Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सुभेदारी’मध्ये बलात्कार; दहा महिन्यानंतर गुन्हा

$
0
0
महिलेवर औरंगाबादेत दोन आरोपींनी बलात्कार केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (२१ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. १६ ऑक्टोंबर २०१३ रोजी सुभेदारी गेस्ट हाउस परिसरातील वेरूळ विश्रामगृहामध्ये हा प्रकार घडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटविण्यावरून वरूडमध्ये दगडफेक

$
0
0
वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यावरून जाफ्राबाद तालुक्यातील वरूड गावामध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता. प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या वीस नळकांड्या फोडल्या. गावात तणावपूर्ण शांतता असून, गावामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

चिट फंड कंपनीतून तिजोरी पळवली

$
0
0
जालना रोडवरील कुशलनगर परिसरात असलेल्या चिट फंड कंपनीचे शटर तोडून तिजोरी पळवण्याची घटना रविवारी (२० जुलै) रात्री घडली. सोमवारी (२१ जुलै) सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून, कंपनीच्या व्यवस्थापकाने ही माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली.

नाशिक पोलिस नोंदवणार जबाब

$
0
0
केबीसी कंपनीच्या घोटाळ्यात औरंगाबाद परिसरातील अनेक गुंतवणूकदार फसले आहेत. यासंदर्भात नाशिक शहर पोलिस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुंतवणूकदारांच्या तक्रारीचे जबाब नोंदवण्यासाठी नाशिक पोलिसांच्या पथकाला बोलावण्यात येणार आहे.

ध्यास व्यसनमुक्तीचा

$
0
0
त्यांना समोर पाहिले की पोलिस मुख्यालयातील व्यसन असलेले पोलिस कर्मचारीच काय, अधिकारी देखील गडबडून जातात. तो का‌हीच करीत नाही. समोरच्या व्यक्तीकडे गुटखा, तंबाखू, सिगारेटची मागणी करतात. व्यसनाचे हे पदार्थ त्यांच्याकडून घेतात आणि नष्ट करून फेकून देतात. त्याची ही कळकळ असते सहकाऱ्यांचे व्यसन सोडण्यासाठी. कधीकधी तर या प्रकारातून त्यांचे वादही झाले आहेत. तरीही व्यसनमुक्तीसाठीचा हा संघर्ष थांबलेला नाही...

मालमत्ता विकून पैसे परत करा

$
0
0
केबीसी कंपनीच्या दोन स्थानिक मुख्य एजंटाविरुद्ध कारवाई करावी. त्यांची मालमत्ता विकून आमचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी ६० ते ७० गुंतवणूकदारांनी सोमवारी (२१ जुलै) ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून केली.

हातगाड्यांविरोधात व्यापारी एकवटले

$
0
0
दुकानांसमोरील हातगाड्यांच्या विरोधात व्यापारी एकवटे आहेत. हातगाड्यांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारी आपली दुकाने बंद ठेवली. हातगाड्यांचा प्रश्न पालिका आयुक्तांनी निकाली काढला नाही, तर मंगळवारी त्यांना सर्व व्यापारी आपापल्या दुकानांच्या किल्ल्या सुपूर्त करणार आहेत.

तेवीसशेची सायकल अडतीसशेला

$
0
0
महिला बालकल्याण समितीच्या बजेटच्या माध्यमातून पालिकेच्या प्रशासनाने विद्यार्थिनींसाठीच्या पैशावरही डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजारात २३०० रुपयाला मिळणाऱ्या सायकलींसाठी प्रशासनाने तीन हजार ८३१ रुपये मोजले आहेत.

पावसाळ्यात ठिगळपट्टी नको

$
0
0
स्थायी समितीने शनिवारी (१९ जुलै) रस्त्यांच्या पॅचवर्कच्या (ठिगळपट्टी) कामांना मंजुरी दिल्यानंतर सोमवारी (२१ जुलै) महापौर कला ओझा यांनी पॅचवर्कच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. पावसाळी वातावरण असेल तर पॅचवर्कची कामे करू नका, असे आदेश देऊन महापौरांनी अधिकाऱ्यांच्या तंबूत अस्वस्थता निर्माण केली. या बैठकीतून स्थायी समितीच्या सभापतींना मात्र डावलण्यात आले.

