Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अजगराच्या पिंजऱ्याला पडले तडे

0
0
महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील सर्पालय गळू लागले आहे. त्यामुळे सर्पालयात पाणी साचले आहे. देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे अजगराच्या पिंजऱ्याला तडे पडले आहेत. त्यातून अजगर केव्हाही बाहेर पडण्याची भीती आहे.

‘सुपर पॉवर’विरुद्ध १३ तक्रारी

0
0
सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटच्या घोटाळ्यात अडकलेल्या १३ तक्रारदारांनी सोमवारी (२८ जुलै) गुन्हे शाखेशी संपर्क साधला. यामध्ये त्यांची १७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

लूक बदलणारे व्हाइट टॉपिंग

0
0
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा चेहरा म्हणजे अंतर्गत रस्ते. रस्ते चांगले असतील तर पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येतील. नजिकच्या काळात डीएमआयसी प्रकल्पही शहराजवळ होऊ घातला आहे.

प्रथमच ४० कोटींची तरतूद

0
0
शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने प्रथमच ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे होत असल्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.

नागरिकांनो, ठकसेनांपासून सावध रहा

0
0
केबीसी आणि सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीने जिल्ह्यातील हजारो नागर‌िकांना गंडवल्याचे उघड झाल्यानेे खळबळ उडाली आहे. यापूर्वी एन-मार्ट, नवजीवन इन्शुरन्स, रेनॉल्ड या कंपन्यांनीही ठकवले होते.

लोह्यात बोगस कामांचा वाचला पाढा

0
0
लोहा तालुक्यातील धानोरा (म) येथील बहुचर्चित महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) प्रकरणी तक्रारींचा पाऊस ग्रामस्थांनी मांडला. मजुरी न मिळाल्याचा संताप; तसेच बोगस कामांच्या तक्रारी या वेळी मांडण्यात आल्या.

उस्मानाबादला पावसाची प्रतीक्षा

0
0
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे नद्या ओसंडून वाहत असल्या, तरी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यावर मात्र वरुण राजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही.

ईदनिमित्त पावसासाठी प्रार्थना

0
0
मराठवाड्यामध्ये पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मुस्लिम धर्मीयांनी ‘ईद-उल फित्र’च्या सामूदायिक नमाजावेळी केली. मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. या वेळी एकमेकांना अलिंगन दिले.

राज्यमंत्र्यांचा ताफा अडवला

0
0
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लातुरात उत्पादन शुल्क राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या वाहनांचा ताफा पीव्हीआर चौकात अडवण्यात आला. आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही, तर एक तारखेपासून मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

'पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करावे'

0
0
राष्ट्रीयकृत बँकांनी आठ दिवसात पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना आमदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली आहे. बँकाकडून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने सोमवारी (२८ जुलै) पंचायत समतीत सभागृहात बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

रावसाहेब दानवेंनी ढवळाढवळ करू नये

0
0
भारतीय जनता पक्ष पैठण विधानसभा मतदारसंघ मागणार नसल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी युतीकडून माजी आमदार संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केल्याचे शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.

कानडी झुंडशाहीचा निषेध

0
0
येळ्ळूर (कर्नाटक) येथे मराठी चौथरा कर्नाटक सरकारने जबरदस्तीने हटविला. तीन दिवसांपासून कन्नडिगांची मराठी भाषिकांवर दंडेलशाही सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कर्नाटक विधानसभेत जोरदार निदर्शने करण्यात आली.

श्रीगणेशाच्या आगमनाचे लागले वेध

0
0
श्रावण महिन्यास प्रारंभ होताच गणेश मंडळांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घडवलेल्या गणेश मूर्तींना रंगरंगोटी करण्याचे काम मूर्तीकारांनी हाती घेतले आहेत.

केंद्रीय मंत्री दानवे यांंना साकडे

0
0
व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही संस्था औरंगाबादमध्ये उभारावी, यासाठी उद्योजकांनी मंगळवारी (२९ जुलै) केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख

0
0
उदगीर येथील नियोजित ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन डिसेंबरमध्ये होणार आहे.

‘समांतर’ भागवणार तहान

0
0
औरंगाबादसारख्या वाढत्या शहरासाठी समांतर जलवाहिनी येत्या काळात वरदान ठरणार आहे. मीटरनुसार नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याची सोय या माध्यमातून होणार आहे.

‘जायकवाडी’ला पाण्याची प्रतीक्षा

0
0
नाशिक व नगर जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरू झाला असून, या जिल्ह्यांतील धरणे व तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दारणा धरणातून १९ हजार ३२२ क्युसेक वेगाने पाणी गोदावरी धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे.

वृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढा

0
0
वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेला एक अभिशाप व मातापित्यांना मुलांनी लावलेला कलंक आहे. हा कलंक पुसून काढण्यासाठी सर्वांनी माता-पित्यांची सेवा करावी, कारण त्यांच्या सेवेत ईश्वराची सेवा केल्याची पुण्याई मिळते, असे आवाहन भागवत कथाकार डॉ. शिवयोगी कृष्णकांत स्वामी महाराज यांनी प्रबोधनातून केले.

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

0
0
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

७२ टक्के पेरण्या पूर्ण

0
0
मराठवाड्यात जून व जुलै महिन्यामध्ये पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अद्यापही खरिपाच्या संपूर्ण क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत. मराठवाड्यातील खरिपाच्या ४३ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images