Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रोहयो मजुरांना हवा चॉईस!

$
0
0
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजूर कामासाठी चॉईस मागत असल्याने अधिकारी थक्क झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी विभागात १ लाख २९ हजार २३६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु मजूर सोपे व जवळच्या अंतरावरील कामाची मागणी करीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दोघांना नऊ लाखांना फसविले

$
0
0
गुंतवणुकदाराची रक्कम दुप्पट करून देतो म्हणून सुपर पावर इनव्हेस्टमेंट इंडिया लि. या कंपनीने दोघांची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्र, पर्यटन विकासासाठी निधी द्यावा

$
0
0
उस्मानाबाद‌ जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळे शिवाय ऐतिहासिक व सौंदर्यपूर्ण ठिकाणांचा विकास करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खात्याचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

बस चालकास मारहाण; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

$
0
0
रस्त्यावरील प्रवाशास बाजुला हो म्हणून सांगणाऱ्या बस चालकास प्रवाशाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मनाठा पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हटवली १८ अनधिकृत होर्डिंग

$
0
0
शहरातील विविध भागात विनापरवाना आणि अनाधिकृतपणे लावण्यात आलेले १८ होर्डिंग सोमवारी मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने काढून टाकले. शिवाजीनगर येथील काही नागरिकांनी होर्डिंग काढण्यास आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला.

टेम्पो-बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू; १८ जखमी

$
0
0
आयशर टेम्पो व बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लातूर-बार्शी मार्गावरील पळसपजवळील घोगरेवाडी शिवारात घडली.

लातुरातील जलाशय तहानलेले

$
0
0
लातूर आणि बीड जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा होत असलेल्या मांजरा धरणात अवघे दोन सेंटीमीटर पाणी पातळी वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा वाढल्याने ही वाढ दिलासादायक मानली जात आहे.

२९ लाखांची आयुर्वेद बिस्किटे खरेदी करणार

$
0
0
कमी वजनाच्या बालकांना कुपोषणापासून रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने तब्बल २९ लाखांची आयुर्वेदिक बिस्किटे खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

दोघांच्या मृत्यूनंतर आली जाग

$
0
0
बजाजनगरात डेंगीसदृश्य आजाराने दोघांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा परिषदे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी (२८ जुलै) येथील कामगार वसाहतीत पाहणी करून मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

घेतला वसा मदतीचा...

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून निवृत्त झालेले मनोहर उबाळे म्हणजे दातृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण. गरजू विद्यार्थी, अपंग, वृद्ध, पशू-पक्षी यांच्या सेवेचा वसा त्यांनी घेतला आहे.

हुतात्म्यांना अभिवादन

$
0
0
लष्करी छावणीतर्फे कारगिल विजय दिनी (२६ जुलै) शहिदांना अभिवादन करण्यात आले. विजय दिनाची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून छावणीतर्फे वृक्षारोपण व रक्तदान कार्यक्रमाचे आयो‌जन करण्यात आले होते.

उत्सवाला येथे संयमाचे भरते

$
0
0
वर्षभर सण आणि उत्सव संयमाने साजरी करणारी कॉलनी, ही विकास सोसायटीची खरी ओळख. टिळकनगरमधील या कॉलनीत एकही अपार्टमेंट नाही.

परळी वीज केंद्राला दुष्काळाचा तडाखा

$
0
0
परळीतल्या औष्णिक विद्युत केंद्राला दुष्काळाचा तीव्र तडाखा बसला आहे. पाण्याअभावी केंद्राचे काम बंद पडण्याची शक्यता आहे. केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका धरणात केवळ एक दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.

एक लाख बारा हजारांची पर्स लंपास

$
0
0
एका महिलेची एक लाख बारा हजारांचा ऐवज असलेली पर्स, रविवारी (२७ जुलै) दुपारी पळविण्यात आली. ही महिला बसमधून प्रवास करत होती. बाबा पेट्रोल पंप भागात ही घटना घडली.

मानपानासाठी सुनेला पेटविले; गुन्हा दाखल

$
0
0
माहेरून मानपान मिळत नसल्याने सासू सासऱ्याने व दिराने विवाहितेला पेटवून देत ठार मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (२५ जुलै) सायंकाळी विटखेडा भागात ही घटना घडली.

सुनेने सासऱ्यावर केला चाकूहल्ला

$
0
0
मुलाला अंगणात खेळू न दिल्याने सुनेने सासऱ्यावर चाकूहल्ला केल्याचा प्रकार मुकुंदवाडीत शनिवारी (२६ जुलै) रात्री घडला.

आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणावर हल्ला

$
0
0
आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर मुलीच्या माहेरच्या मंडळीनी चाकूहल्ला करत मुलीचे अपहरण केले. शनिवारी (२६ जुलै) रात्री साडेदहा वाजता राजनगर, मुकुंदवाडी भागात ही घटना घडली. तरुणावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

चोरी करून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न

$
0
0
गणेश कॉलनी परिसरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सोमवारी (२८ जुलै) सकाळी चोरी करून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे हा प्रकार सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

काहीही करा; पण आमचे पैसे द्या

$
0
0
‘पेपर मिलमध्ये रोजंदारी करतो. सुपर पॉवरच्या मोहात अडकलो. एजंट म्हणून काम केले. लोकांनी पैसे गुंतवले मात्र आता कंपनी बंद पडली. काहीही कर; पण आमचे पैसे परत दे. मुलाला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत.

...शंभो शंकर पशूपते!

$
0
0
पहिला श्रावणी सोमवार पाऊस घेऊन आल्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सोमवारी (२८ जुलै) शहरातील विविध महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती; तसेच शहरातील शेकडो भाविकांनी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी वेरूळ गाठले होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images