
0
पावणेपाच वर्षांत आरोग्य क्षेत्रात राबवलेल्या योजनांची जंत्री सादर करीत सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी सरकराने केलेल्या कामाचा बॅण्ड जोरात वाजवला. केवळ त्यांनीच नव्हे तर, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनीही मार्केटिंगचा ‘कार्यक्रम’ तब्बल साडेतीन तास चालवला. विशेष म्हणजे शेट्टी साहेब तब्बल दीड तास उशिरा आले; तोपर्यंत दर्डांनी सर्वांचा तासभर ‘तास’ घेत कार्यक्रमाचा किल्ला शिताफीने लढविला !

उद्धव ठाकरे आज शहरात

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादला येत आहेत. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी तुपे यांची नियुक्ती

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हा (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी तुपे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

पाच तास ताटकळलेली माता

$
0
0
घरातील कर्त्याचा आधार हिरावलेला. घरी लहान बाळ. आयुष्याचा गाडा पुढं नेण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळं ती माता सोमवारी (२१ जुलै) महापालिकेत आली. अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी उपायुक्त रवींद्र निकम यांची भेट घेण्यासाठी तिची धडपड करीत होती, पण तब्बल पाच तास दालनाबाहेर थांबल्यानंतर कार्यमग्न उपायुक्तांची भेट मिळाली सायंकाळी. तिही दोन मिनिटंच! आणि हाती काहीच लागले नसल्याची भावना घेऊन ती तेथून परतली.

गुणवंतांना हवा मदतीचा हात

$
0
0
मुलींच्या शिक्षणासाठी मोडकळीला आलेल्या रिक्षाच्या मदतीने संसाराचा गाडा ओढणाऱ्या वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत ९० टक्के गुण मिळविणारी चैताली पानकडे असो, की मुकुंदवाडी स्टेशन परिसरातील कोलाहलातही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून ९३ टक्के मिळविणारा देवेंद्र रंधवे असो.

घाटीत आढळली दोन महिन्यांची चिमुकली

$
0
0
घाटी हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक २८जवळ सोमवारी (२१ जुलै) दुपारी दोन महिन्यांची बालिका आढळली. या बालिकेला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, बेगमपुरा पोलिस ठाण्यात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या मंगळवारी (१५ जुलै) घाटी परिसरात दोन नवजात स्त्री जातीची जुळी अर्भके मृतावस्थेत आढळून आली होती. त्यांना टाकून देणाऱ्या मातेचा अद्यापही तपास लागलेला नाही.

पत्नीचा मृतदेह सोडून पती झाला पसार

$
0
0
पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पतीने मृतदेह घाटीत सोडून पसार झाला. पोलिसांचे या पतीला बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महिलेचा रविवारी (२१ जुलै) सायंकाळी मृत्यू झाला आहे.

महापालिका आयुक्तांना अवमान नोटीस

$
0
0
सलीम अली सरोवराच्या जैव वैविध्याला कुठलीही धक्का पोचू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने १७ ऑक्टोंबर २०१३ रोजी दिले होते, मात्र महापालिकेने सौंदर्यीकरण करून दोन जुलै रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी सरोवर खुले केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images