नांदेड शहरावर पाण्याचे संकट

$
0
0
विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने, प्रकल्पाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

खासगी सावकारांच्या विरोधात ७२ तक्रारी

$
0
0
जिल्ह्यात जानेवारी ते १५ जुलै २०१४ या साडेसहा महिन्यांच्या कालावधीत खासगी सावकारांच्या विरोधातील ७२ तक्रारी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आल्या. मात्र, या संदर्भातील कारवाईबाबत प्रशासनाची भूमिका ही वेळकाढूपणाची असल्यामुळे खासगी सावकारांचे मनोबल वाढत चालले आहे.

पावसाअभावी ७० टक्के पेरण्या रखडल्या

$
0
0
तीन नक्षत्रे आणि तब्बल दीड महिना उलटूनही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही ७० टक्के पेरण्या झालेल्या नाहीत. ३० टक्के झालेल्या पेरण्यापैं‌की निम्म्याहून अधिक म्हणजेच १५ टक्के क्षेत्रावर दुबार पेरण्याचे संकट घोंगावत आहे.

तिसऱ्यांदा खरिपाची पेरणी

$
0
0
नांदेड जिल्ह्यात ​गेल्या अनेक दिवसांपासून रुसलेल्या पावसाने रिमझिम​ ​सुरुवात केली आहे. यापूर्वी दोन वेळा पेरलेली बियाणे वाया गेल्याने आता शेतकऱ्यांनी तिसऱ्यावेळेस पेरणीला सुरुवात केली आहे.

‘तडजोड न करता काम करावे’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी सज्ज रहावे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच आपण पदाधिकाऱ्यांची निवड करणार आहोत. कोणाशीही तडजोड न करता पदाधिकारी व कार्यकर्त्यानी प्रामाणिकपणे काम करावे, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्षात स्थान आहे, असे मत संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केले.

बंद पडणार परळीची वीजनिर्मिती

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला पाणी आणि कोळसा टंचाई भेडसावत आहे. केंद्राला पाणी पुरवणाऱ्या खडका बंधाऱ्यात पाणी थोडेच शिल्लक आहे. त्यामुळे हे केंद्र ऑगस्ट महिन्यात बंद करावे लागणार आहे.

एम.आय.डी.सी.ला खुलताबादचा विसर

$
0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम. आय. डी. सी.) एकवीस वर्षापूर्वी सराई येथे औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित केली. परंतु दोन दशकाच्या कालावधीत अद्याप येथे औद्योगिकरणाला सुरुवात झाली नाही.

आचारसंहितेआधी आमदारांची घाई

$
0
0
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी कामे मंजूर करून उद्घाटने उरकरण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांची घाई सुरू झाली आहे. विधानसभेच्या जिल्ह्यातील आठ आमदारांनी विकास निधीतून ९ कोटी ८३ लाख रुपयांच्य कामाचे प्रस्ताव दाखल केले आहेत.

जनावर चोरांच्या म्होरक्यास अटक

$
0
0
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जनावरे चोरणाऱ्या एका सराईत टोळीच्या म्होरक्यास अटक केली आहे. त्याच्याकडून रोख पंधरा हजार रुपये, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निविदा शुल्क, इसार रक्कम ऑनलाइन

$
0
0
जिल्हा परिषदांमधील इ निविदा कार्यप्रणाली अंतर्गत निविदा शुल्क व इसार रक्कम यापुढे ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांची अडचण होणार आहे.

‘व्हील अलायनमेंट’वरून नोटीस

$
0
0
महाराष्ट्र मोटार व्हेइकल अॅक्ट सूचीमध्ये व्हील अलायनमेंट करणे बंधनकारक नाही, असे राज्य शासनाने परिपत्रक काढून नमूद केले होते. याविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादी राज्य शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images