Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘मेस’ला बसला महागाईचा तडका

$
0
0
शिक्षणासाठी औरंगाबादकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लोंढ्यांना प्रचंड महागाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील मेस आणि रूमभाडे गगनाला भिडल्यामुळे, त्यांची आर्थिक कोंडी सुरू आहे.

‘समांतर’साठी आज पालिकेत दोन बैठका

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या संदर्भात उद्या महापालिकेत दोन बैठका होणार आहेत. महापालिकेचे आयुक्त आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे प्रतिनिधी यांची एक बैठक, तर दुसरी बैठक महापौर आणि आयुक्त यांच्यात होणार आहे.

एकशे तीस रुपयांत देवदर्शन

$
0
0
एस.टी. महामंडळातर्फे श्रावण महिन्यात शहरापासून जवळ असलेल्या तीर्थस्थळांसाठी दर्शनासाठी देवदर्शन टूर पॅकेज सेवा सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी श्रावणी सोमवारी बस सोडली जाते. यावर्षी शनिवारीही सेवा दिली जाणार आहे.

नालेसफाईचे आदेश

$
0
0
बजाजनगरमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन बुधवारी (२३ जुलै) जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व एमआयडीसीने संयुक्तपणे पाहणी केली. त्यानंतर तत्काळ नालेसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरालगत २७ बांधकामे बंद

$
0
0
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद तालुक्यातील बांधकामे बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने तातडीने सुरू केली आहे. बुधवारी (२३ जुलै) प्रशासनाने नेमललेल्या पथकाने २७ बांधकामे बंद केली.

आमदारांवर इच्छुकांची कुरघोडी

$
0
0
विद्यमान आमदार असले तरी त्यांना डावलून आपल्याला तिकीट मिळावे, अशी व्यूहरचना शिवसेनेतील अनेक इच्छुकांनी केली आहे. शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर या इच्छुकांनी उमेदवारीसाठी हक्कही सांगितला आहे.

तरुणांना गंडवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

$
0
0
बेरोजगारांना सरकारी संस्था असल्याचे भासवत नोकरीचे अामिष दाखवून गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (२२ जुलै) सुभेदारी गेस्ट हाउसमध्ये नोंदणीसाठी आलेल्या तरुणांना संशय आल्याने हा प्रकार उघड झाला.

सिल्लोड-फुलंब्री शिवसेनेला द्या

$
0
0
भाजपच्या ताब्यात असलेले सिल्लोड आणि फुलंब्री हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडवून घ्या, अशी मागणी करीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला.

औषध खरेदी योजना ‘कोमा’त

$
0
0
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पुरविली जाणारी औषधी एकाच ठिकाणी मध्यवर्ती पद्धतीने खरेदी करण्याची योजना राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी सुरू केली. मात्र, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचे दुर्लक्ष आणि आरोग्य सहसंचालकांकडून राबविलेले चुकीचे धोरण यामुळे योजनाच संपुष्टात आली आहे.

मराठवाड्यात पाऊस आला

$
0
0
अनेक दिवसांपासुन दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर मराठवाड्यात हजेरी लावली. बहुतेक भागांमध्ये मंगळवारी सुरू झालेला पाऊस बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होता, रिमझिम असला तरीही या पावसाने मराठवाडा सुखावला आहे.

‘अपवाद व नियम’ बघून मुले हरखली

$
0
0
एक व्यापारी, त्याचं ओझं वाहून नेणारा हमाल आणि वाटाड्या आणि त्यांच्या प्रवासातले गूढ अशा विषयावरचे ‘अपवाद व नियम’ नाटक गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे तापडिया रंगमंदिरात सादर करण्यात आले.

रि‌मझिमनंतर पाऊस गायब

$
0
0
तब्बल तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने २२ व २३ जुलैसाठी हजेरी लावली. हवामान विभागाने वर्तवलेला गुरुवारी (२४ जुलै) मुसळधार पावसाचा अंदाज फक्त अंदाजच ठरला. दोन दिवस रिमझिम हजेरी लाऊन पाऊस पुन्हा गायब झाला आहे.

गुंतवणूकदार पोलिसांच्या दारी

$
0
0
कोणाच्या चेहऱ्यावर काळजीची छटा तर, कोणाला जबाब देण्याची उत्सुकता, कोणी बेफिकीरपणे बसलेला. पोलिस आयुक्तालयात जमलेल्या केबीसी घोटाळ्यातील शेकडो गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हे भाव होते. गुरुवारी (२४ जुलै) नाशिक शहर पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले.

विद्यार्थ्यांचे वसतिगृह शुल्क माफ

$
0
0
गतवर्षी झालेली गारपीट, त्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ते लक्षात घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी मदतीचे एक पाऊल पुढे टाकत, वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह शुल्क माफ करण्याचा निर्णय गुरुवारी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला.

साहित्य संमेलनाच्या ‘लोगो’वर उस्मानाबादची छाप

$
0
0
पंजाबमधील ‘घुमान’ येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे बोधचिन्ह (लोगो) बनविण्याचा मान तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु) गावचे सुपुत्र ख्वाजाभाई मौला सय्यद यांना मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यात महसूल अधिकाऱ्यांचे रजा आंदोलन

$
0
0
हिंगोलीचे पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना हिंगोली पोलिसांनी आकसापोटी केलेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि कायद्याचा वापर कसा करावा यासाठी शासनानेच सूचना देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लातूर जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी रजा आंदोलन केले. या आंदोलनामुळे विविध प्रमाणपत्रांसाठी तात्कळत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती.

आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

$
0
0
जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. रईस हाश्मी यांना गुरुवारी सकाळी लाचलुचपपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोग्य विभागातील शिपाई संजय राठोड यांची रजा मंजूर करण्यासाठी डॉ. हश्मी यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली होती.

‘राष्ट्रवादी’च्या इच्छुकांची मोर्चेबांधणी

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पाच-सहा जागा लढवण्याचे संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. वैजापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

शिवसेनेच्या पुयडला तीन दिवस पोलिस कोठडी

$
0
0
शिवसेनेच्या बालाजी पुयडला बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. गहेरवार यांनी २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुयडची पोलिस कोठडी बारा जुलै रोजी नाकारण्यात आली होती. दुसरे जिल्हा न्यायाधीश एस. बी. म्हस्के यांनी पोलिसांचे रिव्हिजन मंजूर करून पोलिस कोठडी मागण्याची मुभा दिली होती.

‘ई-फेरफार’ संकल्पना जोमाने राबवणार

$
0
0
येत्या एक ऑगस्टपासून ‘ई-फेरफार’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून यामुळे फेरफार नोंदीच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images